Pik Karja 2025 शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येते. या पीक कर्जाच्या मर्यादेत आता वाढ करण्यात आली असून; शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज देण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील 1 लाख 60000 पेक्षा जास्त शेतकरी खरीप हंगामात पीक कर्ज घेतात. शेतकऱ्यांना एक वर्षासाठी कर्ज देण्यात येते यावर्षी 1 एप्रिल 2025 पासून यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत होते. पीक कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली असली, तरी सोयाबीन, कापूस व तूर या मुख्य पिकांच्या कर्जाच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आली नाही.
सोयाबीन पिकासाठी 60,900 प्रति हेक्टरी पीक कर्ज देण्यात येते. कापूससाठी 73,500 तर तुरीसाठी 50,820 रुपये पीक कर्ज देण्यात येते. मूग व उडीदाच्या पीक कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली असून, पूर्वी मूग व उडीद पिकांसाठी 22,800 रुपये कर्ज देण्यात येत होते. आता 23,940 रुपये पीक कर्ज देण्यात येणार आहे.
आता दोन लाख कर्ज हवे असल्यास लागणार सर्च रिपोर्ट
- शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 लाख 60 हजार रुपये पीक कर्ज हवे असल्यास सर्च रिपोर्ट काढावा लागत होता. यामध्ये आता वाढ करण्यात आली असून, 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज असल्यास सर्च रिपोर्ट काढावा लागणार आहे.
- सर्च रिपोर्ट बँकेने ठरविलेल्या वकिलांकडून काढावा लागतो. त्याकरिता तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. आता रक्कम वाढविल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
87% उद्दिष्ट गतीवर्षी Pik Karja 2025
मागील वर्षी अकोला जिल्ह्याला खरीप हंगामात पिक कर्ज वाटपा करिता 1300 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी 1152 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. ही टक्केवारी 87 टक्के आहे.
उर्वरित शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई मंजूर, कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान? वाचा सविस्तर
Pik Karja 2025 बँकांना आदेश नाहीत
महाराष्ट्र शासनाच्या वतीने पिक कर्ज वाढीचा निर्णय घेण्यात आला असला, तरी अद्याप बँकांना याबाबत आदेश देण्यात आले नाहीत. 1 एप्रिल पासून 2025-26 या वर्षासाठी पीक कर्ज वाटपास सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी आदेश येण्याची शक्यता असल्याचे अकोला लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितले.
मर्यादा वाढीचा फायदा मोठ्या शेतकऱ्यांनाच
शासनाने शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपाच्या मर्यादित वाढ केली असली, तरी सोयाबीन, कापूस, तूर या जिल्ह्यातील मुख्य पिकाच्या पीक कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली नाही. त्यामुळे पाच एकरापर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही. या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकरी जेवढे कर्ज मिळत होते, तेवढेच मिळणार आहे.
पीक निहाय मिळणारे Pik Karja 2025
पीक | पीक कर्ज 2024 प्रती हेक्टर | पीक 2025 कर्ज प्रती हेक्टर |
सोयाबीन | 60,900 रुपये | 60,900 रुपये |
कापूस | 73,500 रुपये | 73,500 रुपये |
तूर | 50,820 रुपये | 50,820 रुपये |
मूग | 22,800 रुपये | 23,940 रुपये |
उडीद | 22,800 रुपये | 23,900 रुपये |

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |