Plant Science Photosynthesis 2025 ऊसामध्ये साखर कशी तयार होते? सर्वच वनस्पतींच्या हिरव्या पानांमध्ये सूर्य शक्तीचे साखरेमध्ये रूपांतर करण्याची एक अद्भुत क्षमता असते. पानांच्या पेशीमध्ये हरित लवके असतात. हरितलावकामधे क्लोरोफिल (हरितद्रव्य) असते. पानावर खूप पर्णरंध्रे असतात. त्यामधून वनस्पती हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून घेतात मुळाद्वारे शोषण केलेले पाणी पाण्यामध्ये पोहचलेले असते.

Plant Science Photosynthesis 2025 कार्बन डाय-ऑक्साइड मधला कार्बन C व ऑक्सिजन O आणि पाण्यामधील हायड्रोजन हे काही जैविक रासायनिक क्रिया होऊन परस्परांना बांधले जातात. त्यांच्या बांधांमध्ये सूर्याची ऊर्जा धरून ठेवलेली असते. ऊर्जेने समृद्ध असा कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन यांचा पदार्थ म्हणजेच साखर या सर्व क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. ही क्रिया एका साध्या सूत्राने दाखवता येते.
अधिक उत्पादनक्षम सोयाबीनच्या सुधारित वाणांच्या लागवडीसाठी प्रसार!!
Plant Science Photosynthesis 2025 यामध्ये तयार झालेली ग्लुकोज ही सहा कार्बनची असते सहा कार्बनी ग्लुकोज हे किंवा फ्रुक्टोज हेक्झोज शुगर म्हणतात. हेक्झोज पासून पुढे 12 कार्बन असलेली C12 H22 O11 ही नित्याची च्या वापरातील साखर तयार होते, तिला शुक्रोज म्हणतात. ही सर्व क्रिया दुहेरी पलटांचे आवरण असलेल्या क्लोरोप्लास्टमध्ये घडते क्लोरोप्लास्टमध्ये ग्राना आणि स्ट्रोमा हे दोन भाग असतात. ग्राहक एकावर एक ठेवलेल्या नाण्यासारखा अनेक पर्डांचा बनलेला असतो या पलटामध्ये क्लोरोफिल असते एक प्रकारचे द्रावण पसरलेले असते त्याला स्ट्रोमा असे म्हणतात.

Plant Science Photosynthesis 2025 प्रकाशसंश्लेषण कसे घडते?
ग्राना मध्ये असलेले क्लोरोफिल प्रकाश ऊर्जा खेचून घेतात. या ऊर्जेने पाण्याचे विभाजन होते ऑक्सिजन पर्णरंध्रामधून बाहेर सोडला जातो व हायड्रोजन ग्रानामध्येच राहतो.

सदर हायड्रोजन NADP यावाहक पदार्थास चिकटतो त्याचा NADPH तयार होतो. ग्रहामध्ये आलेली सूर्याची ऊर्जा ADP या वाहकास संलग्न होते. व ATP हा ऊर्जा समृद्ध पदार्थ तयार होतो. NADPH आणि ATP हे दोन्ही पदार्थ ग्राणामधून स्ट्रोमामध्ये येतात.
Plant Science Photosynthesis 2025 याचवेळी पर्णरंध्रातून कार्बन डाय ऑक्साईड स्ट्रोमामध्ये आलेले असतो. कार्बन डाय-ऑक्साइड मध्ये कार्बन C आणि ऑक्सिजन O यांचा ग्रानामधून आलेला NADPH2 यातील हायड्रोजनची संयोग होऊन ATP मधील ऊर्जा वापरले जाते. कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन हे एकमेकांशी ऊर्जायुक्त बंधाने बांधले जातात. यापासून फॉस्फोग्लिसेरीक ऍसिड नावाचा एक पदार्थ तयार होतो तो तीन कार्बनचा असतो, यापासून पुढे ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज ही सहा कार्बनी साखर तयार होते.
प्रकाश संश्लेषण क्रियेत तयार होणाऱ्या पहिल्या स्थिर पदार्थाच्या प्रकारानुसार वनस्पतीचे दोन मुख्य वर्ग आहेत.
- सी तीन (सी थ्री प्लांट्स)
- सी चार (सी फोर प्लांट्स)
Plant Science Photosynthesis 2025 सी थ्री वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषण मध्ये पहिला स्थिर पदार्थ फॉस्फोग्लिसेरीक ऍसिड असतो आणि तो तीन कार्बनचा असतो. सर्व प्रकारची द्विदल पिके यामध्ये सी थ्री हा प्रकाश संश्लेषणाचा प्रकार असतो.

Plant Science Photosynthesis 2025 सी फोर वनस्पतीमध्ये प्रकाशसंश्लेषण होत असताना ऑक्झॅलो असेटिक ऍसिड हा पहिला स्थिर पदार्थ तयार होतो. तो चार कार्बनचा असतो म्हणून या वनस्पतींना c4 वनस्पती म्हणतात. ऊस, मका, ज्वारी, नाचणी ही सी फोर या वनस्पतींची उदाहरणे आहेत.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |