पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत लवकरच संपणार, कर्जमाफी होणार का? Pik Karj 2025

Pik Karj 2025 कोल्हापूर पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत जूनला संपत असल्याने जिल्हा बँक आणि विकास संस्थांच्या पातळीवर वसुलीची मोहीम गतिमान झाली असली, तरी कर्जमाफीचे गाजर शासनाने दाखविल्याने शेतकरी कर्ज भरणार.

Pik Karj 2025

त्यामध्ये विकास संस्थांचे संगणकीकरण झाल्याने कर्जाची फिरवाफिरवी येत नसल्याने पीक आणि मध्यम मुदत कर्ज वसुली संस्थांची डोकेदुखी ठरली आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी अनुदानाची ‘लॉटरी’ बंद आता लॉबीचा खेळ सुरू, काय आहे प्रकरण?

Pik Karj 2025 जिल्हा बँक विकास संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक व मध्यम मुदत कर्जाचा पुरवठा करते. ‘नाबार्ड’ ने दिलेल्या कर्ज मर्यादेनुसार शेतकऱ्यांना पीक निहाय कर्जाचे वाटप करण्यात येते.

WhatsApp Group Join Now

कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांशी पीक कर्जाचे वाटप हे ऊस पिकासाठी होते त्याशिवाय ट्रॅक्टर पाईपलाईन आणि इतर शेतीच्या कामासाठी मध्यम मुदत कर्ज ही संस्थांच्या वतीने दिले जाते. साधारणतः नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत जिल्ह्यात साखर कारखान्यांचा हंगाम चालतो.

दरम्यान, काळात साखर कारखान्यांच्या बिलातून विकास संस्था संबंधित कर्जदार शेतकऱ्यांचे पैसे परस्पर वर्ग करून घेतात. त्यातून संपूर्ण कर्जाची परतफेड झाली नाही तर रोखीने भरण्यास सांगितले जाते.

Pik Karj 2025 जुने भरल्यानंतर चौथ्या दिवशी नवीन कर्ज!

  • यापूर्वी शेतकऱ्यांची आर्थिक अडचण पाहून, संस्थापक कर्जाचे व्याज भरून घेऊन त्याच दिवशी नवीन कर्ज दिले जायचे.
  • संगणकीकरणामुळे आता जुने कर्ज फेडल्यानंतर चौथ्या दिवशी नवीन उचल दिली जाते.

उसाचा उतारा घटला, वसुलीला फटका बसला…..

  1. यंदा उसाच्या एकरी उत्पादनात मोठी घट झाल्याने साखर कारखान्यांची धुराडी फेब्रुवारीमध्ये थंड झाली.
  2. अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने त्याचाही परिणाम कर्जाच्या वसुलीवर झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

WhatsApp Group Join Now

Pik Karj 2025 थकीत संस्था मतदानास अपात्र?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक दीड वर्षावर आली आहे. सहकार कायद्यानुसार ज्या संस्था सलग तीन वर्ष थकीत असतील, त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे जास्तीत जास्त वसुलीचे आवाहन संस्था समोर राहणार आहे.

शासनाच्या धोरणांचा फटका सगळ्यांनाच बसत आहे. पीक कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा. 30 जून पर्यंत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान योजना तत्काळ जाहीर करावी. -बाबासाहेब देवकर, संचालक, हनुमान विकास गाडे गोंडवाडी”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment