वनस्पतीजन्य कीटकनाशके व त्यांचा उपयोग!! Plant-Based Pesticides 2025

Plant-Based Pesticides 2025 वेगवेगळ्या पिकांवर विविध प्रकारच्या किडी आढळून येतात. व त्या मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करून उत्पादनामध्ये घट निर्माण करतात. या किडींच्या नियंत्रणासाठी कृत्रिम व विषारी कीटकनाशकांचा मोठा वापर केल्याने अनेक नवीन समस्या तयार झालेल्या आहेत.

Plant-Based Pesticides 2025

Plant-Based Pesticides 2025 यामध्ये अनेक किडींमध्ये या कीटकनाशकांची प्रतिकारक्षमता तयार झालेली आहे. काही किडींचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होतो. आणि सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा विविध किडींवर होतो. म्हणूनच वनस्पतीजन्य कीटकनाशके ही निसर्गावर व इतर प्राण्यांवर कुठलेही दुष्परिणाम न करता एक चांगला पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात.

कापूस पिक व्यवस्थापन भरघोस उत्पादनासाठी योग्य नियोजन!!

Plant-Based Pesticides 2025 विविध देशांमध्ये जागरूकता आल्याने फळे, भाजीपाला व अन्नधान्य जर सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केले असतील, तर त्यांच्याकडे लोकांचा ओढा वाढत आहे. सध्या किडनियंत्रणासाठी अनेक वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. यामध्ये ज्या महत्त्वाच्या वनस्पतींचा वापर होतो. त्यामध्ये मेलिया, तंबाखू, डेरीस, इत्यादींचा. वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

WhatsApp Group Join Now

शेवंती : शेवंतीच्या सुकलेल्या फुलांपासून पायरेथ्रम नावाचे कीटकनाशक काढले जाते. हे विष कीटकांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते ते खाण्याचे थांबवून लगेच मरतात.

निम : निंबाच्या झाडापासून अझ्याडिरॅक्टीन नावाचे कीटकनाशक काढले जाते. निंबोळ्यांपासून मिळणारे कीटकनाशक मोठ्या प्रमाणावर किडींच्या नियंत्रणासाठी कृत्रिम कीटकनाशकांना पर्याय म्हणून वापरले जाते. निंबोळी फवारणी केली तर बरेचसे कीटक फवारलेल्या पिकांवर अंडी देण्याचे टाळतात. किडींची फवारलेल्या पिकांवर खाण्याची क्षमता मंदावते. तसेच किडींची वाढ ही खुंटते. या सर्व फायद्यांमुळेच सध्या कृत्रिम कीटकनाशकाचा अतिशय चांगला पर्याय निंबाच्या रूपाने शेतकऱ्यांना उपलब्ध झालेला आहे.

करंज : करंजाच्या झाडापासून काढणाऱ्या तेलात व त्यातील करंजीन मध्ये कीटकनाशकांची गुणधर्म आढळून येतात. हे कीटकनाशक साठवलेल्या धान्यातील विविध किडी तसेच इतर पिकांवरील किडींसाठी उपयुक्त आहे.

WhatsApp Group Join Now

सिताफळ : सीताफळांच्या बियांपासून कीटकनाशक काढले जाते. आणि ते पतंग वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त आहे. या फळांच्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या द्रावणात अनोना, स्कॅमोझा हे विषारी घटक असते. आणि ते कोबीवरील डायमंड बॅकमॉथ व इतर पतंग वर्गीय किडींवर नियंत्रण मिळवण्यास उपयुक्त ठरतात.

मेलिया : या झाडांपासून ट्रायटरपेनॉइड सलॅनीन हे विषारी घटक वेगळे केले जाते. हे विषारी घटक खाल्याने किडींची खाण्याची क्षमता मंदावते व पोटविष म्हणून काम करते.

तंबाखू : तंबाखूच्या पानांमध्ये निकोटीन सल्फेट हे कीटकनाशक साधारणपणे 40 या प्रमाणात असते. निकोटीन हे विष कीटकांच्या मज्जा संस्थेवर परिणाम करतात, व ऍसिटिलीन केलीन इस्ट्रेस या एन्झाईम ची उपयुक्तता नष्ट करतात. त्यामुळे किडी अस्वस्थ होऊन मरण पावतात. मावा, तुडतुडे व इतर किडींवर हे कीटकनाशक अतिशय उपयुक्त ठरतात.

डेरीस : या झाडांच्या मुळांपासून रोटेनॉन नावाचे कीटकनाशक काढाले जाते. हे कीटकनाशक किडींच्या श्वसन संस्थेवर परिणाम करतात. त्यामुळे कीटक अस्वस्थ अपंग होऊन मरतात. निसर्गातील अनेक वनस्पतींमध्ये कीटकनाशकांचे गुणधर्म आढळून येतात. त्यातील काही वनस्पतींचा आपण सध्या मोठ्या प्रमाणावर किडींच्या व्यवस्थापनामध्ये उपयोग करू शकतो.

Plant-Based Pesticides 2025 वनस्पतीजन्य कीटकनाशकांचे उपयोग:

सध्या किडींच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन ही संकल्पना दृढ झालेली आहे. यामुळे कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून किडींचा बंदोबस्त करता येते. आणि यामध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशके अतिशय परिणामकारकरित्या वापरता येतात. कारण ते पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत.

सध्या शेतकरी काही झाडांचा पाला, फळ, साल किंवा मूळ यापासून द्रावण तयार करून कीटकनाशक म्हणून वापर करतात. सध्या बाजारात वनस्पतीजन्य कीटकनाशक हि उपलब्ध आहे.

Plant-Based Pesticides 2025 फायदे:

वनस्पतीजन्य कीटकनाशके फवारणी करणाऱ्या किडींना तसेच वातावरणाला हानिकारक नाही.

यांचे फवारणी केल्यानंतर त्यांचे लगेच विघटन होत असल्याने कमीत कमी विषारी अवशेष फवारलेल्या पिकांवर शिल्लक राहतात.

या प्रकारातील बरेचसे वनस्पतींना कीटकनाशकेही पोटविषे प्रकारातील असल्याने ते किडींना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवत नाहीत.

ही कीटकनाशके घरातील उपद्रवी किडींसाठी हि उपयुक्त ठरतात.

यातील बरीचशी वनस्पतीजन्य कीटकनाशके किडींची खाण्याची क्षमता कमी करतात, त्यामुळे फवारणीनंतर पुढील नुकसान कमी होते.

यातील काही वनस्पतीजन्य कीटकनाशके पिके काढणीच्या काही दिवस अगोदर फवारले तरी विषारी अवशेष शिल्लक राहत नाहीत.

यातील बऱ्याचशा वनस्पती शेतकऱ्यांना सहजा सहजी भोवताली उपलब्ध असतात.

या कीटकनाशकांच्या बाबतीत किडींमध्ये प्रतिकार क्षमता लवकर तयार होत नाही.

जिवाणूजन्य कीटकनाशकांची विषाणूजन्य कीटकनाशके जिवाणूजन्य कीटकनाशके इत्यादींमध्ये मिसळून फवारणी करता येते.

वनस्पती जनक कीटकनाशके फवारणी केलेल्या पिकांवर कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही.

ही कीटकनाशके स्वस्थ हि पडतात.

वनस्पतीजन्य कीटकनाशके हाताळताना शेतकऱ्यांना फवारणी करताना कुठल्याही प्रकारचा धोका नसतो.

Plant-Based Pesticides 2025 तोटे:

बरीच वनस्पतीजन्य कीटक नाशके हि किडींना मारत नाहीत तर किडींना खाण्यापासून परावृत्त करतात आणि त्यांची क्रिया हळुवार असते.

वनस्पतीजन्य कीटकनाशके फवारणी नंतर विषारी अंश टिकून राहत नाही आणि जास्त प्रकारे किडींवर क्रिया करत नाही.

बऱ्याच वनस्पती एखाद्या हंगामातच उपलब्ध असतात.

बरेच शेतकरी जरी अनेक प्रकारच्या वनस्पती फवारणी साठी वापरत असले तरी त्यांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केलेला नसतो.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment