पिकविमा योजनेचे केंद्रीकरण; कापणी प्रयोगात गोंधळ अटळ, वाचा साविस्तर Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025 नागपूर: राज्यात पंतप्रधान पिकविमा योजना मुदतीपूर्वीच रद्द करून सुधारित पीकविमा योजना लागू केली आहे. सुधारित योजना हवामान बदलऐवजी पीक कापणी प्रयोग आधारित आहेत. कृषी विभागाने 34 जिल्ह्यांचे 12 समुह तयार केले व त्यातील 9 समूह एकाच कंपनीला दिले आहेत.

 Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025 निविदांमध्ये कंपन्यांच्या दरांमध्ये मोठी तफावत आहे. उत्पादन घटबाबत स्पष्टता नसल्याने पीक कापणी प्रयोगात गोंधळ होणार असल्याची शक्यता बळावली आहे. या योजनेची मुदत 2025-26 च्या रब्बी हंगामात संपणार असताना सरकारने 9 मे 2025 रोजी मुदतीपूर्वीच रद्द केली.

जनावरांचे जीवनसत्वांचे फायदे,अभाव व उपलब्धता!! 

सुधारित योजनेसाठी कृषी विभागाने राज्यातील 34 जिल्ह्यांचे 12 समुह तयार निविदा मागवल्या. एकूण 19 कंपन्यांनी त्यांचे विमा हप्ते दर समाविष्ट करीत निविदा कृषी विभागाकडे सादर केल्या. कृषी विभागाने सर्वात कमी दर असलेल्या भारतीय कृषी विमा कंपनीला 9 तर आयसीसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीला प्रत्येकी एक जिल्हा समाविष्ट असलेली 3 समूह दिले.

WhatsApp Group Join Now

Pik Vima Yojana 2025 कंपन्यांनी निविदांमध्ये दिलेल्या विमा हप्ता दरात मोठी तफावत आहे. सर्वात कमी दर 3.1 ते 4.20% तसेच 4.28 ते 6.44% आहे. या दोन कंपन्यांच्या तुलनेत इतर कंपन्यांचे टिप्पटीपेक्षा अधिक म्हणजेच 6.8 ते 17.7 टक्के एवढे होते.

कृषी विभागाने या निविदा मंजूर करताना दरात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कंपन्यांची वाटाघाटी केल्या नाहीत. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. अशी प्रतिक्रिया पीक विमा अभ्यासक मिलिंद दामले यांनी व्यक्त केली.

Pik Vima Yojana 2025 दरांबाबत कंपन्यांचे संगनमत

धाराशिव, लातूर व बीड या तीन जिल्ह्यांना विशेष दर्जा दिला असून, या 3 जिल्ह्यांचा प्रत्येकी एक असे वेगळे समूह आहे. हे तीन समूह कंपनीला दिले असून कंपनीने या तीन जिल्ह्यात हप्ता दर 4.28 ते 6.44% नमूद केला होता. याच कंपनीने इतर 9 समूहांसाठी 4.44 ते 6.44 % तर या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीने 5.11 ते 6.79 टक्के दर नमूद केला होता. यावरून दरांबाबत या दोन कंपन्यांचे संगनमत स्पष्ट होते.

WhatsApp Group Join Now

Pik Vima Yojana 2025 जिल्ह्यांचे समूह विसंगत

कृषी विभागाने तयार केलेला जिल्हा समूहामध्ये विसंगती दिसून येते. अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर या जिल्ह्यांचा पहिला समूह असून, या तिन्ही जिल्ह्यांमधील हवामान भिन्न आहे. परभणी, वर्धा, नागपूर, किंवा यवतमाळ, गडचिरोली, अथवा छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, अशी विसंगती दिसून येते.

Pik Vima Yojana 2025 उत्पादन घटबाबत स्पष्टता

पीक पेरणीपासून तर काढणीपर्यंतच्या काळात वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, यामुळे लागलेली नैसर्गिक आग, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इ. बाबींमुळे येणारी उत्पादनातील घट नुकसान भरपाईस पात्र ठरणार आहे.

अपेक्षित उत्पादन कसे ग्राह्य धरले जाईल, हे मात्र स्पष्ट केले नाही. या सर्व बाबी स्थानिक स्वरूपाच्या असतानाही मिळण्याची तरतूद रद्द का केली हे देखील स्पष्ट केले नाही.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment