Potato Crop 2025 कंदवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये बटाटा हे अत्यंत महत्त्वाचे भाजपाला पीक आहे. बटाटा पिकाच्या जगामध्ये गहू, तांदूळ व मका या पिकानंतर अन्न पीक म्हणून चौथा क्रमांक आहे. तर उत्पादनात चीन व रशिया नंतर तिसरा क्रमांक आहे.

Potato Crop 2025 महाराष्ट्रातील खरीप व रब्बी हंगामातील हवामान अनुकूल असल्यामुळे तसेच 75 दिवसात उत्पादन मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात बटाटा पिकाचे लागवड खरीप तसेच रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात होते. मात्र खरीप हंगामात या पिकाची लागवड पुणे, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही ठराविक भागात होते इतर राज्यांच्या तुलनेत आपल्या राज्याचे बटाट्याची सरासरी उत्पादकता फार कमी आहे.
खरिपातील कडधान्य पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान!!
उत्पादकता कमी असण्यामागे चांगल्या प्रतीच्या बियाण्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. तसेच बटाटा पीक प्रकृतीने नाजूक असल्यामुळे कीड व रोगांना बळी पडणारे आहे. त्यामुळे सुधारित तंत्रज्ञानाची जोड दिल्यास बटाटा उत्पादनात वाढ होते. त्या दृष्टीने बटाटा पिकाच्या लागवडी संदर्भात विस्तृत माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

Potato Crop 2025 हवामान:
बटाटा हे पीक मूळचे शीत हवामानातील असल्यामुळे थंड हवामान या पिकाच्या वाढीस अतिशय पोषक असते. बटाटा झाडांच्या जोमदार वाढीसाठी सुरुवातीला साधारण उष्ण 24 अंश सेल्सिअस तापमान अत्यंत पोषक असते. तर बटाटे पोसण्याच्या काळात कमी तापमान 17 ते 20 अंश अनुकूल असते. लागवडीच्या आणि वाढीच्या काळात अद्रतेचे प्रमाण 65 ते 80 टक्के आणि सूर्यप्रकाशाचे 10 तास प्रति दिवस आवश्यक असते.
Potato Crop 2025 जमीन:
बटाटा पिक कंद वर्गातील असल्याने लागवडीसाठी भुसभुशीत, मध्यम प्रतीचे चांगले सेंद्रिय घटक असणारी पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. जमिनीचा सामू 5 ते 6 च्या दरम्यान असावा.
Potato Crop 2025 बियाणाची निवड:
लागवडीसाठी बियाणे उत्तम दर्जाचे निरोगी भेसळमुक्त आणि खात्रीदायक असावे. बटाटा बियाणे शीतगृहात ठेवलेले असल्यामुळे ते लागवडीपूर्वी 8 दिवस पसरट, हवेशीर जागी, मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी ठेवणे आवश्यक असते. पूर्ण पोसलेले निरोगी व चांगले मोड आलेले बियाणे लागवडीसाठी निवडावे.

बियाणे प्रक्रिया:
बटाटा बियाणे प्रक्रियेसाठी 25 ग्रॅमकार्बेनडाइझम आणि इमिडाक्लोप्रिड 200 एस. एल. 4 मिली प्रतिनिधी 10 लिटर पाण्यात मिसळून 10 मिनिटे बेणे प्रक्रिया करून सदर बियाणे हवेशीर ठिकाणी ठेवावे व नंतर लागवडीसाठी वापरावे.
बटाटा लागवडीची पद्धत:
पूर्व मशागतीनंतर बटाट्याची लागवड सरी वरंबा पद्धतीने करावी लागवडी पूर्वी नांगराने 60 सेमी अंतरावर सरी पाडून घ्यावी. लागवडी पूर्वी रासायनिक खते सऱ्यात टाकून मातीने ती झाकून घ्यावी. प्रक्रिया केलेले मोड आलेले संपूर्ण बटाटे सरीच्या एका अंगाला खड्डा करून झाकावे 2 रोपातील अंतर 20 सेमी ठेवावे.
खत व्यवस्थापन:
लागवडीपूर्वी प्रती हेक्टरी 15 ते 20 चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे प्रती हेक्टरी 150:120 किलो या प्रमाणात नत्र, स्फुरद व पालाश या खतांची मात्रा द्यावी. यापैकी लागवडीच्या वेळी नत्राची अर्धी मात्रा तर स्फुरद आणि पालाची पूर्ण मात्रा द्यावे. नत्राची उर्वरित मात्रा लागवडीनंतर एक महिन्यांनी भर देण्यापूर्वी करावी.
Potato Crop 2025 पाणी व्यवस्थापन:
खरीप पिकासाठी पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. आवश्यकता भासल्यास उपलब्धतेच्या 60 टक्के ओलावा जमिनीत असेल त्यावेळी पाणी द्यावे. बटाटा पिकास थोडे थोडे आणि कमी अंतराने पाणी देणे फायद्याचे ठरते.
पिकाच्या संवेदनशील अवस्था:
उदाहरणार्थ रोप अवस्था (30 दिवस) बटाट्या तयार होणे (ते 60 दिवस) व बटाटे मोठे होण्याच्या अवस्थेत 75 दिवस या अवस्थेत पाण्याचा पुरवठा न झाल्यास उत्पादनात घट होते.

Potato Crop 2025 अंतर मशागत:
बटाट्याच्या पिकामध्ये तण काढणे, खुरपणी करणे, तसेच मातीचे भर देणे, ही कामे वेळेच्या वेळी करणे महत्त्वाचे आहे. आवश्यकतेनुसार 2 ते 3 वेळा खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे. लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी जमिनीत पोसणाऱ्या बटाट्यावर मातीचे भर द्यावी. त्यामुळे बटाटे चांगले पोसतात. आणि बटाटे जमिनी बाहेर येऊन सूर्यप्रकाशामुळे हिरवी पडत नाहीत.
एकात्मिक कीड व रोग नियंत्रण:
2-3 दिवसातून पिकाचे सर्वेक्षण करावे, बटाटा पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी व फुलकिडे या रस शोषण करणाऱ्या किडीला नियंत्रणासाठी निमयुक्त कीटकनाशक सुरुवातीच्या काळात वापरावे. प्रादुर्भाव वाढल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 15 मिली किंवा थायमेथॉक्झाम 25% दाणेदार 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार अलटून पालटून फवारावे.
पिवळ्या रंगाचे चिकट सापळे प्रत्येक 4 ते 5 ओळी नंतर लावावीत. लवकर तसेच उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास पाण्यात मिसळणारी मॅन्कोझेब भुकटी या बुरशीनाशकाचे 25 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त आढळल्यास मेटॅलॅक्झील अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे वापरावे.
बटाटा काढणी:
Potato Crop 2025 काढणीपूर्वी 8 दिवस पाणी देऊ नये, तसेच जमीन सुकू द्यावे. त्यामुळे बटाट्याची साल घट्ट होते काढणी नंतर बटाटे शेतात पडू न देता गोळा करून सावलीत आणावे व नंतर प्रतवारी करून मार्केट विक्रीस न्यावे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |