पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जून मध्ये; पण ‘हे’ कराल तरच मिळतील पैसे! PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जून पर्यंतचा विसावा हप्ता जूनमध्ये वितरित होणार आहे. विविध त्रुटींच्या पूर्तते अभावी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.

PM Kisan Yojana 2025

WhatsApp Group Join Now

बऱ्याच जिल्ह्यातील 31 मे पर्यंत शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण, मोहीम राबवून ई-केवायसी स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाते आधार सीडींग करणे, भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करण्यात येणार आहे.

भारत-पाक युद्धाचा केळी निर्यातीवर काय होतोय परिणाम? वाचा सविस्तर;

PM Kisan Yojana 2025 ई-केवायसी प्रमाणिकरणासाठी मोबाईल ॲप मधून चेहरा किंवा अंगठा स्कॅन करावा किंवा महा-ई-सेवा केंद्र, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.

नव्याने नोंदणीसाठी फेरफार पोर्टल वर माहिती अपलोड करावी किंवा महा-ई-सेवा केंद्रशी संपर्क साधावा. बँक आधार सीडींगसाठी, ‘नमो शेतकरी’ च्या लाभासाठी बँक शाखेशी संपर्क साधावा किंवा जवळच्या पोस्टात डीबीटी खाते उघडावे.

WhatsApp Group Join Now

PM Kisan Yojana 2025 केंद्र शासन पीएम किसानचा 20 वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार असून, त्यापूर्वी प्रलंबित बाबीची पूर्तता व्हावी. पीएम किसान झाला भारतीयांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ होईल.

शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शासनाने फार्मर आयडीची सक्ती केली आहे. पीएम किसान पेन्शनचा लाभ घेणारे परंतु फार्मर आयडी न काढणारे या योजनेला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे फार्मर शेतकऱ्यांनी आयडीही काढून घ्यावा.

दोन्ही योजनांच्या लाभासाठी 31 मे पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment