पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहात? मग ‘या’ योजनेत सहभागी होण्याची आली आहे सुवर्णसंधी! PM Kisan Yojana 2025

PM Kisan Yojana 2025 पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यांना 2 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठीची अर्ज प्रक्रिया 15 एप्रिल पासून सुरू होणार आहे.

PM Kisan Yojana 2025

पंतप्रधान किसान योजना योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात.

सोलापूरपेक्षा धाराशिव बाजारात लाल कांद्याला कसा बाजारभाव? वाचा सविस्तर;

आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते जमा झाले आहेत. म्हणजे 38 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. या योजनेचा 20 हप्ताही लवकरच जारी केला जाणार आहे. पण, याच्या लाभापासून विविध कारणांनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे का नाही? असा प्रश्न पुढे येत होता.

WhatsApp Group Join Now

कागदपत्रातील त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. शेतीचा वारसा बदलणे, शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याची मालकी बदलणे आदी कारणांनी शेतकरी लाभापासून वंचित आहेत.

काहींच्या बँक खात्यात त्रुटी आहेत, तर काहींना सुरुवातीचे काही हप्ते मिळून नंतर बंद झाले आहेत. लाभ मिळावा यासाठी शेतकरी तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देत आहेत.

PM Kisan Yojana 2025 या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. 15 एप्रिल पासून नव्याने नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या योजनेअंतर्गत लहान शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदीमध्ये नोंदवलेले असावे.

तसेच, आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असावेत. या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळणार का? याबाबत मात्र स्पष्टता नाही.

PM Kisan Yojana 2025 लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी असा करावा अर्ज…

  • खाली दिलेल्या योजनेचे अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
  • नवीन शेतकरी हा पर्याय निवडावा.
  • राज्य, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक नोंदवावा, ओटीपी नोंदवावा.
  • शेतकऱ्याची व्यक्तिगत माहिती, जमिनीची माहिती, बँक खाते ही माहिती भरून अर्ज सबमिट करावा.
  • तलाठी कार्यालय, कृषी सहायक, कॉमन सेवा केंद्रातून ऑफलाईन अर्जही भरता येतील.

WhatsApp Group Join Now
अधिकृत लिंकयेथे क्लिक करा
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment