Pik Krushi Salla 2025 सद्यस्थितीत उन्हाळ बाजरीच्या वाढीच्या अवस्थेत असून या पिकासाठी पाणी व्यवस्थापन, तसेच गहू पीक काही भागात पक्वतेच्या अवस्थेत तर काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे. शिवाय रब्बी मका पिक पक्वतेच्या अवस्था, कापणी अवस्थेत आहे. या तिन्ही पिकांसाठी ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्राकडून सल्ला देण्यात आला आहे.
WhatsApp Group
Join Now

Pik Krushi Salla 2025 उन्हाळी बाजरी पाणी व्यवस्थापन
- जमिनीच्या मगदूरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत 10 ते 12 दिवसांच्या अंतराने 5 ते 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर 35 ते 45 दिवसांनी), तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी) द्यावे.
राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीचे आवक…पहा आजचे ज्वारी बाजार भाव !
Pik Krushi Salla 2025 गहू पक्वतेच्या अवस्था कापणी अवस्था
- वेळेवर पेरलेल्या गव्हाची काढणी व मळणी करावी.
- गहू पीक पक्व होण्याच्या दोन-तीन दिवस अगोदर पिकाची कापणी केल्याने गव्हाचे दाणे शेतात झडण्याचा प्रकार आढळत नाही.
- गहू पिकाची काढणी सकाळच्या वेळेस करावी.
- गव्हाची मळणी यंत्राच्या साह्याने करावी किंवा कापणी व मळणी कंबाईन हार्वेस्ट मशीनने करावे.
- मळणी करताना दाणे फुटणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकाला जास्त काळ उष्ण तापमानाचा सामना करावा लागणार आहे.
- त्यामुळे या पिकाला दर पंधरा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
- म्हणजे एकूण काळात पाण्याच्या 5 पाळ्या नियमित (4 अधिक अतिरिक्त 1) द्याव्या लागतील.
- पाण्याच्या दोन पाळ्या दरम्यान जास्त अंतर राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
- कारण जमीन कोरडी पडल्यास उंदरांचा त्रास होण्याची शक्यता असते.

Pik Krushi Salla 2025 रब्बी मका पक्वतेच्या अवस्था कापणी अवस्था
- कणसे पिवळसर दाणे खडक झाल्यानंतर कणसे खुडून काढावी काढावीत.
- ही कणसे दोन ते तीन दिवस उन्हात चांगली वाळवावीत.
- त्यानंतर कणसाच्या वरील आवरण काढून मका सोलणी यंत्राच्या (म.फु.कृ.वि राहुरी द्वारे विकसित सुधारित अवजार) साह्याने कणसातील दाणे वेगळे करावेत. दाण्यांतील पांढरी तुसे, बिट्ट्याचे तुकडे वेगळे करण्यासाठी उफणनी करावी.
- दाणे चांगले उन्हात वाळवून दाण्यातील आद्रता 12 टक्क्यांपर्यंत ठेवून साठवण करावी.
WhatsApp Group
Join Now
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |