Papaya Crop 2025 पपई हे महाराष्ट्राच एक महत्त्वाचं फळपीक जगात जवळपास 30 ते 32 देशांमध्ये पपई पीक घेतले जाते. उष्णकटिबंधीय फळ पीक असून ते समशीतोष्ण भागातही घेतले जाते. महाराष्ट्र राज्यात पपई खाली क्षेत्र हे नंदुरबार, जळगाव, धुळे, अकोला, वर्धा, पुणे आणि अहमदनगर भागात आढळते.

Papaya Crop 2025 फेब्रुवारी-मार्च महिन्यात लागवड केलेल्या बागा शाकीय वाढ संपवून पुनरुत्पादन अवस्थेतील आहेत. तर अलीकडे मे-जून महिन्यात लागवड केलेल्या बागा बाल्यावस्थेत आहेत. मागील वर्षी लागवड केलेल्या बागांपासून फळ उत्पादन सुरू आहे. हिवाळ्यात पपई पिकांसाठी लागणारे हवामान फारच थोडे योग्य किंवा काठावरचे असते.
हरभरा उत्पादन वाढीचे सुधारित तंत्र!!
Papaya Crop 2025 अशा विपरीत हवामानात पिकांची, फळांची वाढ चांगली व्हावी पीक उत्पादनाचा खर्च कमीत कमी व्हावा, उत्पादित फळांची गुणवत्ता चांगली मिळावी म्हणून विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हीवाळा म्हटले की तापमानात होणारी घट विशेषतः 16 डिग्री सेल्सियस च्या खालील तापमान, मध्यम आद्रता, धुक्याचा होणारा वाईट परिणाम संभावतो. थंड शीत लहरी, कमी तीव्रतेचा तसेच कमी काळ सूर्यप्रकाश उपलब्ध असतो.

Papaya Crop 2025 विशेष काळजी:
शेताची सर्वसाधारण स्वच्छता राखावी, यात प्रामुख्याने बाग तनमुक्त ठेवावी. पपईची सुटलेली पाने खराब फळे वेचून मागे बाहेर नेऊन नष्ट करावेत.
लहान पपईत दोन्ही बाजूने कुळवणी करून वाफ्यातली माती भुसभुशीत ठेवावे, झाडांना मातीने आधार द्यावा. वाफ्यात तडे असल्यास बुजवले जातात. यामुळे जमिनीचे तापमान योग्य राखण्यास मदत होते. योग्य प्रमाणात हवा, पाणी गुणोत्तर राखले जाते.
शिफारसीत मात्रेच्या रासायनिक खतांची मात्रा द्यावीत. खते वाफसा असतानाच द्यावीत. खते कोली करूनच द्यावीत. खते एकत्र करून न देता वेगवेगळी मोजूनच द्यावीत. तसेच ती झाकावीत. हिवाळ्यात जास्तीची थंडी असल्यास व फवारणीतूनही मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यावीत. गरजेनुसार लागवडीनंतर झाडे स्थिरावल्यानंतर 1, 3, 5, 7, 9, व 11 व्या महिन्यात प्रति झाड 50:50:50 ग्रॅम नत्र स्फुरद व पालाश द्यावे. तापमान 15 अंश सें. ग्रे. च्या खाली गेल्यास अन्नद्रव्ये शोषण व वाहनक्रिया योग्य मात्रेत होत नाही. परिणामी पपई झाडे अन्नद्रव्ये कमतरता लक्षणे दाखवतात अशा वेळी फवारणीतून अन्नद्रव्ये द्यावीत. विशेषतः पाने पिवळी पडतात एकूण 1-2 फवारण्या घ्यावात.
Papaya Crop 2025 पाणीपुरवठा व्यवस्थापन:
शिफारशीत मात्रेत शक्यतो रात्रीच्या वेळेस पाणिपुरवठा करावा ठिबकसंचाद्वारे रोज पिकवाढीची अवस्था जमिनीचा प्रकार बघून पाणी पुरवठा करावा.
Papaya Crop 2025 आच्छादन:
दोन ओळीतल्या जागेत शेतातला वाया जाणारा काडीकचरा, जुने बाजरी सरमट, गव्हाचा भुसा यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा, अलीकडे दोन ओळीतल्या जागेत किंवा प्लास्टिक आच्छादनावरच लागवड केली जाते. आच्छादनामुळे जमिनीचे तापमान योग्य राखले जाते. शिवाय गवताचे प्रमाण कमी राहते याशिवाय उपयुक्त जिवाणूंचे संवर्धन चांगले होते.
Papaya Crop 2025 बागेत धूर करणे:
हिवाळ्यात धुके/ दव पडते, धुक्यामुळे कोवळी पाने, बुंधा तसेच फुले चट्टे पडून बाधित होतात. यासाठी बागेत भल्या पहाटे ओलसर काडीकचरा जाळून धूर करावा.

Papaya Crop 2025 फळावर आच्छादन:
थंडीमुळे फळांची वाढ खुंटते फळाभोवती आवरण केल्यास स्वभावताली सूक्ष्म योग्य वातावरण निर्मिती होऊन फळवाडीची क्रिया योग्य होऊन फळ पकवतेचा कालावधी वाढत नाही कागद सिमेंट रिकाम्या बागेचा वापर करावा.
बागेतली कोरडी, रोगट पाने काढावीत व बाहेर नेऊन नष्ट करावेत.
काही वाणात झुपक्याने फळे येतात. अशा वेळेस फळांच्या पूर्ण वाढीसाठी पुरेशी जागा मिळत नाही. परिणामी फळांचा आकार बिघडतो वा फळे लहान राहतात जास्तीची फळे असल्यास सर्वच फळांचे पोषण योग्य प्रकारे होत नाही म्हणून योग्य तेवढीच फळे ठेऊन बाकीच्या फळांची विरळणी करावी.
लहान बागेत कुळव चालवून माती भुसभुशीत करावी जेणेकरून वाफयातील मातीत हवा व पाण्याचे गुणोत्तर योग्य राखले जाईल.
बागेचे रोग नियंत्रणासाठी नियमित निरीक्षण करावे, पपईवर रिंग स्पॉट विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो हा रोग रस शोषणाऱ्या किडीमुळे पसरतो या किडी नियंत्रणासाठी योग्य व शिफारशीत कीडनाशकाची फवारणी करावी.
हिवाळ्यात पपईस प्रतिझाड वयपरत्वे 250-750 ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी.
पपई बागेभोवती वारा प्रतिबंधक कुंपण करावे यासाठी बागेभोवती शेवरी सुबाभूळ गजराज गवत लावावे. सजीव कुंपण नसल्यास 50% सच्छिद्रतेची शेडनेट 6-7 फूट उंचीची लावावी, यामुळे थंड वारे रोखले जातात.
फळे वाढीच्या अवस्थेतली झाडे केव्हा केव्हा एका बाजूस कलतात त्यांना बांबूने आधार द्यावा.
योग्य पक्वता ओळखून फळांची तोडणी करावी, फळे वर्तमानपत्र पेपरमध्ये गुंडाळून ती प्रतवारीनुसार बाजारपेठेत पाठवावीत.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |