Poisoning in Animals 2025 विष किंवा विषारी पदार्थांचा जनावरांच्या शरीरात प्रवेश होणे म्हणजेच विषबाधा होणे होय. विषबाधेचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात किंवा मृत्यू देखील ओढवू शकतो त्यामुळे जनावरांना विषबाधापासून वाचवले गेले पाहिजे.

Poisoning in Animals 2025 विषबाधेची महत्त्वाची लक्षणे:
लाळ गाळणे, जनावर थरथर कापणे, शरीर हेलपाटणे, अस्वस्थता, झटके देणे, पोट फुगणे, पाय लुळे पडणे.
जलद श्वासोस्वास, अशक्तपणा येणे, जुलाब लागणे, पोटात वेदना होणे, दात खाणे यांसारखे विषबाधेची लक्षणे दिसतात.
जनावरांमधील रोगांवर उपयुक्त अशी कापूर एरंडी ग्लिसरीन आणि स्टार्च!!
Poisoning in Animals 2025 विषबाधा होऊ नये यासाठी उपाय योजना:
तन नाशक व कीटकनाशक औषधांच्या रिकामा बाटल्या कॅन उघड्यावर फेकल्यास जनावरे ते चाटतात. त्यामुळे विषबाधा होऊ शकते त्या कॅन किंवा बाटल्याची योग्य विल्हेवाट लावावी. त्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये उदा. नाला, तळी, उपळ्याच्या जागा इ. ठिकाणी फेकू नयेत.

Poisoning in Animals 2025 जनावरातील गोचीड निर्मूलनाची औषधे आणि पिकांवर फवारायाची कीडनाशके वेगवेगळे ठेवावेत. गोचीड निर्मूलनाकरिता औषध वापरण्यापूर्वी त्यावरील लेबल वाचून खात्री करूनच वापरावी.
गवतावर तन नाशक फवारल्यानंतर शेताच्या बांधावर आपले जनावर जाणार नाही याची खबरदारी घ्यावी.
तणनाशके किंवा कीटकनाशके फवारल्यानंतर गवत व फळभाज्यांची अवशेष जनावरास खाऊ घालणे टाळावे किंवा जनावरे खाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
Poisoning in Animals 2025 उपचार:
विषबाधेची लक्षणे निदर्शनास येतात ताबडतोब नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
रसायनाच्या पाकिटांवर किंवा डब्यांवर विष नाशकाचे नाव दिले आहे का ते पाहावे हे नाव पशुतज्ज्ञाला सांगावे. त्यामुळे योग्य उपचार करण्यास मदत होते.
जनावरांना शांतता व आराम मिळेल असे वातावरण ठेवावे.
जनावरांना स्वच्छ चारा व भरपूर पाणी द्यावे, विषबाधा त्वचेमार्फत झाल्यास जनावरास भरपूर पाण्याने अंघोळ घालावी जनावरांचे शरीर घासू नये.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |