कांदा बिजोत्पादन!! Onion Seed Production 2025

Onion Seed Production 2025 कांदा हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक आहे. महाराष्ट्रात कांदा लागवडीखालील क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत नगर व नाशिक जिल्ह्याचा क्रमांक लागतो. भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारात कांदा अविभाज्य घटक आहे. इतर भाज्या हंगामाप्रमाणे उपलब्ध झाल्या तरी चालते परंतु कांदा हा दररोज कोणत्या ना कोणत्या तरी भाज्यांमध्ये आवश्यक्य असतो.

Onion Seed Production 2025

Onion Seed Production 2025 बीजउत्पादनाचा कांदा हे द्विवर्षीय पीक आहे. म्हणजे पहिल्या हंगामात बियांपासून कांद्यांचे पीक घ्यायचे आणि दुसऱ्या हंगामामध्ये कांदे लावून त्यापासून फुलोरा होतो व बीज धारणा होते. कांद्याचे बीजोत्पादन घेण्यासाठी कांद्याचे लागवड खरीप हंगामात करावी.

तूर पीक नियोजन!! 

बिजोत्पादन पद्धती: Onion Seed Production 2025

कांद्याचे बिजोत्पादन दोन पद्धतीने घेतात.

रोप कायम जागी लावून : या पद्धतीत कांद्याची रोपेवाटिकेत तयार करून घ्यावी नंतर शेतात त्यांची कायम लागवड वाफ्यातून रोपे लावून करावी. कांदा तयार झाल्यावर तो न काढता तसाच शेतात राहून द्यावा. कांद्यातून फुलोऱ्याचे दांडे येतात व त्याला बीज धारणा होते.

WhatsApp Group Join Now

कांदे लावून बिजोत्पादन : या पद्धतीत कांदा उत्पादनासाठी प्रथम वर्षी कांद्याचे पीक घेतले जाते मिळालेल्या कांद्याची पूर्ण लागवड करून बीज उत्पादन घ्यावे.

या पद्धतीचे दोन उपप्रकार

एकाच वर्षात कांदा व बीज उत्पादन : या पद्धतीत कांदा उत्पादनासाठी मे-जून मध्ये गादी वाफ्यावर जुलै-ऑगस्ट मध्ये केली जाते. साधारणता: कांदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निघतो. हा कांदा शेतात चांगला सुकवून घ्यायचा व 2 ते 3 आठवडे सावलीत पसरवून त्याला विश्रांती द्यायची. त्यातून सारख्या मध्यम आकाराचे कांदे निवडून बियांसाठी त्याची नोव्हेंबर महिन्यात लागवड करावी. त्यातून कोंब फुटून प्रथम पात वर येते आणि जानेवारी फेब्रुवारी मध्ये फुलांचे दांडे बाहेर पडतात व मे पर्यंत बी तयार होते.

द्विवर्षीय पद्धत : पहिल्या वर्षी कांदा उत्पादन व दुसऱ्या वर्षी बीज उत्पादन. या पद्धतीत पहिल्या वर्षी उन्हाळी हंगामात कांद्याचे पीक घ्यायचे त्यासाठी ऑक्टोबरमध्ये बी पेरावे व डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रोपांचा स्थानांतर करावे. मे अखेर मोड आलेला कांदा व जोड कांदा वेचुन काढून टाकावा. सारखे व मध्यम आकाराचे बारीक झालेले आकर्षक रंगाचे कांदे निवडून घ्यायचे व त्यांची बीज उत्पादनासाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात लागवड करावी. जानेवारी, फेब्रुवारी मध्ये फुलोरा आणि त्यापासून मे मध्ये बी तयार होते. अशा तऱ्हेने या पद्धतीत दीड दोन वर्षाचा काळ लागत असतो.

WhatsApp Group Join Now

बीजोत्पादनाची मुलतत्वे:

हवामान: Onion Seed Production 2025

कांद्याच्या पिकाला कांदा पोसायला सुरुवातीच्या काळात थंड हवामान लागते. या काळात 12 ते 14 अंश सेल्सिअस तापमान अत्यंत पोषक असते. या कांद्याच्या अवस्थेत तापमान जितके जास्त काळ राहील तितके जास्त फुलांचे दांडे आणि अधिक बीजउत्पादन होते. बिया पक्व होताना उष्ण आणि कोरडे हवामान पिकाला मानवते.

जमीन: Onion Seed Production 2025

बीज उत्पादनासाठी मध्यम ते भारी जमीन निवडावी. भारी कसदार जमिनीत पाणी धरून ठेवण्याची शक्ती जास्त असते. त्यामुळे पिकाला गारवा मिळतो व बियांचे भरघोस उत्पादन मिळते.

बियांची निवड:

मध्यम आकाराचे (50 ग्रॅम वजन) कांदे बेण्यासाठी वापरावेत. जोड व जाड मानेचे व रोगट कांदे वापरू नये. एक हेक्टर लागवडीसाठी मध्यम आकाराचे कांदे वापरल्यास 15 ते 20 क्विंटल बेणे लागते. मोठ्या आकाराचे कांदे वापरल्यास 25 ते 30 क्विंटल बेणे लागते.

लागवडीचा हंगाम:

खरीप हंगामाच्या जातीसाठी जुलै च्या दुसरा आठवड्यात ते ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात या कालावधीत लागवड करावी व रब्बी हंगामाच्या जातीसाठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर मध्ये लागवड करावी. कांद्याची लागवड 45 * 30 सेमी अंतरावर करावी.

लागवड: Onion Seed Production 2025

लागवडीपूर्वी कांदे बाविस्टीनच्या 0.1 % द्रावणातून बुडवून वरचा 1/3 भाग कापून लावावे. सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यामध्ये अशा कांद्याची लागवड करावी. लागवडीनंतर दीड दोन महिन्यांनी कांदा पिकाला भर द्यावा. कांदा वरंबाच्या मधोमध घ्यावा नाही तर बियांच्या वजनाने रोप कोलमडून बियांची नासाडी होऊ शकते.

खते व पाणी व्यवस्थापन:

कांदा लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 20-25 बैलगाड्या चांगले कुटलेले शेणखत मिसळून द्यावे. हेक्टरी 60:60:60 किलो नत्र, स्फुरद व पालाश लागवडीच्या आधी द्यावे. उरलेल्या 60 किलो नत्राची मात्रा कोंब उगवून झाल्यावर दीड ते दोन महिन्यांनी द्यावे. फुले येऊन बीज धारणा होताना तसेच ते पक्व होताना पाण्याचा नियमित पुरवठा अत्यंत आवश्यक्य आहे. मात्र रोपाच्या मुळाजवळ जास्त काळ पाणी साठून राहायला नको त्यामुळे कांदा खराब होऊन नुकसान होऊ शकते.

विलगीकरण अंतर:

Onion Seed Production 2025 कांद्याच्या पिकात परागीकरण होत असल्याने मूलभूत बीज उत्पादनासाठी 1000 मीटर तसेच प्रमाणित बीज उत्पादनासाठी 500 मीटर अंतर ठेवावे लागते. त्याशिवाय जातीची अनुवंशिक शुद्धता राहत नाही.

भेसळ व खराब रोपे काढणे:

बीज उत्पदनाच्या प्लॉट मधील रोगट दोष दिसल्याबरोबर उपटून नष्ट करावे व लगेच औषध फवारणी करावी. तसेच बारकाईने पाहणी करून वेगळ्या प्रकारचा कांदा किंवा रोग दिसून आल्यास त्याला काढून नष्ट करावे. शेतात मधमाश्या बसल्याने बीज धारणा वाढवून उत्पादन अधिक येते.

कीड व रोगांचे बंदोबस्त:

बीज उत्पादनाच्या वेळेस फुल किडी व फुले कुर्तडनारी अळी या कीटकाचा उपद्रव होतो. त्यासाठी सोलोन ही औषधे 1 लिटर पाण्यात 2 मिली या प्रमाणात मिसळून फवारावेत. करपा व मर या रोगासाठी 3 ग्रॅम डायथेन, एम-45 व 3 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइड प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बियांची काढणी व मळणी:

गोंडांमधील काळे बी 20-25 टक्के दिसायला सुरुवात झाल्यावर काढणी करावी. काढणी सकाळच्या वेळी केल्यास बी गळून पडण्याची भीती नसते. काढणीनंतर गोंडे चांगले वाळवून, मळणी करून, बी स्वच्छ करून सावलीत वाळवून ठेवावे. हलके फुटलेले बी चाळणीच्या साहाय्याने वेगळे करून सारख्या प्रतीचे उत्तम बी एकत्र करावे.

बी सुकवणे व साठवणे:

कांद्याचे बी साठविताना त्यात 6 % पेक्षा अधिक ओल्याव्याचा पाण्याचा अंश नसावा. 18-30 सेल्सियस तापमान व 30-40 % आद्रता असलेल्या ठिकाणी ठेवल्यास बियाणे 2 वर्षे चांगले राहू शकतात.

बियांचे उत्पादन:

Onion Seed Production 2025 सरासरी हेक्टरी 8 ते 10 क्विंटल बी मिळते.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा


Leave a Comment