Pik Vima 2025 अवघा एक रुपया तर भरायचा आहे म्हणून मागील वर्षाच्या खरीप हंगामात पिक विमा भरलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 4 लाख 99 हजार 280 शेतकऱ्यांना एक दमडीही मंजूर झाली नाही. 74 हजार शेतकऱ्यांना मंजूर 82 कोटी रकमेसाठी देखील विमा कंपनीने वेटिंगवर ठेवले आहे.

खरीप व रब्बी हंगामातील पिक विमा रक्कम भरताना शेतकऱ्याने अवघा एक रुपया भरण्याची राज्य शासनाने तरतूद केली होती. शेतकरी हिस्स्याची रक्कम राज्य सरकारने भरली होती. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 38 हजार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभाग घेतला. प्रति एक रुपया याप्रमाणे शेतकऱ्यांचे 7 लाख रुपये विमा कंपनीकडे जमा झाले.
उन्हाळी भुईमुगाची काढणी कधी आणि कशी कराल? जाणून घ्या सविस्तर;
Pik Vima 2025 विमा कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून 2 लाख 39 हजार शेतकऱ्यांना कोटी मंजूर केले आहेत. त्यातील 82 कोटी अद्याप 73 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले नाही. मंजूर रकमेसाठी ही शेतकऱ्यांना वेटिंग वर ठेवले आहे. एकीकडे मंजूर रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नसताना तब्बल 5 लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे. म्हणजे या पाच लाख शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून एक दमडीही मिळणार नाही.

Pik Vima 2025 संरक्षित रक्कम कशासाठी?
विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी विमा भरल्यानंतर केंद्र व राज्य शासन त्यांचा हिस्सा विमा कंपनीकडे जमा करते. त्याच्या आधारे विमा कंपनी संरक्षित रक्कम अंतिम करते.
Pik Vima 2025 मागील वर्षीच्या खरीप हंगामाचे संरक्षित किंमत रक्कम 2081 कोटी इतकी आहे. प्रत्येक तालुक्याचे संरक्षित रक्कम कोट्यावधी असून वेगवेगळी आहे. अशी संरक्षित रक्कम खरीप व रब्बी हंगामात असते.
“जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीला सांगितले आहे. जवळपास 82 कोटी मंजूर असलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 5 लाख अर्ज अपात्र झालेत. त्याची कारणे कंपनीला सांगावे लागेल. त्यानंतरच पिक विमा संदर्भात निर्णय घेता येईल. – शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.”
तालुक्याचे नाव | सहभागी शेतकरी | मंजूर शेतकरी | मंजूर रक्कम |
अक्कलकोट | 100912 | 38397 | 42 |
बार्शी | 115752 | 89990 | 114 |
करमाळा | 104397 | 12679 | 0.9 |
माढा | 166509 | 22800 | 14 |
माळशिरस | 42345 | 1528 | 1.41 |
मंगळवेढा | 63101 | 27039 | 14.28 |
मोहोळ | 3076 | 7856 | 22 |
पंढरपूर | 9405 | 951 | 2.28 |
सांगोला | 87437 | 3210 | 5.48 |
उत्तर सोलापूर | 23228 | 12519 | 35 |
दक्षिण सोलापूर | 54333 | 20444 | 18.37 |
एकूण | 738183 | 238903 | 279 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |