कांदा पिकाचे व्यवस्थापन!! Onion Crop 2025

Onion Crop 2025 महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकवणारे राज्य आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप रांगडा रब्बी हंगामातही कांदा लागवडीस पोषक असते.

Onion Crop 2025

कांदा या पिकावर खालील प्रमुख समस्या आढळतात

शेंडा मरणे, धुरी लागणे अथवा पाती करपणे (काजळी लागणे)

कांदा तयार होण्यापूर्वी फुलावर येणे.

कांदा पिकात जोड कांद्याचे/डेंगळ्याचे प्रमाण वाढणे.

WhatsApp Group Join Now

पातीला पीळ पडणे अथवा मान लांबणे.

रब्बी हंगामातील या सहा पिकांसाठी विमा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु!!

रोग व किडीचे प्रमाण वाढणे उदा. फुलकिडे, मावा, करपा, इ.

वजन व चकाकी न मिळणे.

साठवणुकीच्या काळात कांद्याची होणारी सड/नासाडी.

कांदा लागवडीसाठी जमीन तयार करतेवेळी खालील खते मातीत मिसळून द्यावीत.

WhatsApp Group Join Now

शेणखत 10/12 गाड्या + सुपर फॉस्फेट 100 किलो + ह्युमिफोर-जी 10 किलो.

कांदा लागवडीसाठी निरोगी रोपे तयार करणे हि महत्वाची बाब आहे.

रोपे तयार करण्यागोदर सिंगल सुपर फॉस्फेट 10 किलो + ह्युमिफोर-जी 2.5 किलो + एस.आर.पी.-9: 2 किलो + मॅक्सवेल-एस 1 किलो + मॅक्सवेल-एस 1 किलो या प्रमाणात मिश्रण करून वाफे तयार करताना मातीमध्ये मिसळावे. बियाण्याची पेरणी करताना किंवा नर्सरीत बियाणे रुजविताना हंस 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पेरणी झाल्यानंतर लगेच झारीने वाफ्यावर शिडकावा करावा.

बियाण्यांची उगवण झाल्यानंतर रोग व किडींच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.

पाणी 10 ली. + सी.बी.झेड.- 50: 10 ग्रॅम + एस.आर.पी. 10 ग्रॅम. + सुदामा 5 मिली + स्टीकफोर 10 मिली.

रोपवाटिकेतून आणलेली रोपे लागण करण्याअदोगर खाली दिलेल्या द्रावणात बुडविल्यास रोपवाटिकेतून संक्रमित होणारे रोग अथवा किडी यांना अटकाव करता येतो.

पाणी 10 ली.+ ह्युमिफोर किंवा हंस 30 मिली + सुदामा 5 मिली. + सी.बी.झेड-50:10 ग्रॅम. + एस.आर.पी. 15 ग्रॅम.

रोपांची लागण झाल्यानंतर 10 -15 दिवसांनी 10:26:26 100 किलो + एस.आर.पी. -9: 9 किलो + मॅक्सवेल-एस 5 किलो + रुटशाईन 1 किलो किंवा ह्युमिफोर-जी 5 किलो + गंधक 5 किलो याप्रमाणात प्रति एकर डोस जमिनीतून घ्यावा.

लागणीनंतर 65-70 दिवसांनी एम.ओ.पी.-50 किलो + गंधक 4 किलो + एस.आर.पी.-9: 9 किलो याप्रमाणात प्रति एकर डोस जमिनीतून द्यावा.

कांद्यावरील बुरशीजन्य रोग व रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी तसेच कांद्याच्या पातीच्या विकासासाठी खालील फवारण्या घ्याव्यात.

पहिली फवारणी: Onion Crop 2025

रोपांची लागण केल्यानंतर 15-25 दिवसानंतर खालीलप्रमाणे घ्यावी.

पाणी 100 ली. + यु.एस. झायटॉप 250 मि.ली. + सुदामा 60 मि.ली. + एम-45: 150 ग्रॅम + स्टीकफोर 100 मि.ली.

दुसरी फवारणी: Onion Crop 2025

लागणीनंतर 40-45 दिवसांनी खालील प्रमाणे घ्यावी.

पाणी 100 ली + एस.आर.पी. 200 ग्रॅम + स्प्रेवेल / स्ट्रॉबेरी 100 ग्रॅम + हंस 200 मिली + सि.बी. झेड. -50: 100 ग्रॅम + स्टिकफोर 100 मिली.

तिसरी फवारणी: Onion Crop 2025

70-75 दिवसानंतर खालील प्रमाणे घ्यावी.

पाणी 100 ली + स्लोगन 40 ग्रॅम + स्टरफोर्स 200 मिली. + एस.आर.पी. 200 ग्रॅम + एम- 45 किंवा झेड- 78: 200 ग्रॅम.

कांदा पोसण्यासाठी तसेच कांद्यामधील बोल्टिंग किंवा नळा निघणे हि समस्या आटोक्यात आणण्यासाठी 80-85 दिवसांनी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.

पाणी 100 ली. + सीझर: 150 ते 200 मिली + समरूप 00:00:50- 300 ग्रॅम + आयकॉन 100 मिली + कॅल्स-क्विक 100 ग्रॅम + स्टीकफोर 100 मिली.

कांद्यातील बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी व कॅल्शियमच्या उपलब्धतेसाठी सु-मॅक 200 मिली प्रति 100 ली पाणी याप्रमाणात घेऊन 50-55 दिवसांदरम्यान फवारणी घ्यावी.

पात उतरण्यासाठी किंवा पात गळण्यासाठी व कांद्याचे वजन वाढण्यासाठी 100-110 दिवसानंतर खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.

पाणी 100 ली. + सीझर 100 मिली + समरूप 00:52:34-200 ग्रॅम + सी.बी.झेड-50 100 ग्रॅम.

कांद्याच्या साठवणुकीच्या काळात होणारी सड कमी करण्यासाठी म्हणजेच कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी एस.आर.पी. व एस.आर.पी-9 चा वापर फायदेशीर ठरतो.

एस.आर.पी. व एस.आर.पी- 9 चे फायदे

  1. रसशोषक किडींच्या हल्यापासून संरक्षण करते.
  2. बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांपासून संरक्षण करते.
  3. प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते.
  4. कांद्याची फुगवण वाढवून वजन वाढण्यास मदत करते.
  5. एन्ट्रीट्रेस म्हणून काम करते.
  6. खतांची उपलब्धता वाढवते.
  7. मर रोग व सूत्रकृमींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करते.
  8. पालाश व स्फुरदची उपलब्धता वाढविते. परिणामी उत्पादनात वाढ दिसते.

टिप: Onion Crop 2025

कांदा पिकातील महत्वाची व प्रखरतेने आढळणारी समस्या म्हणजे साठवणीच्या काळात होणारी सड. कांद्याचा साठवण काळ वाढविण्यासाठी कांद्यातील घन पदार्थाचे प्रमाणात महत्वपूर्ण कार्य करते. हे प्रमाण वाढवण्यासाठी स्फुरद व पालाशची उपलब्धता असणे महत्त्वाचे आहे. एस.आर.पी.-9 मुळे स्फुरद व पालाशचे मुळांद्वारे वहन वाढते. पर्यायाने घन पदार्थ वाढून साठवणूक कालावधी वाढवण्यास मदत होते.

माती परीक्षण अहवालानुसार सदरच्या खत नियोजनामध्ये बदल करू शकता तसेच सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी पेंडी व शेणखताचा वापर करावा.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment