नवीन फळबाग लागवड पूर्वतयारी!! Planting a New Orchard 2025

Planting a New Orchard 2025 राज्यामध्ये सन 1990-91 पासून रोजगार हमी अंतर्गत 100 टक्के अनुदानित फळझाड लागवड ही महत्त्वाकांक्षा योजना सुरू झाली. तेव्हापासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर रुजली. फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरलं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये राज्यात आतापर्यंत 18 लाख हेक्टर अधिक क्षेत्रावर फळभागा उभे आहेत. परंतु अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या महत्त्वाच्या बाबी आहेत.

Planting a New Orchard 2025

WhatsApp Group Join Now

फळबागेच्या यशस्वी लागवडीकरिता महत्त्वाच्या बाबी कोणत्या?

Planting a New Orchard 2025 आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारचे आहे? आपल्या जमिनीत फळ झाडे येतील का? बारामाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का? आपल्या हवामानात फळझाडे कोणत्या प्रकारची येऊ शकतील? मातीची व पाण्याची तपासणी केली आहे काय? बागेसाठी उत्तम जातीवंत कलमे कोठून उपलब्ध होऊ शकतील? जी बाग आपण लावणार आहोत त्याच बाजारपेठ उपलब्ध आहे काय? प्रक्रिया उद्योग आहेत काय? अशा सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच आपणास कोणती फळझाडे लावायला हवी त्याचा विचार करणे महत्त्वाचे ठरते.

सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी नवीन आशा!!

फळबाग म्हणजे 5 ते 6 महिन्यांच्या पिकांच्या मशागतीची गोष्ट असते. तो एक दीर्घकाळ चालणारा व्यवसाय म्हणायला हरकत नाही. एकदा त्यात पडले की थांबून चालत नाही. अनेक वर्ष सातत्याने चिकाटीने बागेचे फळउत्पादन हाती येईपर्यंत कष्ट करावे लागतात. मेहनत घ्यावी लागते, कधी कधी पैसा अपुरा पडतो, पाणी पुरत नाही, भावनेच्या भरात एखादी बाग करावयाची ठरवले जाते आणि मग धाडस निभाविकता येत नाही. सगळा पसारा अर्ध्यावर सोडावा लागतो. त्यामुळे केलेल्या कष्टाचे पैशाची अनाठाई नासाडी होते त्यामुळे फळबाग लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजनांची नितांत आवश्यकता आहे.

WhatsApp Group Join Now

Planting a New Orchard 2025 फळबागेसाठी जमिनीची निवड

फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी 1 मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमीन निवडावी भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत मध्यम पोताची जमिनीचा सामू 6 ते 7.5 पर्यंत असावा. मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% पेक्षा कमी असावे. जमिनीचा उतारा 2 ते 3 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा ज्या ठिकाणी फळबाग लावायचे आहे. त्या ठिकाणाच्या मातीचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.

जमिनीचा प्रकारफळपिके
हलकी ते मध्यमअंजीर, पेरू, डाळिंब, कागदी लिंबू, द्राक्षे, पपई, सिताफळ, बोर, करवंद, जांभूळ, कवट, चिंच.
मध्यमचिकू, आंबा, संत्री, मोसंबी, काजू, नारळ.
भारीकेळी

माती परीक्षण करण्यासाठी फळबाग क्षेत्रातील मातीचा नमुना कसा घ्यावा?

फळबागे करिता मातीचा नमुना घेताना जमिनीचे प्रकरणानुसार प्रतिनिधी नमुना घ्यावा. सर्वप्रथम 3*3*3 फूट खोलीचा 100 सें.मी. किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रतिनिधी नमुना काढावा व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून तपासण्यासाठी पाठवावा. माती परीक्षणाप्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक्य आहे. आपले विहिरीचे, बोरचे पाणी क्षारयुक्त व मचूळ असू नये. तेव्हा मातीबरोबरच पाण्याचे ही रासायनिक परीक्षण करून घ्यावे आणि त्या अनुषंगानेच फळझाडांची निवड करावी.

Planting a New Orchard 2025 फळबागेसाठी पाण्याची उपलब्धता

बागायती फळझाडांना नियमित पाणी द्यावे लागते अशा बागायती फळझाडांची लागवड करताना कितपत पाणीपुरवठा पुरेल किंवा पाण्याची उपलब्धता किती आहे याचा विचार करूनच नियोजन करावे. कोरडवाहू किंवा पिकांना लागवडीच्या सुरुवातस पहिली 3 ते 4 वर्ष चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. नारळ, सुपारी, केळी, पपई, चीकु, मसाला पिके, यांना इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते.

तसेच फळझाडांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता आवश्यक्य फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता असते म्हणून पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळझाडांची निवड करावी आपल्याकडे 12 महिने पाण्याची सोय असेल तर ज्या फळझाडांना बाराही महिने पाणी लागते. अशा फळझाडांची निवड करावी. आपल्याला पाणी 8 महिने पुरत असेल तर पेरू सारखे फळझाडे लावावीत. आपले पाणी फक्त सहा महिने पुरात असेल तर सिताफळ, रामफळ, आवळा, बोर यांसारखे कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी.

Planting a New Orchard 2025 फळबाग लागवडीचे योग्य वेळ कोणती?

खात्रीशीर पाऊस झाल्यावर पावसाच्या सुरुवातीस जून महिना आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. अति पावसात अथवा पावसाच्या शेवटी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फळझाड लागवड करू नये. पावसाच्या सुरुवातीस लागवड केलेली झाडे चांगले समाधान कारक वाढतात काही कालावधी करिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात जून जुलैपर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ जोमाने होते.

फळबाग यशस्वी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Planting a New Orchard 2025 जमिनीची निवड हवामानानुसार फळझाडांची लागवड पाण्याचे उपलब्धता फळबागाची आखणी योग्य कलमांची निवड लागवडीची योग्य वेळ आणि लागवड केलेल्या रोपांची काळजी या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यास फळबाग नक्कीच फायद्याची ठरेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान व्यापक दूरदृष्टी प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रयत्न अभ्यासाचे पारकाष्टा उद्योजक वृत्ती या बाबी केंद्रस्थानी ठेवला तर निश्चितच आपली फळबाग रोल मॉडेल ठरेल.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment