Pik Vima Yojana 2025 पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मोहरी इत्यादी पिकांचा विमा उतरवला आहे. यासाठी सरकारने शेवटची तारीख 15 जानेवारी निश्चित केली होती त्याचबरोबर सरकार आता 1 फेब्रुवारीपासून मोहीम राबवून विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना पॉलिसी वितरित करणार आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने चालणाऱ्या प्रधानमंत्री पिक विमा योजना बाबत एक मोठी अपडेट दिले दिली आहे. कृषी विभाग 1 फेब्रुवारीपासून “मेरी पॉलिसी मेरे हाथ” नावाची मोहीम राबवून पिक विमा योजनेअंतर्गत विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वितरित करणार आहे.
चालू रब्बी हंगामात अनेक पिकांवर सुरक्षा कवच देण्यासाठी केंद्राने आणि पिक विमा योजनेअंतर्गत विमा घेण्यास सांगितले होते. त्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 होती. आता सहाय्यकामार्फत ई पिक पाहणी करण्यात येते.
PMFBY पोर्टल आणि WhatsApp वर माहिती मिळवा…Pik Vima Yojana 2025
शेतकरी पॉलिसीमध्ये काही तफावत किंवा तक्रार असल्यास ते पंतप्रधान पिक विमा योजना पोर्टलवर भेट देऊन किंवा वर कॉल करून माहिती मिळवू शकतात.
याशिवाय, शेतकरी व्हाट्सअप च्या चॅटबॉट वर क्रमांक व संदेश पाठवून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळवू शकतात. तसेच तुम्ही तुमची विमा पॉलिसी येथून सहजपणे डाऊनलोड करू शकता.Pik Vima Yojana 2025
बाजार समितीमध्ये नवीन हरभऱ्याची आवक पहा…आजचे हरभरा बाजार भाव
सरकार 2025-26 पर्यंत पिक विमा योजना ! Pik Vima Yojana 2025
एक जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने 2025-26 पर्यंत प्रधानमंत्री पिक विमा योजना आणि हवामान आधारित पिक विमा योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे
त्याचे एकूण बजेट 69 हजार 515.71 कोटी रुपये आहे. विमा योजनेतील तांत्रिक सुधारणांसाठी 824.77 कोटी रुपयांच्या खर्चासह फंड फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (FIAT) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पंतप्रधान पिक विमा योजना पोर्टल | https://pmfby.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 14447 |
व्हाट्सअप नंबर | 7065514447 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |