नवीन फळबागेचे नियोजन!! Planning New Orchard 2025

Planning New Orchard 2025 राज्यामध्ये सण 1990-91 पासून रोजगार हमी अंतर्गत शंभर टक्के अनुदित फळ झाड लागवड ही महत्त्वकांक्षी योजना सुरू झाली. तेव्हापासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकऱ्यांच्या मनावर रुजली फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पीडित जमिनीला मिळालेले वरदान ठरले.

Planning New Orchard 2025

राज्यात आता पर्यंत 30 लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत. परंतु, अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी व नियोजन या महत्त्वाच्या बाबी आहेत.

वनस्पती शास्त्र प्रकाश सुंश्लेषण!!

Planning New Orchard 2025 फळबागेसाठी जमिनीची निवड

जमीन कोणत्या प्रकारची आहे हलकी, मध्यम की भारी हे सर्वांना परिचित असतेच जर माहिती नसेल, तर ती माहिती करून घ्यावी. जमिनीची खोली किती आहे? जमिनीच्या खाली मुरूम किती खोलवर आहे? जमिनीचा निचरा कसा आहे त्यांचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now

फळबागेसाठी कमीत कमी 1 मीटर खोली नंतर मुरमाचा थर असणारी जमीन निवडावी भरपूर सेंद्रिय कर्ब असणारे भुसभुशीत मध्यम पोटाची जमिनीचा सामू 6 ते 7.5 पर्यंत असावा. मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असावी. जमिनीचा उतारा 2 ते 3 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे. त्या ठिकाणाच्या मातीचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.

माती परीक्षण करण्यासाठी फळबाग क्षेत्रातील मातीचा नमुना कसा घ्यावा?

Planning New Orchard 2025 फळबागे करिता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रतिनिधक नमुना घ्यावा. सर्वप्रथम 3*3*3 फूट खोलीचा (100 से.मी.) किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रतिनिधिक नमुना काढावा व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये तपासणीसाठी पाठवावा.

माती परीक्षणाप्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यकता आहे. अपने विहिरीचे बोरचे पाणी क्षारयुक्त व मचुर असू नये ते गोड असावे तेव्हा माती बरोबरच पाण्याचे रासायनिक परीक्षण करून घ्यावे आणि त्या अनुषंगाने फळझाडांची निवड करावी.

Planning New Orchard 2025 फळबागेसाठी पाण्याची उपलब्धता

बागायती फळझाडांना नियमित पाणी द्यावे लागते अशा बागायती फळझाडांची लागवड करताना कितपत पाणीपुरवठा पुरेल किंवा पाण्याची उपलब्धता किती आहे याचा विचार करूनच नियोजन करावे कोरडवाहू फळ पिकांना लागवडीच्या सुरुवातीस पहिली 3 ते 4 वर्ष पाण्याची चांगल्या व साधारणकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. नारळ सुपारी केळी पपई चिकू मसाला पिके यांना इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते.

WhatsApp Group Join Now

तसेच फळझाडांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता आवश्यक्य फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता असते. म्हणून पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळझाडांची निवड करावी आपल्याकडे बारा महिने पाण्याची सोय असेल तर ज्या फळझाडांना बाराही महिने पाणी लागते अशा फळझाडांची निवड करावी.

Planning New Orchard 2025 हवामानानुसार फळपिकाची लागवड

महाराष्ट्रातील शेतकरी या बाबतीत खरोखरच भाग्यवान आहेत, कारण आपल्या राज्यात सफरचंद वळतात बहुतेक फळझाडांची यशस्वी लागवड करता येते. कारण आपल्या राज्यातील हवामान फळबाग लागवडीसाठी खूपच अनुकूल आहे. यामुळे हवामानांच्या बाबतीत फळबाग लागवड करताना शेतकऱ्यांना फारसा विचार करावा लागत नाही.

आपल्या राज्याचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, चिकू, पपई, नारळ अशा प्रकारची फळझाडे घ्यावीत. कोकण सारख्या अति पावसाच्या भागात चिकू, नारळ, फणस, आंबा, काजू यासारखी फळझाडे घ्यावी, अति कमी पावसाच्या भागात सिताफळ, आवळा, चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घ्यावी.

हवामानानुसार फळझाडांची लागवड न केल्यास फळे न येणे फळे लागल्यास फळांची प्रत खालावणे उशिरा फळे लागणे रोग व किडीचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या भोडसावतात लागवड करावी.

फळबागेची आखणी आणि अंतर

फळझाडांची आणि जागेची निवड झाल्यावर लागवडीसाठी आखणी करणे गरजेचे आहे. तेव्हा जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी. फळ पिके लागवडीच्या चौरस, आयताकृती, त्रिकोणी, षटकोनी, उतार अशा निरनिराळ्या पद्धती आहेत. चौरस पद्धती सर्वात सोपी आखणीस अडचण नसणारे व उभ्या आडव्या माशागतीस योग्य अशी पद्धत प्रामुख्याने सर्वत्र वापरले जाते. आंबा, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी, इत्यादी. झाडांची फळझाडांची लागवड या पद्धतीने केली जाते. या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोन करून असतात. दोन झाडांतील आणि दोन रोपांतील अंतर सारखेच असते येत असल्यामुळे झाडे सर्व दिशांनी पाहिल्यास सारख्या अंतरावर दिसतात या पद्धतीने लागवड करणे अत्यंत सुलभ असते.

फळबाग लागवडीचे अंतर

Planning New Orchard 2025 विविध झाडांसाठी खड्डा खोदणे आणि भरणे महत्त्वाचे त्याकरिता खड्ड्याचा आकार किती असावा हे खड्डे केव्हा घ्यावेत आणि केव्हा भरावेत जेथे फळझाडांची लागवड करावयाची आहे. तेथे योग्य त्या अंतरावर चौरस पद्धतीने आखणी करून खड्डे खोदावेत जमिनीच्या मगदूराप्रमाणे आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्याचा आकार ठरवावा.

विविध फळझाडांच्या लागवडीचे अंतर

फळझाडलागवडीचे अंतर (मीटर)हेक्टरी झाडे
आंबा10*10100
चिकू10*10100
चिंच10*10100
जांभूळ10*10100
नारळ7.5*7.5177
आवळा7*7204
पेरू6*6
3*2
277
1666
बोर6*6277
लिंबू /मोसंबी6*6277
सिताफळ5*5400
डाळिंब4.5*3740
अंजीर5*5
4.5*3
400
740

फळबाग लागवडीसाठी योग्य वेळ कोणती

Planning New Orchard 2025 खात्रीशीर पाऊस पडल्यावर पावसाच्या सुरुवातीस जून महिना आणि जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. अति पावसात किंवा पावसाच्या शेवटी सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये फळझाड लागवड करू नये. लागवड केलेली झाडे चांगली समाधानकारक वाढतात. काही कालावधीकरिता पाण्याचा तानही सहन करू शकतात. जून जुलैपर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ जोमाने होते.

फळबागांची पारंपरिक लागवड व सधन लागवड

या पद्धतीमध्ये झाडांची छाटणी विरघळणे करणे सोपे जाते. पारंपारिक लागवडीपेक्षा जास्त उत्पादन सदन लागवड पद्धतीमध्ये फलोउत्पादन लवकर मिळते. झाडांचा आकार लहान असल्याने कीड रोग नियंत्रण व्यवस्थापन फळांची काढणी सोपी व सहज शक्य होते. कमी क्षेत्रातून जास्त उत्पादन फळांचा दर्जा प्रत व गुणवत्ता निर्यात क्षमता वाढवता येते.

Ripe apricots on a tree in orchard

Planning New Orchard 2025 वाहतुकीच्या दृष्टीने फळबागेचे ठिकाण

जमिनीचे वाहतुकीच्या दृष्टीने स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली जमीन वाहतुकीच्या रस्त्यापासून दूर असेल तर बागेला लागणारे साहित्य जागेवर पोहोचविणे फळे वाहतुकीच्या सोयीच्या जाग्यावर आणणे याचा खर्च वाढतो. त्यामुळे सुरुवातीलाच वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment