Pik Vima Yojana 2025 सन 2025-26 च्या सण खरीप हंगामापासून राज्यात, “सर्व समावेशक पिक विमा योजनेमध्ये” बदल करून, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी 2 टक्के, रब्बीसाठी 1.5 टक्के व नगदी पिकांना 5 टक्के असा शेतकरी हिस्सा घेवून, उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासन मार्फत देण्यात येऊन, पिक कापणी प्रयोगांवर आधारित, “सुधारित पिक विमा योजना” राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी, विमा क्षेत्र घटक धरून, केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे, खरीप व रब्बी हंगामाकरिता राबविण्यात मान्यता देण्यात येत आहे. सुधारित पिक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता, केवळ खालील जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबविण्यात येईल.
सौर कृषी पंप योजना भारी, मात्र शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी नाराजी, जाणून घ्या सविस्तर;
Pik Vima Yojana 2025 पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत बीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट.

सदर योजनेमध्ये शेतकरी, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभाग घेऊ शकतो.
“सुधारित पिक विमा योजना”, ही योजना खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी Cup & Cap Model (80:110) नुसार राबविण्यात येईल. तसेच, पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल.
Pik Vima Yojana 2025 सुधारित पिक विमा योजना राबविण्यासाठी, नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.
“सुधारित पिक विमा योजनेअंतर्गत” नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांचे सरासरी नुकसान काढताना, भात, गहू, सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान 50 टक्के भारकांन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन, 50 टक्के भारकांन पीक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल व यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल.
Pik Vima Yojana 2025 उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई, नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल. यासंदर्भात केंद्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पिक विमा समन्वय समितीने दिलेले निर्देश लागू राहतील.
ब) सुधारित पिक विमा योजनेअंतर्गत होणारा खर्च हा अनिवार्य खर्चातर्गत, प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पुढील लेखाशीर्षाखाली भागविण्यात येईल.
या योजनेसाठी आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे नियंत्रण अधिकारी राहतील. तसेच, सहाय्यक संचालक (लेखा-1), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
Pik Vima Yojana 2025 केंद्र शासनाने सदर योजने करिता वेळोवेळी विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील सर्व अटी व शर्ती योजनेतील सर्व सहभागी होणाऱ्यांकरिता लागू राहतील.
सदर योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, पुणे यांची राहील. तसेच आयुक्त (कृषी) यांनी, योजनेच्या अंमलबजावणीबाबत मासिक आढावा घेऊन त्याबाबतचा प्रगती अहवाल शासनास सादर करणे बंधनकारक राहील.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत राबविण्यात येणारी, पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना, आहे त्या स्वरूपात चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |