Pink Bollworm on Cotton 2025 कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. बागायती तसेच कोरडवाहू कापूस पिकावरती या किडींचा प्रादुर्भाव होऊन कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता यामध्ये मोठी घट आली आहे.

त्यामुळे या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करून ही कीड आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे आवश्यक आहे.
कपाशी वरील लाल्या (तांबेरा), कारणे व त्याचे व्यवस्थापन!!
Pink Bollworm on Cotton 2025 कीड व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा संयुक्त व सुसंगत वापर करताना जैविक कीडनाशके, परोपजीवी मित्र कीटक, आंतर, मिश्र आणि सापळा पिके, कामगंध सापळे, वनस्पतीजन्य कीडनाशके, आणि गरजेनुसार रासायनिक कीडनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे.

किडींची ओळख: Pink Bollworm on Cotton 2025
गुलाबी बोंड अळीचा पतंग हा छोटा 3 ते 6 मिमी लांबीचा असतो. पतंग हा गर्द बदामी रंगाचा असून पंखावर बारीक काळे ठिपके असतात. या किडीची अळी सुरुवातीस फिकट हिरवी पांढरट रंगाची असते. नंतर तिसऱ्या अवस्थेत अळीस गुलाबी रंग प्राप्त होतो. या अळीस शेंद्रीय अळी असेही म्हणतात. पूर्ण वाढ झालेल्या अळीची लांबी 18 ते 19 मिमी असते.
किडींचा जीवनक्रम:
किडीचा मादी पतंग पांढऱ्या रंगाची 100 ते 150 अंडी पानांच्या खाली तसेच कळ्या आणि बोंडांवर एक एक करून 3 ते 5 दिवसात घालतो. अंडी कालावधी 7 दिवसाचा असून अंड्यातून किडीची पांढरट रंगाची अळी बाहेर पडते. अळी अवस्थेचा कालावधी 9 ते 21 दिवसांचा असतो. पूर्ण वाढ झालेली अळी नंतर स्वतःभोवती कोष तयार करते. आणि पानांवर, फुलांवर तसेच जमिनीत कोष अवस्थेत जाते.
कोषावस्था 6 ते 20 दिवसांची असते या किडीची अळी आणि कोष या अवस्थांमध्ये सुप्तावस्था दिसून येते. अळीची सुप्तावस्था ही जवळपास दोन वर्षापर्यंत राहते. किडींचा पतंग 7 ते 10 दिवस जगतो. ही कीड आपला जीवनक्रम 6 ते 8 आठवड्यांमध्ये पूर्ण करते. आणि जवळपास किडीच्या 9 पिढ्या प्रती वर्षी तयार होतात.
प्रादुर्भावाची लक्षणे: Pink Bollworm on Cotton 2025
किडीची लहान पांढरट अळी सुरुवातीस कळ्या, फुले, बारीक बोंड, यांना छिद्र करून आत शिरते आणि त्या खाते. आणि बोंडांमध्ये शिरल्यानंतर तिच्या विष्टेने बोंडांवरील छिद्र बंद करते. बोंडांमधील गुलाबी मध्ये छिद्र करून सरकी खातात. त्यामुळे मुळांची वाढ खुंटते आणि कवडी कापूस तयार होतो. अधिक प्रादुर्भाव असलेली फुले, कळ्या, गळून पडतात. आणि बोंडे पक्व न होताच उमलून गळतात.
या किडीच्या प्रादुर्भावामुळे कापसाची गुणवत्ता आणि तेलाचे प्रमाण कमी होऊन कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. अळीने बोंडांतील सरकी खाल्ल्याने कापसासहि गुलाबी शेंदरी रंग प्राप्त होतो. त्यास कॉटन स्टेनर असे म्हणतात. या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये कापूस पिकावर अधिक दिसून येतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापन: Pink Bollworm on Cotton 2025
उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नागरट करावी त्यामुळे किडीच्या जमिनीतील अळी व कोष या सुप्तावस्था ऊन आणि परभक्ष मित्र कीटकांमुळे नष्ट होतील.
पिकाची फेरपालट करून एकाच क्षेत्रात वारंवार कापूस पीक घेणे टाळावे.
कापूस पिकाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींची निवड करून सामुदायिकपणे 10 ते 15 दिवसात गावामध्ये वेळेवर हंगामात लागवड करावी. त्यामुळे कपाशीची वेळेवर वेचणी होऊन पिक अधिक काळ शेतात न राहून गुलाबी अळी किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
शिफारसी प्रमाणे लागवडीचे अंतर खते आणि पाणी यांचा वापर करावा. लागवडीचे अंतर 120*90 सेमी. खते 10 टन कुजलेले शेणखत आणि नत्र, स्फुरद, पालाश प्रत्येकी 125:65:65 किलो प्रती हेक्टरी जमिनीतून द्यावे.
कपाशीची पाने, फुले व बोंडे लागणे या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याच्या पाळ्या चुकवू नये. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये ही गरजेनुसार द्रवरूप खतांसोबत शिफारसी प्रमाणे द्यावीत.
तणांचा बंदोबस्त: Pink Bollworm on Cotton 2025
कापूस लागवडीनंतर शेत खुरपणी आणि कोळपणी करून तणमुक्त ठेवावे. तसेच गरजेनुसार उगवणीपूर्वी तणनाशकांचा उदा. डाययुरॉन किंवा पेंडीमिथॅलीन किंवा फ्युक्लोरॅलिन प्रत्येकी 1 किलो वापर करावा.
बीटी कपाशीमध्ये नॉन बीटी कपाशीच्या आश्रित ओळींची 95:5 या प्रमाणात लागवड करावी.
शेतामध्ये सर्वेक्षण व परीक्षण करावे यामध्ये पिकावरील किडींचा प्रादुर्भाव, कामगंध सापळ्यांमधील किडींचे पतंग यांचे परीक्षण करून किडीची आर्थिक नुकसान पातळी ठरवावी.
पिकावर किडीचा 10 टक्के प्रादुर्भाव तसेच किडीचे 8 पतंग/ कामगंध सापळ्यात दिसून आल्यास कीड नियंत्रणाची उपाययोजना करावी.
कामगंध सापळे 5 प्रति हेक्टरी किडीच्या परीक्षणासाठी तर 20 प्रति हेक्टरी किडीच्या सामूहिक अडथळ्यासाठी वापरावेत. म्हणजे किडींची संख्या व प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
गुलाबी बोंडळीसाठी विशेषकरून असलेली पी.बी. रोप डिस्पेन्सर 200 प्रती हेक्टरी वापरून झाडावर गुलाबी अळीच्या पतंगांना एकत्रित आकर्षित करावे.
पिकाच्या प्रादुर्भावग्रस्त कळ्या, रोझेट फुले, बोंडे गोळा करून नष्ट करावीत.
कापसा व्यतिरिक्त ही कीड भेंडी, ताग, अंबाडी या यजमान पिकावर दिसून येत असल्यामुळे या पिकांची कापूस पिकासोबत मुख्य पीक म्हणून लागवड टाळावी.

कपाशीचे पीक 80-90 दिवसाचे झाल्यावर वाढणारे शेंडे खोडावेत म्हणजे झाडाची कायिक वाढ कमी होऊन फळधारणा चांगली होते आणि अळीचा प्रादुर्भाव कमी होतो.
सापळा पिकांचा वापर करून मित्र कीटकांचे संवर्धन करावे यामध्ये ज्वारी, मका, तुर, भेंडी, कोथिंबीर यांचा सापळा पीक म्हणून वापर करावा.
पक्षांना कपाशीवरील किडींच्या आळ्या वेचत यावेत यासाठी शेतात 15-20 लाकडी पक्षी थांबे उभे करावेत.
परोपजीवी मित्र कीटकांचे शेतात प्रसारण करावे यामध्ये ट्रायकोग्रामाटॉयडिआ बॅक्ट्री या मित्र किटकाची 1.50 लाख अंडी शेतात प्रसारित करावी तसेच चिलोनस, ब्रेकॉन, अपॅनटीलस या मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
जैविक तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर किडीची आर्थिक नुकसान पातळी पाहून करावा. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास या किडीच्या नियंत्रणासाठी खालील कीटकनाशकांची आलटून पालटून गरजेनुसार फवारणी करावी.
यामध्ये निमतेल 40 मिली, मेटॅरिझिअम ऍनिसोप्ली 50 ग्रॅम, फ्ल्युबेन्डायमाईड 480 एससी 3 मिली, डब्ल्यूजी 20 ग्रॅम प्रोफेनोफॉस 50 ईसी 20 मिली, क्यूनॉलफॉस 2 एएफ 20 मिली, क्लोरपायरीफॉस 50 ईसी 20 मिली, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 10 मिली, प्रति 10 ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Pink Bollworm on Cotton 2025 कापूस पिकाची वेळेवर पूर्ण बिजने करून झाल्यानंतर जनावर राहणार शेतात चोरण्यासाठी सोडून अळीच्या सुद्धा वस्तूंच्या बंदोबस्त करावा.
कापूस हंगाम संपल्यावर कापसाच्या पर्ह्याट्या बांधावर रचून ठेवू नयेत. समूहिक स्वच्छता मोहीम राबवून कीडग्रस्त पऱ्हाटी, बोंडे व पालापाचोळा गोळा करून नष्ट करावे.
कापूस वेचणीनंतर शक्य तितक्या लवकर सरकीचे गाळप करावे किंवा तज्ञाच्या देखरेखखाली सरकी बियांना ऍल्युमिनियम फॉस्फाईड 500 ग्रॅम 10 क्यू फिटची धुरी 24 तासांसाठी द्यावी. म्हणजे गुलाबी बोंडे अळीच्या सुप्तावस्थाचा बंदोबस्त करता येईल.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |