Pomegranate Orchards 2025 अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले डाळिंब सध्या वेगवेगळ्या अडचणीतून जात आहे. डाळिंबावरील विविध समस्यांपैकी तेलकटडाग रोग ही एक मोठी समस्या आहे. डाळिंब बागाची पाहणी केली असता तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पानावर, फुलांवर आणि फळांवर दिसून येत आहे.

Pomegranate Orchards 2025 अशा परिस्थितीत सर्व शेतकरी बांधवांना या लेखात दिलेल्या माहितीचा वापर करून आपली बाग तेलकट डाग रोगमुक्त ठेऊन डाळिंबाचे उतपादन वाढवावे.
घेवडा (राजमा) लागवडीचे तंत्रज्ञान!!
रोगाची लक्षणे – तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव पाने, फुले आणि फळांवर होतो. हा रोग जिवाणूजन्य असून झॅन्थोमोन्स अक्झॉनोपोडीस पुनिकी या जिवाणू मुळे होतो.

पान – सुरुवातीस पानावर तेलकट किंवा पाणथळ डाग पडतात हे डाग कालांतराने काळपट होतात. व डागाभोवती पिवळे वलय दिसते. उन्हात हे डाग बघितले की तेलासारखे चमकतात डाग मोठा झाला की पाणी पिवळी पडून गळून पडतात.
फुल – फुलांवर व कळ्यांवर काळपट डाग पडतात आणि हे डाग फुल व कळीसोबत हळूहळू वाढतात.
खोड – खोडावर आणि फांद्यांवर सुरुवातीला पाणथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी होतात. खोडावर या डागाने गर्डलिंग किंवा खाच तयार होते व तेथून झाड मोडते. तसेच फांद्यावर डागाची तीव्रता वाढली की फांद्या डागाच्या येथून मोडतात.
फळ – फळांवर सुसरुवातीला पाणथळ तेलकट डाग दिसतात. कालांतराने हे डाग तपकिरी काळपट पडतात. फळांवर लहान डाग एकत्र आले कि मोठ्या डागात रूपांतर होते. या डागामुळे फळांवर आडवे उभे तडे जातात. फळांची प्रत पूर्णपणे खराब होते. तडे मोठे झाले की, फळे इतर कारणाने सडतात आणि गळून पडतात.
Pomegranate Orchards 2025 रोगास अनुकूल बाबी:
रोगग्रस्त गुटी कलमांचा वापर करणे.
बागेत किंवा शेजारच्या बागेतील तेलकट डाग असणे
बागेत अस्वच्छता तणांची मोठ्या प्रमाणावर वाढ होणे.
झाडांची गर्दी खेळत्या हवेचा तसेच सूर्यप्रकाशाचा अभाव असणे.
ढगाळ व पावसाळी हवामान वादळी पाऊस आणि वातावरणातील आद्रता जास्त असणे.

डाळिंबावरील तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या बागांच्या पुनर्जीवनासाठी एम.पी.के.व्ही. वेळापत्रक
Pomegranate Orchards 2025 मागील हंगामात फळांची संपूर्ण काढणी झाल्यानंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम (2 ब्रोमो नायट्रोप्रोपेन 1-3 डायोल) फवारावे. जर फळ काढणी पावसाळ्यात झाली तर ब्रोमोपॉल 500 पीपीएम + कॅप्टन 0.5% फवारावे. (ब्रोमोपॉल 50 ग्रॅम + कॅप्टन 500 ग्रॅम प्रति 10 लि. पाणी)
संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला 3 महिने विश्रांती द्यावी. या काळात बाग निरोगी व स्वच्छ ठेवावी.
बहार घेण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून घ्यावी इथ्रेल 1 ते 2 मिली लिटर रोगट फांद्यांची छाटणी करावी.
झाडाच्या खोडाला निमओईल + ब्रोमोपॉल 500 पीपीएम + कॅप्टन 0.5 टक्केचा मुलामा द्यावा.
झाडाखालील व शेतात पडलेले पाने व छाटलेले रोगट अवशेष गोळा करून जाळून टाकावेत.
बागेत जमिनीवर ब्लिचिंग पावडर 60 किलो किंवा कॉपर डस्ट टक्के 20 कि. हेक्टर धुरळणी करावी.
पानगळ आणि छाटणीनंतर ब्रोमोपॉल 500 पीपीएम कॅप्टन 0.5 टक्के फवारावे.

तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी एम.पी.के.व्ही. वेळापत्रक
नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपॉल 250 पीपीएम बोर्डोमिश्रण 1 टक्का 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
पानांवर आणि फळांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर फवारणी चालू ठेवावी आणि रोग नसेल तर तीच दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
सदर औषधांची फवारणी फळ काढण्याच्या 30 दिवसांपूर्वी बंद करावी पावसाळी हंगामातील फवारणी फळ काढण्याच्या 20 दिवसांपूर्वी बंद करावी.
टिपणी: Pomegranate Orchards 2025
इतर बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारसी प्रमाणे नियंत्रण करावे.
उत्पादन वाढीसाठी आणि निरोगी बागेसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे करावे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |