Pik Pani Mahiti 2025 उन्हाळी पिक उत्पादनात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरतो. पिकास पाणी देण्याच्या पद्धती ठराविक दिवसाच्या अंतराने पिकास पाणी देणे, बाष्पीभवन पात्रातून पाण्याचे होणारे विशिष्ट प्रमाणातील बाष्पीभवन लक्षात घेऊन पिकास पाणी देणे आणि पिकाच्या संवेदनक्षम अवस्थेत पिकास पाणी देणे याचा समावेश होतो.

- उन्हाळी पिकांसाठी संवेदनक्षम अवस्था नुसार पाणी दिल्यास दोन पाण्यातील अंतर जास्त राहते.
- उन्हाळी हंगामात वातावरणाची पाण्याची गरज खूपच जास्त असल्याने जास्त अंतराने दिलेल्या पाण्याने पिकाची गरज भागत नाही.
- पर्यायाने पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी सीएससी केंद्रांवर गर्दीच गर्दी! 5 मिनिटांत घरबसल्या अशी करा नोंदणी…
- म्हणून उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांना जमिनीच्या प्रकारानुसार ठराविक दिवसाच्या अंतराने पाणी देणे गरजेचे असते.
- एकंदरीत उन्हाळी हंगामात घेतलेल्या पिकांना जमिनीच्या मगदूराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

WhatsApp Group
Join Now
Pik Pani Mahiti 2025 असे करा पाणी व्यवस्थापन !
उन्हाळी भुईमुगाची | पाण्याची एकूण गरज संपली सुमारे 700 ते 800 मि.मी. (70 ते 80 सें.मी.) एवढी असते. ही गरज एकूण 12 ते 13 पाण्याच्या पाळ्यातून भागवावी. |
मका पिकाची | पाण्याची गरज 40 ते 42 सें.मी. एवढी असते. उन्हाळी हंगामात 6 ते 7 पाण्याच्या पाळ्या मका पिकास द्याव्यात. |
बाजरी पिकास | उन्हाळी हंगामात 30 ते 35 सें.मी. पाणी लागते. त्यासाठी बाजरी पिकास 5 ते 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. |
सूर्यफूल पिकाची | उन्हाळी हंगामातील पाण्याची गरज जवळपास 40 सें.मी. एवढे असते. सूर्यफूल पिकालाही उन्हाळी हंगामात 5 ते 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. |
कांदा, वांगी, दोडका | यासारख्या भाजीपाला पिकास 75 ते 80 सें.मी. पाणी उन्हाळी हंगामात लागते. या पिकांना एकूण 13 ते 15 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |