राज्यातील ‘या’ जिल्ह्याना मिळणार ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत!! Pik Nuksan Bharpai 2025

Pik Nuksan Bharpai 2025 ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्राच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Pik Nuksan Bharpai 2025

Pik Nuksan Bharpai 2025 लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

योग्य वेळी करा खरीप पिकांची आंतरमशागत!!

Pik Nuksan Bharpai 2025 राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे 654 महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

WhatsApp Group Join Now

Pik Nuksan Bharpai 2025 ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये राज्यात 17 लाख 85 हजार 714 हेक्टर (42 लाख 84 हजार 846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.

यात प्रामुख्याने खरीप क्षेत्र पिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तुर, मूग, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे.

सर्वाधिक बाधित जिल्हे: Pik Nuksan Bharpai 2025

नांदेड7,28,049 हेक्टर
यवतमाळ3,18,860 हेक्टर
वाशिम2,03,098 हेक्टर
अकोला1,77,466 हेक्टर
धाराशिव1,57,610 हेक्टर
बुलढाणा89,782 हेक्टर
सोलापूर47,266 हेक्टर

बाधित पिके: Pik Nuksan Bharpai 2025

सोयाबीन मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपीके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

WhatsApp Group Join Now

बाधित जिल्हे: Pik Nuksan Bharpai 2025

नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर, आणि पुणे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment