PM Kisan Hapta 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टर्सनुसार, 20 जून रोजी हा हप्ता जारी केला जाऊ शकतो. पण अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. केंद्र सरकार या योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते.
संत्र्यासह ‘या’ फळ पिकांची विमा मुदत वाढवली, आजचा विमा उतरवून घ्या!
पंतप्रधान मोदींनी 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांच्या बिहार दौऱ्यात या योजनेचा 19 वा हप्ता शेवटचा जारी केला होता, आणि तेव्हापासून शेतकरी विसाव्या हाताच्या आतुरतेने वाट पाहत आहेत .
WhatsApp Group
Join Now

PM Kisan Hapta 2025 तर पैसे मिळणार नाहीत
- पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
- नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ओटीपी आधारित केवायसी करणे आता अनिवार्य आहे.
- जर तुमची एक केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
PM Kisan Hapta 2025 पीएम किसान यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?
- तुम्हाला 20 वा हप्ता मिळणार की नाही, हे तपासणे खूप सोपे आहे.
- सर्वात आधी पीएम किसानच्या खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जा.
- वेबसाईटवर ‘लाभार्थी यादी’ (Beneficiary List) लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचे राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर ‘गेट रिपोर्ट’ (Get Report) वर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल जिथे तुमचे नाव तपासू शकता.
पीएम किसान अधिकृत लिंक | https://pmkisan.gov.in/ |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |