Planting Sunflowers 2025 महाराष्ट्रात तेलबिया मध्ये भुईमुगाच्या पाठोपाठ सुर्यफुल हे एक पीक घेतले जाते. भारतातील सूर्यफूल लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ 70% क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे.

Planting Sunflowers 2025 खरीप हंगामात उशिरा पेरणीसाठी योग्य व उपयुक्त असे पीक म्हणून सूर्यफुलास प्राधान्य दिले जाते. वर्षभर तिन्ही हंगामात घेतले जाणारे तेलबिया पीक खरिपात 15 जून ते 15 जुलै दरम्यान पेरणीची शिफारस असली तरी पाऊसमान उशिरा सुरु झाल्यास किंवा खरीप पिकाची दुबार पेरणी झाल्यास सूर्यफूल पीक घेण्याचा विचार केल्यास पक्ष वाया जाण्याचा किंवा कमी उत्पादन मिळण्याचा धोका टळतो.
‘या’ ठिकाणी 50 टक्के अनुदानावर मिळतायत हरभरा बियाणे!!
Planting Sunflowers 2025 दिवसेंदिवस या पिकाखालील क्षेत्रात होणारी घट ही एक चिंतेचे बाब आहे. जगात सोयाबीन खालोखाल सूर्यफूल हे एक महत्त्वाचे खाद्यतेल आहे. सूर्यफुलाची उत्पादकता 600 किलो ग्रॅम हेक्टर म्हणजे जागतिक सरासरी उत्पादकतेच्या 1200 किलो ग्रॅम हेक्टर निम्मी आहे. सूर्यफुलाची लागवड वाढवणे बरोबर उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे.

सूर्यफुलाची उत्पादकता वाढवण्यासाठी पूर्व मशागत, योग्य जमिनीची निवड, सूर्यफुलाच्या सुधारित संकरित जातीचा वापर, वेळेवर पेरणी, प्रती हेक्टरी बियाणे वापर, पेरणी अंतर, संतुलित खते, पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, कीड रोग व्यवस्थापन, त्याचबरोबरिने परागीभवन वाढवण्यासाठी योग्य ते नियोजन, पक्षांपासून संरक्षण, तसेच वेळेवर काढणी, इत्यादी. गोष्टींचा सुयोग्य विचार होणे आवश्यक आहे.
सूर्यफुलाचे आहारातील महत्व:
Planting Sunflowers 2025 सूर्यकुला तेलाचे प्रमाण 38 ते 45 टक्के इतके असते, तर प्रथिनांचे प्रमाण 14 ते 19 टक्के जास्त लिनोलिक आम्लाचे प्रमाण तसेच अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्टॅबिलिटीमुळे त्यांना तळणासाठी चांगले म्हणून सूर्यफूल तेलास आहारात महत्त्वाचे स्थान आहे.
हवामान: सूर्यफूल हे पीक वर्षभर घेता येणारे पीक आहे. वर्षभरातील हवामान घेणारे पीक म्हणून सर्व हंगामात घेता येते.
जमिन: या पिकासाठी योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
पूर्व मशागत: पिकाच्या वाढीसाठी भुसभुशीत जमीन तयार करावी.
हलकी जमीन: नांगरणी, वखरणी, फिरवून ढेकळे मोडावीत.
मध्यम जमीन: दोन-तीन कुळव्याच्या पाळ्या, जमिनीत सुयोग्य वापसा असताना केल्यास पुरेशा होतात.
सुधारित वाण: उत्पादन क्षमता 10 ते 12 क्विंटल हेक्टर.
वाण | कालावधी | वैशिष्ट्ये |
मॉडर्न | 75-80 दिवस | लवकर पक्व होणारा कोरडवाहू लागवडीस योग्य |
एस. एस.-56 | 85-85 दिवस | अधिक उत्पादकता, कोरडवाहू लागवडीस योग्य |
ई.सी.-68414 | 100-100 दिवस | अधिक उत्पादन, उशिरा पेरणीस योग्य, खरीपासाठी चांगला |
भानू | 85-90 दिवस | सर्व हंगामासाठी तसेच आवर्षण प्रवण विभागासाठी चांगला |
के. बी. एस. एच.-1 | 90-95 दिवस | तेलाचे प्रमाण अधिक |
एल. डी. एम. आर. एस. एच.-1,3 | 85-90 दिवस | केवडा रोगास प्रतिकारक्षम, लवकर येणारा वाण |
एम. एस. एफ. एच.-17 | 100-105 दिवस | अधिक उत्पादनक्षम |
के. बी. एस. एच.-44 | 90-95 दिवस | अधिक उत्पादनक्षम |
फुले रविराज | 90-95 दिवस | अधिक उत्पादनक्षम, उशिरा पेरणीस योग्य, बड नेक्रोसिस रोगाला रोगास प्रतिकारक |
Planting Sunflowers 2025 हंगाम:
सूर्यफुलाचे पीक जरी वर्षभर तीनही हंगामात घेता येत असले तरी पेरणीची वेळ पाण्याची उपलब्धता पाहून निश्चितच करावी लागते. कारण सूर्यफुलाला पाण्याचा ताण सहन होत नाही. तसेच पिकाची फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था सततच्या पावसात जास्त प्रमाणात सापडणार नाही याचे नियोजन करावे कारण या दोन्हीही गोष्टी उत्पादनावर परिणाम करणाऱ्या आहेत.
खरीप: जमीन- हलकी, भारी पेरणीची वेळ 15 जून ते 15 जुलै, 15 ऑगस्ट ते पर्यंत पेरणी करता येते.
रब्बी: 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
उन्हाळी: जानेवारीचा पहिला आठवडा ते फेब्रुवारीचा पहिला अठवडा
बियाणे बीज प्रक्रिया आणि पेरणी:
अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी योग्य हेक्टरी झाडांची संख्या असणे आवश्यक आहे. त्यासाठी सुधारित व संकरित जातीचे बियाणे योग्य प्रमाणात वापरावे. बियांच्या लवकर उगवण्यासाठी पेरणीपूर्वी बियाणे 12-14 तास पाण्यात भिजवून सावलीत वाळवावे. बियाण्यास 2-3 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.
सूर्यफुलाची पेरणी जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळे अंतरावर पेरणी यंत्राच्या साह्याने करावी. टोकन पद्धतीने सुद्धा सूर्यफूल पेरता येते. बियाणांची बचत होते सूर्यफूल 5 सेमी पेक्षा जास्त खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.
Planting Sunflowers 2025 खत व्यवस्थापन:
सूर्यफुलाचे पीक हे रासायनिक खतांना चांगला प्रतिसाद देत असल्याने संतुलित खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सूर्यफुलास नत्र स्फुरद पालाश या मुख्य अन्नद्रव्यांबरोबर सल्फर या अन्नद्रव्याची गरज आहे.
Planting Sunflowers 2025 सूक्ष्म अन्नद्रव्ये:
ज्या जमिनीत लोह, मॅगनीज व मॉलिब्डेन कमी आहे अशा जमिनीत ही सूक्ष्मअन्नद्रव्य शिफारशी प्रमाणे दिले असता उत्पादनात वाढ होते. फुले उमलण्याच्या वेळी बोरॅक्सची 0.2% फवारणी केल्यास दाणे भरण्याचे प्रमाण तसेच तेलाचे प्रमाण वाढते, तर 1.0 टक्के या प्रमाणात झिंक सल्फेटची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.
Planting Sunflowers 2025 पाणी व्यवस्थापन:
सूर्यफूल हे पाण्यासाठी अति संवेदनशील असे पीक आहे. सूर्यफुलाच्या एकूण पाणी वापराचा विचार केल्यास 20 टक्के पाणी वाढीसाठी 55 टक्के पाणी फुलोरा अवस्थेत तर उरलेले 25 टक्के पाणी हे दाणे भरण्यासाठी उपयोगात आणले जाते. म्हणून सूर्यफुलात पुढील अवस्था फारच संवेदनशील आहेत. साधारणपणे खरिपात 3-4 पाण्याच्या पाळ्या जमिनीच्या प्रतवारीनुसार आवश्यक आहेत.
तण नियंत्रण:
सूर्यफुलास फुटवे किंवा फांद्या फुटत असल्याने त्यांची वाढीस अनुकूल असे वातावरण तयार होते म्हणून तण नियंत्रण करण्याच्या दृष्टीने तण विहिरीत ठेवावे. तण नियंत्रण करण्यासाठी 15 दिवसांच्या अंतराने 2 कोळपण्या व एक खुरपणी करावी. त्याचबरोबर रासायनिक तणनाशके वापरून नियंत्रण करता येते. त्यासाठी पेरणीपूर्व व पेरणीनंतर अशी वेगवेगळी तननाशके वापरता येतात.

पेरणीपूर्वी वापरावयाची तणनाशके: ट्रायफ्लुरॅलिन 0.5 ते 1 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी पाण्यातून फवारावे.
पेरणी नंतर वापरावयाची तणनाशके: पेंडीमिथिलिन 30 टक्के इसी 0.75 ते 1 किलो क्रियाशील घटक प्रति हेक्टरी किंवा अलक्लॉर 1 ते 1.5 किलो क्रियाशील घटक यापैकी एकाची 500 लिटर पाण्यातून पेरणीनंतर पीक उगवणी अगोदर फवारणी घ्यावी व त्यांनतर गरजेनुसार 25 ते 3 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करून पीक तनवीहरित ठेवावे.
पीक संरक्षण: सूर्यफुलावरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी आणि घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. या जैविक कीडनाशकाची फवारणी करावी.
परागीभवन:
सूर्यफुलाचे उत्पादन वाढवण्यासाठी पीक फुलोऱ्यात असताना सकाळी 7 ते 11 या वेळेत तलम कापड हातावर गुंडाळून फुलावर हात फिरवावा म्हणजे परागीभवन होईल तसेच मधमाशा सोडून परागीभवन केल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. सूर्यफुलाच्या अधिक उत्पादनासाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
संकरित आणि जास्त कालावधी असलेले वाण भारी जमिनीवर 60 सेमी अंतरावर लावावेत तर कमी कालावधीचे आणि बुटके वाण 45 सेमी वर लावावेत.
सूर्यफुलाचे पीक हे अन्नद्रव्य मिळवण्याच्या स्पर्धेला फारच संवेदनक्षम असल्याने एका ठिकाणी एकच रोप राहतील यासाठी 10 ते 15 दिवसांनी विरळणी करावी. अधिक उत्पादनासाठी तसेच कोरडवाहू पिकांसाठी विरळणी करणे फारच आवश्यक्य आहे.
खत व्यवस्थापन करताना मुख्य अन्नद्रव्यांबरोबर सल्फर या दुय्यम अन्नद्रव्याची 25 प्रति हेक्टरी या प्रमाणात खत मात्रा पेरणी वेळी घ्यावी.
खरिपात पावसाने दांडी मारल्यास संरक्षित पाणी द्यावे.
पक्षांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करा वी करावी.
परागीभवन वाढवण्यासाठी मधमाशांच्या पेट्या ठेवाव्यात तसेच सकाळच्यावेळी तलम कापड हातावर गुंडाळून फुलावर हात फिरवावा म्हणजे परागीभवन होईल.
Planting Sunflowers 2025 काढणी:
पक्व झालेली फुले खाली वाकतात त्यावेळी पिकाची काढणी करावी, विळ्याच्या साहाय्याने फुले कापून 2-3 दिवस उन्हात वाळवावीत. सूर्यफुलाची सूर्यफुलाची मळणी यंत्राच्या साह्याने वेगळे करावे व उन्हात वाळवावे जेणे करून बी साठवणीयोग्य होईल.
उत्पादन: सूर्यफुलापासून 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन मिळते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |