या संकल्पनेमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या घटकांचा अंतर्भाव होतो.
Organic Thinking Geoorganic Matter 2025 सजीव सेंद्रिय: उदा. उभ्या वनस्पती, पिके, पशूचे पेशीसमुच्चय, सूक्ष्मजीव, नेमॅटोडस, प्रोटोझ, गांडुळे, इ. सेंद्रिय पदार्थाचे खनिजीकरण करून रासायनिक रूपात पोषणद्रव्य उपलब्ध करून देण्याच्या कार्यशाळेमध्ये या परिसंस्थेला महत्त्व आहे.

पिकांचे ओळखू येणारे अवशेष: उदा. पाने, शेंगा, खोडे, मुळे, इत्यादी. यांच्या कठीणपणानुसार अपघटन मंदपणे चालू राहते व दीर्घकाळात पोषणद्रव्य मुक्त होत राहतात. सेंद्रियाचे पूर्णपणे अपघटन होऊन सर्व अवयवांचे भुकटीस्वरूप झालेला कलिलाच्या स्वरूपातला पदार्थ यालाच ह्युमस असे म्हणतात.
खरीप पिके, जमीन व खत व्यवस्थापन!!
Organic Thinking Geoorganic Matter 2025 भुसेंद्रिय साठे तीन प्रकारचे असतात:
1. अत्यंत क्रियाशील साठा: यामध्ये जे सेंद्रिय पदार्थ असतात त्याचे अर्ध आयुर्मान (निम्मे अपघटन होण्यास लागणारा वेळ) काही दिवसांपासून ते थोड्या वर्षापर्यंत असते.

- हिरवळीच्या पिकाचे कोवळे डहाळे, पॉलिसॅकराइड्स, फुलविक ऍसिड इत्यादी. यात समावेश होतो.
- सूक्ष्म जीवाणूंना अन्न म्हणून सहज उपलब्ध होणारे सेंद्रिय पदार्थ, जमिनीची भौतिक स्थिरता वाढवणारे, निचरा वाढवणारे, झीज होऊ न देणारे आणि जमीन मशागतीला सुरुवात करणारे सेंद्रिय पदार्थ यात समाविष्ट आहेत.
- एकूण सेन्द्रियांमध्ये याचे प्रमाण 10 ते 20 टक्के असते.

2. सावकाश कार्य करणारा साठा: वनस्पती अवशेषामध्ये लिगनिनचे प्रमाण 2 ते 50 टक्के तर फेनोलॉस चे प्रमाण 5 ते 10 टक्के असते. याचे अपघटन अत्यंत सावकाश होते. के स्ट्रॅटेजी जीवाणूंना अण्णांचा स्त्रोत म्हणून यांचा चांगला उपयोग होतो. अतिशय धीमेपणाने या साठ्याचे अपघटन होऊन दीर्घकाळापर्यंत नत्र व इतर पोषणद्रव्याचा पुरवठा करण्याची तरतूद मानावे लागेल.
3. अप्रत्यक्ष कार्य करणारा साठा: मातीचे कण आणि ह्युमस यांच्या संयोगाने संरक्षित ह्युमिन व ह्युमिक ऍसिड यांचा साठा असतो. सेंद्रियपैकी हा साठा 60 ते 90% एवढा असतो. जमिनीच्या कलील गुणांची हा साठा निगडित असतो. जमिनीचा पोत, जलधारणाशक्ती, पोषणद्रव्यांचे आदान प्रदान व उत्पादकता इ. गुण हे या साठ्यावर अवलंबून असतात.
सेंद्रिय पदार्थाचे प्रकार आणि त्यांचे अपघटन करणाऱ्या जिवाणूंचे प्रकार:
Organic Thinking Geoorganic Matter 2025 जमिनीमध्ये घातलेले सेंद्रिय पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात काही प्रकार जलद कुजतात काही मध्यम गतीने कुजतात तर काही प्रकार अपघटन व्हायला खूप उशीर लागतो. ज्यांचा सी.एन रेशो कमी आहे, असे पदार्थ जलद अपघटित होतात. त्यापासून कार्बन डाय-ऑक्साइड पाणी व ऊर्जा उद्भवते. कार्बनडाय-ऑक्साइड भुदरवनातील पाण्यात मिसळला जातो. कार्बोनिक ऍसिड तयार होते त्यामुळे खनिजीकरणातून निघालेली पोषणद्रव्य सहजपणे शोषली जातात.
सेंद्रिय पदार्थांच्या प्रकारानुसार त्यावर आक्रमण करणाऱ्या जिवाणूंचे प्रकारही वेगवेगळे असतात एखाद्या शेतकऱ्याने ऊसाचे पाचट किंवा बाजारीचे काड अथवा गव्हाड असे जास्ती सी.एन रेशो असलेले पिकांचे अवशेष शेतामध्ये घातले तर कार्बन जास्त असल्याने मिळते पण नत्राचे प्रमाण कमी असल्यामुळे सूक्ष्मजीवांना अन्नाचा अभाव जाणवू लागतो. त्यामुळे त्यांची क्रियाशीलता कमी होते.
Organic Thinking Geoorganic Matter 2025 श्वसनाद्वारे निघणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाणही कमी राहते माती मधल्या कार्बनचे प्रमाण हळूहळू कमी होते. अशावेळी जमिनीतला जिवाणूंचा एक गट कार्यरत होतो. अपघटनासाठी कठीण असलेला सेंद्रियावर हळूहळू कार्य करीत अन्न मिळवून टिकवून राहणे हे यांचे वैशिष्ट्य असते अशा प्रकारच्या जिवाणूंना के स्ट्रॅटेजी जिवाणू म्हणतात.

अपघटनाला कठीण असलेल्या सेंद्रिय पदार्थांवर जैविक क्रिया घडवून आणणारी विकरे या जिवाणूतून स्त्रवली जातात. असे हे के स्ट्रॅटेजी जिवाणू ( के मोबिलायझर किंवा पोटॅश मोबिलायझर न्हवे) संख्येने कमी असले तरी मातीमध्ये सातत्याने टिकून असतात. या मंदकृती जिवाणूंच्या धिम्या आक्रमणामुळे अपघटनाला कठीण अशा सेंद्रियंपासून सुद्धा जलविद्राव्य शर्करा अमिनो ऍसिडस् यांची निर्मिती होते.
Organic Thinking Geoorganic Matter 2025 थोड्याच वेळात जलद गतीने काम करणाऱ्या सूक्ष्मजीवांना चेतना मिळते मंदकृती के स्ट्रॅटेजी जिवाणूंना मागे टाकून त्यांची संख्या झपाट्याने वाढते यांना आर स्ट्रॅटेजी किंवा जलदकृती सूक्ष्मजीव असे संबोधन आहे. अचानक उपलब्ध झालेल्या अन्नपदार्थाचा लाभ घेण्यासाठी हे निसर्ग निर्मिती आहे.
जिवाणूंची कार्यशीलता शिगेला पोहोचते तेव्हा मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते अशा स्थितीमध्ये मातीमधील सेंद्रिय पदार्थांच्या जवळजवळ 1 ते 6 भाग सूक्ष्मजीवांनी व्यापलेला असतो. क्रियाशील अशा विपुल सूक्ष्म जीवामुळे कठीण अशा सेंद्रियाचे सुद्धा विघटन सुरू होते. याला प्रायमिंग इफेक्ट म्हणतात. या घडामोडी चालू असताना सहज विघटन होणाऱ्या सेंद्रिय घटकांचा साठा कधी तरी संपुष्टात येतो. आर स्ट्रॅटेजी चे कार्य कमी होते.
Organic Thinking Geoorganic Matter 2025 नायट्रोजन डिप्रेशन:
- शेतामध्ये ऊसाचे पाचट, गव्हाड, ज्वारी, बाजरीचे धाटे यासारख्या जास्त सी.एन रेशो असलेले सेंद्रिय अवशेष मिसळली तर खालील क्रिया घडून येतात.
- हे अवशेष गाडल्यानंतर सूक्ष्मजीवांची अभिक्रिया सुरू होते.
- हे मालिकेतील सूक्ष्मजीव सक्रिय होतात त्यांनी निर्माण केलेल्या अन्नसाठ्याचा लाभ घेण्यासाठी जलद कृती जिवाणू वेगाने वाढतात.
- मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड ची निर्मिती होते.
- अशा जमिनीत उसाचे खोडवे किंवा कोणतेही पीक घेतले असल्यास त्याला नत्र उपलब्ध होत नाही, पीक पिवळे पडू लागते यालाच नायट्रोजन डिप्रेशन म्हणतात.
- सहज मिळणाऱ्या कार्बनचे उपलब्धता असेपर्यंत ही क्रिया चालू राहते.
- कार्बन कमी झाल्यानंतर सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होते.कार्बनचे प्रमाण कमी झाल्यामुळे उरलेल्या अवशेषांचा सी.एन रेशो कमी होतो. हा रेशो 20:1 च्या जवळपास असल्यास खनिजीकरण सुरू होते.
- जास्त प्रमाणात सी.एन रेशो असलेले सेंद्रिय अवशेष जमिनीत मिसळल्यास नायट्रेट डिप्रेशनचा जो काळ येतो त्यामुळे मुख्य पीक पिवळट व खुजे राहतात.
- नायट्रेट डिप्रेशन टाळण्यासाठी पाचट कुजविण्यासाठी त्यावर युरिया एकेरी 1 ते 2 गोणी पसरण्याचा सल्ला यासाठी दिला जातो.
- मुख्य पीक घेण्यात काही आठवडे सेंद्रिय घालावे नायट्रेट डिप्रेशनचा काळ निघून गेल्यानंतर मोठे पीठ द्यावे.
- कमी सी.एन रेशो असलेले सेंद्रिय खत घातल्यास सूक्ष्मजीवांना भरपूर नत्र मिळतो. खनिजीकरण चांगले होते सेंद्रिय नत्राचे रासायनिक तंत्रात रूपांतर होते. सूक्ष्मजीवांची वाढ चांगली होते, पिकांना जोम येतो.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |