फलटण बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण, कांदा उत्पादकांना बसतोय आर्थिक फटका! Phaltan Kanda Bajarbhav 2025

Phaltan Kanda Bajarbhav 2025 सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे कांद्याच्या दरात मोठ्या घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण येथे मंगळवारी दिनांक 24 तारखेला कांद्याची मोठी आवक आल्याने दरात किमान 300 ते 2001 रुपये प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळाला. बाजार समिती एकूण 2 हजार 981 क्विंटल आवक झाली. साधारणपणे 5 हजार 962 करण्याची पिशव्यांची आवक झाली.

Phaltan Kanda Bajarbhav 2025

सध्या फलटण तालुक्यातील विविध भागात शेतकऱ्यांनी अडी लावून ठेवली होती. परंतु मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा पावसाने भिजला असल्याने बाजार समिती मोठी आवक झाल्याने दरामध्ये घसरण झाली आहे. परंतु उन्हाळी कांदा बाजारात येत असतानाच दरामध्ये मोठी घसरण सुरू झाली.

माळेगाव साखर कारखान्याने मागील दहा वर्षात ऊसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी? 

Phaltan Kanda Bajarbhav 2025 यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. आधीच लागवड आणि संगोपन खर्च वाढला असताना त्यात आता दर घसरत असल्याने शेतकरी बेजार झाले आहेत. उन्हाळी कांद्याची बाजारात आवक वाढल्याने दरात मोठा उतारा आला आहे. दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत दर घसरला आहे.

WhatsApp Group Join Now

Phaltan Kanda Bajarbhav 2025 फलटण तालुक्यात कांद्याचे क्षेत्र विस्तारात असून, अनेक शेतकरी हे वर्षभर कांदा पिक घेतात. तालुक्यातील कांदा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, बाजार समितीत जातो. यंदाही होणारे कांद्याचे क्षेत्र मोठे असून, त्यातच मागील 45 दिवसांपासून साठवून केलेला उन्हाळी कांदा बाजारात येऊ लागला. आवक अधिक असल्याने घरात उतार आला आहे.

सध्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अडीच हजार ते 3000 प्रतिक्विंटल भाव मिळाला. साठवून ठेवलेला आणि मध्ये 20 टक्के कांदा खराब निघत आहे. उत्पन्नाचा खर्च ज्यादा असल्याने शासनाने हमीभाव द्यावा. – मोरेश्वर जाधव, शेतकरी चौधरवाडी.”

Phaltan Kanda Bajarbhav 2025 भाव मिळवून द्या…..

पाच महिन्यांपूर्वी कांद्याला क्विंटलला साडेतीन हजारापर्यंत भाव मिळत होता. मागील दोन महिन्यांपासून दोन हजार रुपये क्विंटल ने कांदा विकला जात आहे. सध्या तर 2 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

WhatsApp Group Join Now

यंदा प्रचंड उन्हाळा व मुसळधार पावसामुळे कांद्याचे कॉलिटी खूप खराब झालेले आहे. चांगल्या कांद्याचे आवक कमी आहे. तसेच शेतकऱ्यांकडे भरपूर कांदा साठा जास्त असल्याने भविष्यात कांद्याचे दर वाढतील, असे वाटत नाही. – गणेश शहा, व्यापारी, फलटण”.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment