Pik Vima 2025 पिक विमा कंपन्यांना राज्याकडून पिक विमा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप 2022 पासून प्रलंबित असलेली विविध हंगामातील पिक विमा भरपाई मिळण्यास अडचणी येत होत्या. पण मार्च अखेरीस राज्य सरकारने प्रलंबित असलेला राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने घेतलेला निर्णयामुळे आता राज्यातील 64 लाख शेतकरी अर्जदारांच्या खात्यावर 2 हजार 255 कोटी विमा नुकसान भरपाई जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दूध अनुदान मंजूर, शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी येणार पैसे?
Pik Vima 2025 महाराष्ट्र शासनाने आज विविध शासन निर्णय अन्वये विमा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान रक्कम 2 हजार 852 कोटी वितरित करण्यास मान्यता दिली.

यामुळे आता पाठीमागील विविध हंगामात हंगामात प्रलंबित असलेली नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Pik Vima 2025 आता हंगामी निहाय अदा करण्यात येणारी नुकसान भरपाई रक्कम पुढीलप्रमाणे.
1 | खरीप 2022 | आणि रब्बी 2022-2023 मधील | 2.87 कोटी |
2 | खरीप 2023 | मधील | 181 कोटी |
3 | रब्बी 2023-24 | मधील | 63.14 कोटी |
4 | खरीप 2024 | मधील | 2308 कोटी |
अशी एकूण वाटप होणारी रक्कम 2 हजार 555 कोटी रुपये एवढी असून त्याची सर्वसाधारण शेतकरी लाभार्थी अर्ज संख्या 64 लाख आहे.
सदरची रक्कम आता तातडीने शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही विमा कंपनी मार्फत करण्यात येणार आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |