Pik Vima 2025 एक रुपयात पिक विमा उतरलेल्या 8 हजार शेतकऱ्यांना खरीपात नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळण्यासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर 8 हजार 883 शेतकऱ्यांना 8 कोटी 71 लाख 76 हजार रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने आपल्या हिश्याची रक्कम अदा करण्यास उशीर लावला.
कापसावरील आयात शुल्क हटवण्यासाठी सरकारवर दबाव, वाचा सविस्तर;
त्यामुळे भरपाईची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सर्वात जास्त 2 कोटी 69 लाख 63 हजार रुपयांची भरपाई शिरोळ तालुक्यातील 2 हजार 492 शेतकऱ्यांना मिळणार आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 1 रुपयात पिक विमा उतरण्याचा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून सुरू झाला. शेतकऱ्यांमध्ये यासाठी जागृती व्हावी, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले. त्यास हळूहळू प्रतिसाद मिळत गेला.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास विमा असेल तरुण भरपाईचा मार्ग सुकर झाला. त्याच प्रमाणे संख्या मोठी नसली तरी ज्यांचे नुकसान झाले त्यांना मात्र नुकसानीचे पैसे मिळू लागले आहेत.
Pik Vima 2025 खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा एक रुपयात विमा शेतकऱ्यानी जून ते ऑक्टोबर अखेर उतरला. त्यानंतर काही ठिकाणी महापूर, नैसर्गिक आपत्तीमुळे यामुळे सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी, नाचणी पिकांचे मोठे नुकसान झाले.
यांची कल्पना 72 तासात संबंधित विभागाला कळविण्यात आली. त्यामुळे तत्काळ पंचनामे सुरू झाले. गावोगावच्या कृषी सहाय्यकांना सोबत घेत विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसान भरपाईचे पंचनामे केले.
त्याची माहिती संबंधित विभागाला ऑनलाईन कळविण्यात आली; परंतु हंगाम संपून सहा महिने होत आले तरी भरपाईची रक्कम मिळण्यास वेळ होत गेला.
Pik Vima 2025 कृषी विभाग, विमा कंपन्यांकडे चौकशी करून शेतकरी थकला. गेल्या आठवड्यात शासनाकडून थकीत असलेला हप्ता अदा झाला.
त्यामुळे तत्काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 8 कोटी 71 लाख 76 हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे विमा काढण्याकडे कल वाढणार आहे.
विमा शेतकऱ्यांनी जून ते ऑक्टोंबर अखेर उतरला. त्यानंतर काही ठिकाणी महापूर, नैसर्गिक आपत्ती यामुळे सोयाबीन, भुईमूग, भात, ज्वारी, नाचणी, पिकांचे मोठे नुकसान झाले. याची कल्पना 72 तासात संबंधित विभागाला कळविण्यात आली.
Pik Vima 2025 ‘100’ टक्के नुकसान झाल्यास विमा संरक्षित मिळणारी रक्कम (हेक्टरी)
| सोयाबीन | 49,000 |
| भात | 42,000 |
| भुईमूग | 38,000 |
| ज्वारी | 28,000 |
| नाचणी | 27,000 |
” हवामान बदलामुळे उत्पादनामधील जोखीम दिवसेंदिवस वाढत असून, ज्या शेतकऱ्यांनी गतवर्षातील खरीप हंगामासाठी विमा उतरवला आणि ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना विम्यामुळे आर्थिक मदत झाली. यामुळे प्रत्येक पिकांचा विमा काढणे गरजेचे आहे. -नामदेव परीट, कृषी उपसंचालक “
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |