आले लागवड!! Planting Ginger 2025

Planting Ginger 2025 आले पौराणिक काळापासून लागवड करतात आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जीवनातील मसाल्यात आल्याचे महत्त्व स्थान आहे. ओल्या आले प्रक्रिया करून पिकवलेले आले अथवा सुंठ अशा स्वरूपात आल्याचा उपयोग करतात. जमिनीतील आल्याचा खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात.

Planting Ginger 2025

WhatsApp Group Join Now

हवामान व जमीन: Planting Ginger 2025

आल्याला उष्ण व दमट हवामान मानवते थंडीमुळे आल्याची पालेवाढ थांबते व जमिनीत खोडाची वाढ सुरू होते. मात्र शेतकऱ्यांच्या अनुभवावरून असेही लक्षात आले की, साताऱ्यापासून मराठवाड्यापर्यंत पीक येऊ शकते. समुद्रकिनाऱ्याच्या भागात येथे 200 सेंमी किंवा थोडा जास्तच पाऊस पडतो. तेथे पावसाळी पाण्यावर घेतले जाते समुद्रसपाटीपासून 100 ते 1500 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात आल्याची लागवड करता येते.

अखेर 20 हजार रुपयांचा धान बोनस आला, ‘या’ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार!!

Planting Ginger 2025 आल्यासाठी मध्यम खोलीची उत्तम निचरा असलेले कसदार जमीन उत्तम असते. नदीकाठच्या पोयट्याच्या गाळमिश्रित जमिनीत आले उत्तम येते. जमिनीवर पाणी तुंबून राहिलेले या पिकास नुकसानकारक असते. तसेच जमिनीत विमलतेचे प्रमाण जास्त नसावे, एकाच जमिनीत मात्र वरचेवर आले घेऊ नये कारण, त्यावर येणाऱ्या मर रोगाचे नियंत्रण करणे अवघड जाते.

WhatsApp Group Join Now

पूर्व मशागत: Planting Ginger 2025

आल्याचे गड्डे जमिनीत वाढत असल्यामुळे सखोल पूर्व मशागत करणे गरजेचे असते. जमीन लोखंडी नांगराणे 30 ते 40 सेमी खोल उभी आडवी नांगरून घ्यावी. कुळव्याच्या पाळ्या देऊन माती भुसभुशीत करून घ्यावी. या पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची आखणी निरनिराळ्या पद्धतीने केली जाते. हळव्या जमिनीत सपाट वाफे पद्धत मध्यम व भारी जमिनीत सरीवर वरंबे पद्धत वापरतात. जमिनीत हेक्‍टरी 40 गड्ड्यांपर्यंत 20 टन शेणखत टाकावे.

Planting Ginger 2025 महाराष्ट्रातील काळ्या जमिनीत रुंद वरंबाची पद्धत फायदेशीर ठरले आहे. सपाट वाफे 3 बाय 2 मीटर आकाराचे असतात. 2 वरंब्यात 60 सेमी अंतर ठेवतात. तर गादीवाफ्यावर लागवड करताना 3 बाय 1 मीटर आकाराच्या 15 ते 20 सेमी उंच वाफ्यावर लागवड करतात.

बियाणाची निवड लागवडीची वेळ

Planting Ginger 2025 महाराष्ट्रात माहीम या स्थानिक जातीची लागवड करतात या जातीमध्ये मोठ्या व अंगऱ्या असे दोन प्रकार आढळतात. चांगल्या प्रतीचे निरोगी 3 ते 5 सेमी लांबी व अंदाजे 20-25 ग्रॅम वजनाचे आणि 2-3कोंब रुजण्याइतपत डोळे असलेले बेणे निवडावे. एक हेक्टर लागवडीस साधारणपणे 1000 ते 1200 किलो बेणे लागते.

साध्या वाफ्यात आल्याची लागण 25 बाय 22.5 सेमी अंतरावर करतात. बेणे 4 ते 5 सेमी खोल लावून मातीने झाकावे लागण कोरडीत करून हलके पाणी सोडून वाफे भिजवतात. गड्डा लावताना कोबीची टोके जमिनीच्या वरच्या बाजूस येथील अशी काळजी घेऊन लागण करावी.

आले कीड रोगाला नाजूक असल्याने कंद लागवडीच्या वेळी प्रतिबंधक उपाय म्हणून डायथेन झेड 78 आणि निमाक्रोम अनुक्रमे 250 ग्रॅम आणि 100 मि.लि. 100 लिटर पाण्याच्या मिश्रणात बुडवून लावावेत. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आल्याची लागवड करतात.

अंतर मशागत: Planting Ginger 2025

लागवडीनंतर 15-20 दिवसात कोंब जमिनीच्या वर दिसू लागतात. त्यानंतर लगेच कोंबांना धक्का न लागेल अशी काळजी घेऊन वाफ्यातील तण काढून घ्यावेत. वेळोवेळी हात खुरपणी करून तण काढावे पीक 120 दिवसांचे झाल्यावर हलकी खांदणी करून दुसरा वरखताचा हप्ता द्यावा. त्यामुळे गड्यांची नीट वाढ होण्यास मदत होते.

पाणी : लागण होताच एक हलके पाणी द्यावे पाऊसमान लक्षात घेऊन दर 6 ते 8 दिवसांनी पिकास पाणी द्यावे पिकात पाणी साचून राहू नये याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.

वरखते : लावणीच्या वेळेस 100 किलो अमोनियम सल्फेट 300 किलो सुपर फॉस्फेट व 80 किलो म्युरेट ऑफ पोटॅश वाफ्यात टाकावे त्यानंतर 6 ते 8 आठवड्याने 50 किलो व 120 दिवसांनी 100 किलो युरिया द्यावा.

काढणी व उत्पादन: Planting Ginger 2025

आल्याचे पीक 7 महिन्यात तयार होते. मात्र आली सुंठी करता लावले असल्यास 8.5 ते 9 महिन्यात पिक तयार होते. जानेवारी महिन्यात पाणी पिवळी पडून वागू लागतात. वाळलेला पाला कापून पालापाचोळा वेचून घ्यावा. कुदळीने खोदून आल्याच्या गड्ड्यांची काढणी करतात. खणताना गड्ड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. आले वेचून पाण्याने स्वच्छ धुऊन गड्डे व बोटे वेगवेगळी करावीत. उत्पादन 10 ते 15 टणांपर्यंत येऊ शकते.

काढण्याच्या वेळी चांगला भाव नसेल तर आले न काढता त्यास दर 10 दिवसांनी पाणी देणे चालू ठेवतात. एप्रिल अखेर कंदांवर पुन्हा फुटवे येऊन त्यांची वाढ सुरू होते. त्यानंतर त्यास वाढ व पोषणासाठी आधीच्या पोषणा इतकेच खते द्यावीत. अशा द्विहंगामी पिकाची काढणी पुढील ऑगस्टमध्ये करतात. या पिकाचे उत्पादन हे हेक्टरी 30-40 टनापर्यंत येते.

सुंठ तयार करणे

आले जमिनीतून काढायला नंतर त्यावरील माती पाण्याने धुऊन काढतात व आले स्वच्छ करतात. उन्हात सूकवल्यानंतर हे आले पुन्हा पाण्यात भिजू देतात. साल नरम झाल्यावर आणि पाण्यातून काढून त्यावरील साल कोरड्या फडक्याने घासून काढतात. त्यानंतर चुन्याच्या निवळीत तीन टप्प्याने दिसत ठेवावे.

नंतर हवाबंद खोलीत गंधकाची धुरी देतात. परत उन्हात सुकवून 6 तास गंधकाची धुरी देतात. नंतर उन्हात चांगले सुकवतात अशा तऱ्हेने तयार झालेले सुंठ ओल्या आल्याच्या मानाने 15 ते 20 टक्के या प्रमाणात मिळते. दर हेक्टरी 7500 किलो आले किंवा 1850 किलो सुंठ मिळते.

कीड व रोग

कीड : खोडमाशी : ही माशी खोडावर उपद्रव करते या माशीच्या नियंत्रणासाठी 100 मिली कोणतेही कीटकनाशक 100 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

कंदमाशी : या माशीच्या नियंत्रणासाठी 10 दाणेदार फोरेट, हेक्टरी 20 किलो टाकतात.

उन्नी : या केळीचा प्रादुर्भाव आढळल्यास जमिनीत आलेला होताच दहा टक्के बी.एच.सी. 50 किलो हेक्टरी प्रमाणे खताबरोबर मिसळावी तसेच बी.एच.सी. बरोबर 500 किलो निमपेंड दिली तर किड नियंत्रण होऊन पिकाला खतही मिळते.

रोग : नरम कुज : जमिनीत पाण्याचा निचरा बरोबर न झाल्याने या रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेंड्यांकडून झाड वाळत जाते, बुंध्यांचा भाग सडल्यामुळे सहज उपटला जाऊ शकतो. त्यानंतर जमिनीतील गाठी खराब होण्यास सुरुवात होते.

उपाय :

  1. रोगट झाडे समूळ उपटून नष्ट करावे.
  2. लावणीपूर्वी व नंतर दर महिन्यात जमिनीवर पिकावर 5:5:50 चे बोर्डोमिश्रण फवारावे.
  3. पिकाचा फेरपालट उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत लागवड अत्यावश्यक

योजना:

Planting Ginger 2025 केंद्र पुरस्कृत मसाला पीक विकास योजनेअंतर्गत सुधारित जाती तंत्रज्ञान इत्यादींचा प्रसार होण्याकरिता शेतकऱ्यांना आल्याचे 10 आरचे प्रात्यक्षिक प्लॉटला येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 1200 रुपये देण्यात येतात. परसबागेतील आल्याची लागवड करण्याकरिता 5 किलो बेणे आणि पीक संरक्षणासाठी औषधे असे एकूण 50 रुपयांचे मिनिकीट 50 टक्के अनुदानावर पुरवण्यात येते. पीक संरक्षणाकरिता खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त रुपये 100/- चे मर्यादित अनुदान देण्यात येते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment