सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी नवीन आशा!! Organic Farming 2025

Organic Farming 2025 गेली 4000 वर्षापासून आपले पूर्व शेती करतात त्यावेळी शेतकरी सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात वापरत असत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली जमिनीच्या उत्पादन क्षमतेत सेंद्रिय पदार्थांचे कार्य सुपीक जमीन बनवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा प्रत्यक्ष सहभाग असतो त्यामधून हळूहळू अन्नद्रव्य पिकांना मिळत असतात.

Organic Farming 2025

जीवाणूमुळे सेंद्रिय पदार्थ मोजण्याची हळूहळू क्रिया होते तेव्हा त्यातील अन्नद्रव्य पिकासाठी मुक्त होतात. सेंद्रिय पदार्थांचे खनिजीकरणामुळे हळूहळू कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस व इतर मूलद्रव्य मुक्त होतात. भारी जमिनीत चिकन कणांचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीची मशागत करणे अवघड असते.

एकात्मिक व्यवस्थापनातून सोयाबीनवरील किडींचा बंदोबस्त!! 

Organic Farming 2025 अशा जमिनीत पाणी हळूहळू मुरते त्यामुळे बरेचसे पाणी वाहून जाते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही भारी जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास ती जमीन भुसभुशीत होते व मशागत करणे सोपे जाते जमीन भुसभुशीत झाल्यावर पाणी मुरते पाणी वाहून जात नाही. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते हवा खेळती राहते. जमिनीच्या पृष्ठभागावर पोपडा तयार होत नसल्याने पेरलेल्या बियाणाची उगवण चांगली होते.

WhatsApp Group Join Now

Organic Farming 2025 वैशिष्ट्ये:

  • स्थानिक गोष्टींचा व पुनर्वापर करणे योग्य वस्तूंचा वापर. मातीचा आरोग्य स्थळ कायम ठेवण्यास मदत.
  • पिके व आजूबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्वांचा व सभोवतालच्या सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर.
  • निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी अनैसर्गिक वस्तू निसर्गाशी अनोळखी जीवांचा कीटकनाशके, रासायनिक पदार्थे इत्यादी उपयोग न करणे. उत्पादनात वैविध्य.
  • शेतीवर अवलंबून असणाऱ्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका.
  • अन्नसुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत.
  • आर्थिक उत्पन्नात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
  • एकमेकांशी निगडित पद्धती सेंद्रिय शेतीमध्ये पारंपारिक पद्धतींचा उपयोग केला जातो.
  • सेंद्रिय शेतीमध्ये पाळीव प्राण्यांचाही उपयोग केला जातो.

Organic Farming 2025 सेंद्रिय खतांचे प्रकार:

वनस्पती व प्राणी यांच्या अवशेषांपासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे शेणखत, कंपोस्ट, हिरवळीची खते, गांडूळ खते, माशांचे खत, हाडांचे खत, तेलबियांची पेंड इत्यादी.

शेणखत: गाई, म्हशीचे, शेण, मूत्र, गोठ्यातील पालापाचोळा, इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत असे म्हणतात. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेणाचा महत्त्वाचा उपयोग बायोगॅस मध्ये ऊर्जा निर्मितीसाठी होतो आणि शिल्लक राहिलेले शेण पातळ पिकाच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरता येते.

कंपोस्ट खत: शेतातील गवत पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, भुसा, उसाचे पाचट, कापसाचे धसकटे, इत्यादी सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन त्यातील कार्बन नत्राचे प्रमाण कमी होते व चांगला कुजलेला पदार्थ तयार होतो. त्याला कंपोस्ट म्हणतात यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते.

हिरवळीचे खते: लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून त्यांची दाट पेरणी करून पीक फुलोऱ्यावर येण्याच्या आधी ते नांगरण्याच्या साह्याने जमिनीत वाढतात त्यापासून जमिनीला नत्र मिळते जमिनीचा पोत सुधारतो व ती सुपीक बनते अशा खतांना हिरवळीचे खत म्हणतात.

WhatsApp Group Join Now

गांडूळ खत: या खातात गांडूळाची विष्टा नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ , गांडूळाची अंडीपुंज बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जिवाणूंचा समावेश असलेल्या खताला गांडूळ खत म्हणतात.

Organic Farming 2025 सेंद्रिय पदार्थामुळे होणारे फायदे:

नत्र पुरवठा : जमिनीत सेंद्रिय खत टाकल्यास नत्राचा पुरवठा होतो हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. शेणखताव्यतिरिक्त कोंबड्यापासून मिळणारे खत रेशीम उद्योगातील टाकाऊ पदार्थ नत्राचा अधिक पुरवठा करतात.

जमिनीची पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढते: जमिनीला 0.5% ते 1.0% सेंद्रिय पदार्थ दिल्यास पाणी धरून ठेवण्याची जमिनीची शक्ती दुप्पट होते. एक एकरात 8 टन शेणखत घातल्यास त्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ 0.5% ने वाढते जमिनीतील सेंद्रिय खतांचा वापर झाडांवर केला जातो. जमिनीची धूप होण्याच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थ नाहीसे होत जातात. वरचेवर सेंद्रिय पदार्थ जमिनीला पुरवल्यास जमिनीची उत्पादन क्षमता व पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

स्फुरद व पालाश: सेंद्रिय खतामुळे झाडांना विविध अवस्थेत पूर्व पराश उपलब्ध होऊन झाडांमध्ये मुळांद्वारे शोषले जातात.

जमिनीचा सामू: सेंद्रिय पदार्थाने जमिनीचा सामू बदलण्यास अडथळा येऊन जमीन आम्ल व क्षारयुक्त होत नाही.

कर्बाचा पुरवठा: कर्ब किंवा कार्बन सेंद्रिय पदार्थात असल्याने जमिनीतील असंख्य जिवाणूंना त्यांचा उपयोग त्यांच्या वाढीसाठी होतो. हे जिवाणू जमिनीतून अन्नद्रव्य झाडांना उपलब्ध करून देतात.

सेंद्रिय खतांचा परिणाम: सेंद्रिय खतांमुळे मातीवर सावली होऊन तापमान वाढत नाही सेंद्रिय पदार्थ माती घट्ट धरून ठेवतात. उष्ण तापमान जमिनीला थंड करणे व कमी तापमानात जमीन गरम ठेवणे सेंद्रिय खतामुळे शक्य आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीतील असंख्य जिवाणूंची वाढ होते. त्यात होणारे जिवाणूपण वाढीस लागू शकतात. अशावेळी ट्रायकोडर्मा नावाचे जिवाणू जमिनीत सोडण्यास रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश होऊ शकतो.

Organic Farming 2025 विविध टप्पे:

शेतीतील मातीचे संवर्धन व पोषण: रसायनांचा वापर बंद सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे मागे घेतलेल्या पिकांचे उरलेल्या पाने, बुंधे, फांद्या इत्यादींचा वापर पीक क्रमचक्र व पिकात विविधता आणणे, अधिक नांगरणी टाळणे, व शेतातील मातीस ओल्या किंवा हिरव्या गवताखाली झाकणे.

तापमान अनुकूलन: शेताच्या मातीचे तापमान योग्य राखणे व शेतीच्या बांधांवर वनस्पती लावणे जेणेकरून जास्त उष्णता निर्माण होणार नाही.

पावसाच्या पाण्याचा व सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग: पाझर तलाव, शेततळे तयार करणे, उत्तराच्या शेतीवर पायरी पद्धत, सारख्या उंचीचे बांध घालणे, सौरऊर्जेचा वापर जास्तीत जास्त हिरवळ तयार करणे.

नैसर्गिक साखळी निसर्गचक्राचे पालन: जैवविविधतेची निर्मिती कीटकनाशके न वापरणे शेतीचे क्षेत्र माती हवामान यास अनुकूल असे पीक घेणे, जैविक नत्राचे स्थिरीकरण (ग्लिरिसिरीया वृक्षांची लागवड).

प्राण्यांचे एकीकरण: पाळीव जनावरांच्या शेण व मूत्राचे वापर, पशुपालन उत्पादन, सौर ऊर्जा, बायोगॅस, इत्यादींचा वापर करणे.

कीटकांचा प्रतिबंध योग्य निवड:

रोगमुक्त बियाणांचा वापर करणे, प्रतिरोधी बियाणांचा वापर, जैवविविधतेने पालन.

अलटून पालटून वेगवेगळे पिके घेणे.

सापळा पिकांचा वापर करणे.

वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर:

Organic Farming 2025 अनेक वनस्पती या कीटकनाशक असतात यातील कडूनिंब सर्वात प्रभावी असते. कडुनिंबाच्या अर्काचा वापर हा कीटनियंत्रणात एक महत्त्वाचा घटक आहे. या अर्काने सुमारे 200 कीटकांचा उपद्रव नियंत्रणात येतो. दशपर्णी अर्क वापरणे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment