Organic Fertilizer 2025 जिवाणू संवर्धक अथवा जैविक खत म्हणजे उपयुक्त अशा जिवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण जे बियाणे, रोपे अथवा जमिनीत वापरल्यास त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते व नत्र स्थिरीकरण तसेच स्फुरद विद्रव्याच्या उपलबध्दतेत लक्षणीय वाढ होऊन पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

Organic Fertilizer 2025 जिवाणू खतांमध्ये रायझोबियम, ऍझोटोबॅक्टर, ऍझोस्पिरिलम, बायजेरिकिया, स्फुरद विद्राव्य जिवाणू आणि ऍसेटोबॅक्टर या सारखे जिवाणू आहेत. हे जिवाणू डोळ्यांना दिसत नाहीत, मात्र ते जमीनीत वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक क्रिया घडवून आणतात व या क्रियेमुळे हवेतील नत्र पिकांस उपलब्ध करून दिले जाते व साहजिकच जमिनीचा पोत सुधारतो.
हळदीला आला भाव 5 दिवसांत इतक्या रुपयांची वाढ!!
रायझोबियम जिवाणू खते: Organic Fertilizer 2025
यातील जिवाणू द्विदल वर्गातील उदा. डाळी, भुईमूग, इ. वनस्पतीसोबत राहून सहजीवी पद्धतीने कार्य करून उपलब्ध नत्राचा अन्नांश साठवून ठेवतात. यामुळेच द्विदल पिकानंतर त्या जमिनीत घेतलेल्या पिकांचे उत्पादन वाढलेले आपणास दिसते. या प्रकारातील जिवाणू मुळांमध्ये प्रवेश करतात. सर्व द्विदल पिके रायझोबियम जिवाणूंचे यजमान आहेत. हे जिवाणू यजमान वनस्पतीशिवाय हवेतील नत्र स्थिर करू शकत नाहीत. रायझोबियम जिवाणू हळद हळद गाठी निर्माण करून राहतात पूर्ण वाढलेल्या आणि कार्यक्षम गाठी मध्ये असणाऱ्या लेगहिमोग्लोबिन नायट्रोजिनेज या विकाराच्या मदतीने नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात.

गाठीमध्ये लेगहिमोग्लोबिनचे प्रमाण जितके जास्त तितक्या अधिक प्रमाणात हवेतील नत्र प्रति हेक्टरी स्थिर करतात. हे जिवाणू 30 ते 170 किलोमीटर प्रति हे हेक्टरी स्थिर करतात. हे स्थिरीकरण हवामानानुसार व जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळे आहे. या प्रकारामध्ये रायझोबियमचे कार्यक्षमतेच्या दृष्टीने सात गट पडतात. एका विशिष्ट गटातील जिवाणू त्या गटातील पिकासाठीच कार्य करतात.
| रायझोबियम स्पेसीज | गटाचे नाव | पिके |
| रायझोबियम लेग्युमिनिसोरम | वाटाणा गट | वाटाणा मसूर |
| रायझोबियम फॅसिओलस | घेवडा गट | श्रावण घेवडा |
| रायझोबियम ट्रायफोली | बरसिम गट | बरसीम घास |
| रायझोबियम मेलीलोटी | अल्फा बेट | मेथी, लसूण घास |
| रायझोबियम जॅपोनिकम | सोयाबीन गट | सोयाबीन |
| ब्रॅडी रायझोबियम स्पेसीज | चवळी गट | भुईमूग, तूर, मूग, उडीद, चवळी, वाल, मटकी |
| रायझोबियम लुपिनी | हरभरा गट | हरभरा |
ऍझोटोबॅक्टर: Organic Fertilizer 2025
हे जिवाणू स्वतंत्ररित्या जमिनीत तसेच रोपांच्या मुळाभोवती राहतात व नायट्रोजन या एन्झाइमच्या मदतीने हवेतील नत्र स्थिर करतात. ते नत्र रोपांद्वारे घेतल्याने रोपांची जोरदार वाढ होते. हे जिवाणू मुख्यत्वेकरून गाठी न येणारी एकदल तृणधान्य, भाजपाला व फळझाडे उपयुक्त ठरतात. हे जिवाणू हवेतील नत्राचे रूपांतर अमोनियामध्ये करतात व बी जीवनसत्वे व जिब्रेलिन बाहेर सोडतात. जमिनीचा सामू 6.8 ते 8.0 उदासीन व आम्लाच्या दरम्यान असणाऱ्या जमिनीत कार्यक्षतेने नत्राचे स्थिरीकरण करतात.
बायजेरिकिया: Organic Fertilizer 2025
हे जिवाणू अझोटोबॅक्टर प्रमाणे असहजीवी पद्धतीने कार्य करतात हे जिवाणू मुख्यत्वे करून आम्लधर्मीय जमिनीत आढळून येतात. हे जिवाणू एकदल व तृणधान्य पिकासाठी उपयोगी ठरतात.
ऍझोस्पिरिलम:
हे जिवाणू पिकांच्या मुळाभोवती राहून किंवा मुलामध्ये प्रवेश करून हवेतील नत्र स्थिर करतात. तृणधान्ये (मका, ज्वारी व बाजरी) एकदल पिके व भाजीपाला यासाठी हे जिवाणू फायदेशीर ठरतात. ऍझोटोबॅक्टर पेक्षा दीड ते दोन पट जास्त नत्र स्थिर करण्याची व पिकाला पुरविण्याची कार्यक्षमता या जिवाणूंमध्ये आहे.
ऍसेटोबॅक्टर: Organic Fertilizer 2025
हे जिवाणू अंतरप्रवाही असून पिकांच्या मुळाद्वारे व पानांद्वारे नत्राचे स्थिरीकरण केले जाते. ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये या जिवाणूंचा संवर्धक वापर होऊ शकतो. (महत्त्वाची स्पेसिज ग्लुकाँन असेटोबॅक्टर)
स्फुरद विद्राव्य जिवाणू खते:
वनस्पतीच्या महत्वाच्या तीन अन्नद्रव्यांपैकी स्फुरद कोणत्या ना कोणत्या रासायनिक स्वरूपात मातीच्या कणामध्ये स्थिर होतो. त्यामुळे खत रूपाने दिलेल्या स्फुरदाचा उपयोग वनस्पती शोषणासाठी करून घेऊ शकत नाहीत. ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण आणि सामू जास्त आहे. त्या जमिनीत वापरलेल्या स्फुरदाच्या 40 ते 80 टक्के स्फुरद जमिनीत मातीच्या कणावर स्थिर होतो. आम्लयुक्त, खारवट किंवा अल्कधर्मीय जमिनीत स्फुरद अविद्राव्य स्थितीत स्थिर होण्याचे प्रमाण जास्त असते.
जमिनीतील अविद्राव्य स्फुरद विरघळण्याचे कार्य विशिष्ट प्रकारचे जिवाणू करत असतात. त्यामुळे तो पिकांना उपलब्ध होतो. स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंकडून सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, मॅलीक आम्ल फ्युमटिक आम्ल यासारखे अनेक कार्बनिक अम्ले तयार केले जातात. ही आम्ले अविद्राव्य स्फुरद विद्राव्य स्वरूपात रूपांतरित करतात.
जिवाणू खतांचे फायदे:
- बियाण्यांची उगवण व चांगली होते.
- नत्र, स्फुरद व इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
- पिकांची वाढ चांगली होते.
- रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
- नत्र व स्फुरद खतांची 25 टक्के बचत होते.
- पीक उत्पदनात 10 ते 15 टक्के वाढ होते.
- जमिनीचा सर्वांगीण पोत सुधारतो.
- नंतरच्या हंगामातील पिकावर चांगला परिणाम होतो.
- प्रति युनिट उपलब्धता होणाऱ्या अन्नद्रव्याचा खर्च कमी असतो.
- कोरडवाहू शेतीमध्ये सुद्धा चांगला फायदा होतो.
| जिवाणू संवर्धके | पीक | मात्रा प्रति किलो बियाणे |
| ऍझोटोबॅक्टर | कपाशी, ज्वारी, गहू, धान, इत्यादी. तृणधान्याकरिता | 25 ग्रॅम |
| रायझोबियम | सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग, इत्यादी. शेंगवर्गीय पिकास | 25 ग्रॅम |
| स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी.) | सर्व पिकांकरिता | 20 ग्रॅम |
जिवाणू संवर्धके वापरण्याची पद्धत:
जिवाणू संवर्धके प्रति किलो बियाणास वापरावीत.
एक लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे.
वरील द्रावण थंड झाल्यावर त्यातील पुरेशा द्रावणात 200 ते 250 ग्रॅम जिवाणू संवर्धन मिसळावे.
10 ते 12 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर, प्लँस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून त्यावर तयार केलेले संवर्धकाचे मिश्रण शिंपडावे.
नंतर हलक्या हाताने बियाण्यास चोळावे.
बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया प्रथम करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे (ऍझोटोबॅक्टर किंवा रायझोबियम) स्फुरद विरघळणारे (पी.एस.बी.) यांचे मिश्रण करून बियाणास लावावे.
प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे.
प्रक्रिया केल्यानंतर बियाणे 24 तासाच्या आत पेरावे.
जिवाणू संवर्धक लावताना घ्यावयाची काळजी:
जिवाणू संवर्धकाचे पाकीट थंड व कोरड्या जागी, कीटकनाशके, बुरशीनाशके व जंतुनाशके तसेच रासायनिक खतांपासून दूर ठेवावे.
जिवाणू संवर्धकाच्या पाकिटावर जी अंतिम तारीख दिलेली असेल त्या तारखेपर्यंतच जिवाणू खताचा वापर करावा.
रायझोबियम जीवाणू लावण्यापूर्वी सर्व कडधान्यांना बुरशीनाशकाचे बीज प्रक्रिया प्रथम करावी.
जिवाणू संवर्धक लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके, इत्यादी. लावलेली असतील तर जिवाणू संवर्धक नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात (दीडपट) लावणे चांगले राहील.
कोणत्याही रासायनिक खताबरोबर जिवाणू संवर्धक मिसळून आहेत मिसळू नयेत.
प्रत्येक पिकाचे जिवाणू संवर्धक वेगवेगळे असते. ज्या पिकाचे जिवाणू संवर्धक असेल ते त्याच पिकास वापरावे.
बीज प्रक्रिया सावलीत करून व पेरणीपूर्वी असे बियाणे सावलीत वाळवून नंतर ताबडतोब पेरणी करावी.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |