Pik Vima Yojana 2025 मुंबई : कृषी क्षेत्रातील 5000 कोटींच्या भांडवली गुंतवणुकीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या धरतीवर एक योजना आणणे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे.

तसेच एक रुपयाऐवजी सुटसुटीत पिक विमा योजना आणली जाईल. तसेच 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येईल, असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले.
अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन पिकांचे करा नियोजन कृषी सल्ला, वाचा सविस्तर;
तृणधान्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी मिलेट बोर्डची स्थापना केली जाईल. शेतीतील भांडवली गुंतवणूक न झाल्याने शेती परवडत नाही. त्यामुळे भांडवली गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीत 5000 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करून शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यासाठी चर्चा झाली आहे.
Pik Vima Yojana 2025 यासाठी पोकराच्या धर्तीवर योजना आणण्याचा विचार सुरू आहे, असे मंत्री कोकाटे म्हणाले. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे कार्यालय पुण्यात हलविण्यात येणार नसून ते अकोल्यातच राहील, असेही मंत्री कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Pik Vima Yojana 2025 गावे निवडताना दक्षता!
कृषी संजीवनी योजना ही आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी आणली होती. त्यासाठी चार हजार कोटी रुपये दिले होते. परंतु छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात सर्वाधिक निधी खर्च झाला तर विदर्भात तुटपुंजी रक्कम खर्च झाली. त्याचा आढावा घ्यावा.
सर्व जिल्ह्यांना समान न्याय मिळेल, असे पहावे अशी सूचना भाजपचे जेष्ठ सदस्य संजय कुटे यांनी केली. यावर कृषी मंत्री कोकाटे यांनी जागतिक बँकेच्या निकषाप्रमाणे या योजनेतील गावे ठरविली जातात.
दुसऱ्या टप्प्यात त्याबाबत दक्षता घेण्यात येईल. तसेच 5000 कोटींच्या भांडवली गुंतवणुकीसाठी आणल्या जाणाऱ्या पोकराच्या धर्तीवरील योजनेतून गावांची निवड केली जाईल असे सांगितले.
” प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील विमा शेतकऱ्यांना न मिळाल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, चार-आठ दिवसात शेतकऱ्यांना हा विमा मिळेल. एक रुपयाच्या पिक विमा योजनेत गैरप्रकार सरकारच्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे पीक योजनेचा अभ्यास करून आद्ययावत आणि सुटसुटीत पिक विमा योजना आणली जाईल. – माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री “
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |