Pik Nuksan Bharpai 2025 नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत “अवेळी ” पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.429.30 लक्ष (रुपये चार कोटी एकोणतीस लक्ष तीस हजार) इतका वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

नोव्हेंबर 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा लेखाशिर्षनिहाय तपशील
बेदाण्याचा विक्रम, पंढपूरच्या शेतकऱ्याला प्रति किलोला मिळाला 651 रुपयांचा उच्चांकी दर;
Pik Nuksan Bharpai 2025 अ)कोकण विभाग (कालावधी नोव्हेंबर 24 |प्रस्तावाचा दिनांक: 16.01.2025)
जिल्हा | बाधित शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र (हेक्टर) | निधी (रु.लक्ष) |
रत्नागिरी | 53 | 6.4 | 1.04 |
सिंधुदुर्ग | 446 | 66.07 | 9.8 |
एकूण | 499 | 72.47 | 10.84 |

Pik Nuksan Bharpai 2025 अ) नाशिक विभाग (कालावधी – डिसेंबर 2024 | प्रस्तावाचा दिनांक: 22.02.2025)
जिल्हा | बाधित शेतकरी संख्या | बाधित क्षेत्र (हेक्टर) | निधी (रु.लक्ष) |
नाशिक | 522 | 267.5 | 96.14 |
धुळे | 1252 | 939.3 | 167.1 |
जळगाव | 1145 | 1029 | 155.2 |
एकूण | 2919 | 2236 | 418.5 |
वरील टेबल मध्ये दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदी मधून अथवा आवश्यकतेनुसार पुर्नविनीयोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन यांनी हा निधी वितरित करावा.
DBT पोर्टल द्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणाली वर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी.
Pik Nuksan Bharpai 2025 चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानी करिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.
शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि. 01.01.2024 नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी.
कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी.
वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्ती करिता विहित केलेल्या अटी व शर्तीचा पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी.
Pik Nuksan Bharpai 2025 लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बॅंकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वरती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |