आता पिक विमा योजनेत नुकसान भरपाई मिळणार, ‘या’ निकषांवर जाणून घ्या सविस्तर; Pik Vima Yojana 2025

Pik Vima Yojana 2025 पुणे : एक रुपयात खरीप पिक विमा योजनेत अनेक घोळ, गैरव्यवहार झाल्यानंतर आता ही योजना पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई आणि विमा हप्ता 2 ते 5 टक्के करण्यात आकारण्यात असल्याची खात्री लायक माहिती आहे. कृषी विभागाच्या या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाची लवकरच मोहोर उमटणार आहे. विमा उतरविणारे बनावट अर्जदार आणि कंपन्यांचे होणार पांढरे उखळ याला चाप लावण्यासाठी एक रुपयात विमा योजनाच रद्द करण्यात येणार आहे.

Pik Vima Yojana 2025

यातून राज्य सरकारचा अनुदाना पोटीचा निधीही वाचून योजनेची झालेली नाचक्की दूर करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दोन वर्षापासून राज्यात राबविण्यात येणाऱ्या एक रुपयात खरीप पिक विमा ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेला पहिल्या वर्षी सुमारे एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विमा काढला होता. त्यानंतर 2024 मध्ये एक कोटी 60 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा!

Pik Vima Yojana 2025 मात्र, या योजनेत अनेक गैरव्यवहार झाले. त्यामुळे ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली. परिणामी, विमा योजनाच बंद करावी, असा राज्य सरकार विचार होता. मात्र, यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या योजनेच्या अटीच बदलाव्यात, अशी महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.

WhatsApp Group Join Now

आत्तापर्यंत प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या प्रीमियम आकाराला जात असे. त्यासाठी एकूण प्रीमियमच्या 2 ते 5 टक्के रक्कम शेतकरी भरत होता. तर उर्वरित हिस्सा केंद्र व राज्य सरकार भरत असे.

Pik Vima Yojana 2025 एक रुपयाच्या योजनेमुळे राज्य सरकारला सुमारे 8 हजार कोटींचा विमा हप्ता कंपन्यांकडे भरावा लागला होता. यातील 20 टक्के कंपनीचा नफा गृहीत धरल्यास कंपन्यांचे उकळ पांढरे झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचत नसल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले होते.

त्यामुळेच सहभाग मर्यादित असल्यास राज्य सरकारच्या निधीही वाचेल, असे मत या प्रस्तावातून व्यक्त करण्यात आले आहे. या प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच शिक्का मोतरब व होणार आहे.

Pik Vima Yojana 2025 कांदा पिकासाठी 5 टक्के हफ्ता आकारण्याचा प्रस्ताव

एक रुपयात विमा देण्याच्या घोषणेनंतर शेतकऱ्याच्या हिस्स्यातील प्रीमियमचा भारही राज्य सरकार उचलत होते. आता हाच निकष पुन्हा लावावा, अशी शिफारस राज्य सरकारला करण्यात आली आहे.

उदाहरणार्थ, एखाद्या पिकाचा विमा 100 रुपये असल्यास त्यासाठी शेतकऱ्यांना 2 रुपये विमा हप्ता द्यावा लागणार आहे. खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या कापूस पिकासाठी हा हप्ता 100 रुपयांच्या हप्त्यासाठी 5 रुपये असेल.

कांदा पिकासाठी ही 5 टक्के हफ्ता आकारण्याचा प्रस्ताव आहे. रब्बी हंगामात कांदा पिक वगळता, अन्य सर्व पिकांसाठी विमा हप्ता दीड टक्का असेल. कांद्यासाठी हप्ता 5 टक्के असेल.

WhatsApp Group Join Now

Pik Vima Yojana 2025 एक रुपया विमा असल्याने सर्वांनी घेतला होता सहभाग

शेतकरी पिक विमा काढताना जोखीम असलेल्या पिकांचा विमा काढत होते. मात्र, एक रुपयात विमा उपलब्ध करून दिल्याने राज्यातील बहुतांश सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला होता.

शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान झाल्याची तक्रार (इंटीमेशन) विमा कंपनीकडे दिल्यानंतर सर्वेक्षणातून विमा नुकसान भरपाई ठरविली जात होती. यंदा तब्बल 1 कोटी तक्रारी कंपन्यांकडे दाखल झाल्या होत्या.

व्यवहारी दृष्टिकोनातून या सर्व तक्रारीचे निराकरण करणे अशक्य होते. त्यामुळेच आता नुकसान भरपाई पीक कापणी प्रयोगानुसार करावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारसही करण्यात आली आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment