मोठी बातमी; शेतकऱ्यांना आता वर्षाला 15 हजार मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा, PM Kisan Sanman Nidhi Yojana 2025

PM Kisan Sanman Nidhi Yojana 2025 पीएम किसान योजनेत राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून वर्षाला 15 हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 PM Kisan Sanman Nidhi Yojana 2025

नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा त्यावर विरोधकांकडून टीका झाली. पण आज शेतकऱ्यांच्या अडचणीत तो पैसे कामात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. परिणामी, राज्य सरकार देखील आपले पैसे यात देत असून त्यात वाढ देखील केली जाईल. त्यामुळे वर्षाला 15 हजार रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते (ऑनलाइन) वितरण होत आहे. नागपूरच्या वनामती सभागृहात हा कार्यक्रम पार पडत असून या ठिकाणी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना ही घोषणा केली आहे.  

दिलासादायक ! दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत अनुदान खात्यात जमा होणार; अनुदानासाठी 759 कोटी रुपयांना मंजुरी…

PM Kisan Sanman Nidhi Yojana 2025 चांगलं काम करणाऱ्यांचा हप्ता थांबवू नका, अधिकाऱ्यांना सूचना – देवेंद्र फडणवीस

मी मुख्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात अनेक काम केलेत. त्यात जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली.  आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय, पूर्ण विदर्भ, मराठवाडा यात समाविष्ट होईल. यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर दुसरीकडे कृषी प्रक्रिया उद्योग, कॅश क्रॉपसाठी मदत केली जाणार आहे.

WhatsApp Group Join Now

किंबहुना चांगलं काम करणाऱ्यांचा हप्ता थांबवू नका अशी सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ऍग्रीस्टॉकमुळे दलाल विरहित शेतीपर्यंत पोहोचण्याचा साधन होत आहे. आतापर्यंत 54 टक्के शेतकरी यात सामील झाले असून पुढील काळात 100 टक्के शेतकरी यात आणायचे आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

PM Kisan Sanman Nidhi Yojana 2025 तर 7 जिल्ह्यातील 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार – देवेंद्र फडणवीस

शेतकरी उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गावातील सोसायटी डिजिटल केले जात आहे. त्यांना आणखी मजबूत केलं जातं आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं असून पुढील पाच वर्ष वीज बिल येणार नाही. शिवाय कृषी सोलर पंप योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा पासून मागल्या वर्षी पर्यंत 2 लाख कनेक्शन, तर गेल्या 1 वर्षात दोन लाख कनेक्शन दिले गेलेत. त्याचा पूर्ण देखरेख इन्शुरन्स आमच्याकडे आहे. वैनगंगा, नळगंगा हा नदी जोड प्रकल्प सुरू होत असून यातून 7 जिल्ह्यातील 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. केंद्र आणि राज्यसरकार शेतकरी समर्पित असल्याची भावना ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवली.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment