पीएम किसानचा 20 आणि 21वा हफ्ता ‘या’ महिन्यात येण्याची शक्यता, वाचा सविस्तर; PM Kisan Hafta 2025

PM Kisan Hafta 2025 देशातील शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसानचा 19 वा हफ्ता वितरित करण्यात आला होता. अशा स्थितीत पुढील दोन हफ्ताबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. म्हणजेच पीएम किसानच्या 20 आणि 21 वा हफ्ता कोणत्या महिन्यात येऊ शकतो, या प्रश्नाचे उत्तर या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत…..

PM Kisan Hafta 2025

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हफ्त्यांमध्ये आर्थिक मदत मिळते. या योजनेचा मुख्य उद्देशाने लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे आहे. सरकारने 24 फेब्रुवारी 2025 रोजी 19 वा हप्ता जारी केला होता. ज्यामध्ये 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले होते. यामध्ये 2.41 कोटी महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता.

द्राक्ष बागेची एप्रिल महिन्यातील खरड छाटणी कशी करावी, वाचा सविस्तर;

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19 वा हफ्ता फेब्रुवारी 2025 मध्ये आला होता. त्यामुळे 20 वा हफ्ता जून 2025 मध्ये येण्याची अपेक्षा आहे. यानंतर 21 वा हफ्ता ऑक्टोबर 2025 मध्ये येऊ शकतो. तथापि, सरकार लवकरच त्याची अधिकृत तारीख जाहीर करेल. तत्पूर्वी जे शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून वंचित आहेत, अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे, जेणेकरून त्यांना हफ्ता मिळविण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

WhatsApp Group Join Now

PM Kisan Hafta 2025! विसाव्या (20) हफ्त्याची अपेक्षा

आता शेतकरी 20 व्या हफ्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आता शेतकऱ्यांना जून 2025 मध्ये 20 हफ्ता मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, सरकारने अद्याप त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये मिळतात. ते त्यांच्या बँक खात्यात तीन समान हफ्त्यांमध्ये पाठवले जातात. ही योजना शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जापासून वाचवण्यास देखील मदत करते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment