हळद पिकाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन!! Nutrient Management for Turmeric Crop 2025

Nutrient Management for Turmeric Crop 2025 हळदीला आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्व असून त्यास आर्थिक, धार्मिक, औषधी, सामाजिक दृष्ट्या देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जगाच्या हळदीच्या उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन भारतात होते, त्यापैकी 15 ते 20 टक्के हळद निर्यात होते. या पिकाच्या वाढीसाठी भारतातील वातावरण अनुकूल असल्यामुळे कोणत्याही विभागात हळदीची लागवड होऊ शकते.

Nutrient Management for Turmeric Crop 2025

Nutrient Management for Turmeric Crop 2025 हळदीचे अधिक उत्पादन होण्यासाठी अन्नद्रव्यांचा समतोल वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रामुख्याने माती परीक्षण करून जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने फायद्याचे होईल व त्या पिकाची गरजही भागवता येईल. जर अन्नद्रव्यांचा असमतोल पुरवठा केल्यास अन्नद्रव्याची कमतरता लगेच दिसून येत नाही, परंतु अशा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. तरच हळद पीक उत्पादनामध्ये शाश्वती टिकून ठेवता येईल.

भुईमूग पिकाचे एकात्मिक रोग व्यवस्थापन!!

हवामान: Nutrient Management for Turmeric Crop 2025

उष्ण व दमट हवामानामध्ये हळदीचे उत्पादन चांगले मिळते हिवाळा या पिकास मानवत नाही सरासरी 28 अंश सेल्सियस तापमान या पिकास योग्य असून पिकाच्या वाढीच्या आवश्यकतेनुसार उगवणीसाठी 30 ते 35 अंश सेल्सियस, फुटवे फुटण्यासाठी 250 ते 300 अंश सेल्सियस, कंदाची वाढ होण्यासाठी 20 ते 25 अंश सेल्सियस, आणि कंद चांगले पोहोचण्यासाठी 18 ते 20 अंश सेल्सियस तापमानाची आवश्यकता असते.

WhatsApp Group Join Now

जमीन: Nutrient Management for Turmeric Crop 2025

हळद पिकाची लागवड फायदेशीर होण्यासाठी जमिनीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक, गुणधर्म जमिनीची जडण घडण जमिनीचा उतार या सर्व गोष्टींचा विचार करून हळदीची लागवड करावी. हळदीच्या पिकासाठी चांगला निचरा होणारी जमीन तसेच मध्यम खोली असणारी जमीन असावी. भारी काळ्या व क्षारयुक्त जमिनीमध्ये हळदीच्या पिकाचे उत्पादन घटते.

सुधारित जाती: Nutrient Management for Turmeric Crop 2025

फुले स्वरूपा ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केली असून सर्वसाधारणपणे वाळलेल्या हळदीचे उत्पादन 75 क्विंटल प्रती हेक्टरी मिळते. सेलम ही जात महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यामध्ये लागवड करण्यासाठी शिफारस केली असून वाळलेल्या हळदीचे उत्पादन 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्टरी मिळते. तसेच इतर जातीमध्ये कृष्णा राजापुरी इत्यादी जातींचा समावेश आहे.

सरी वरंबा, रुंद वरंबा, लागवड पद्धती आहे. हळदीची लागवड सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.

WhatsApp Group Join Now

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन: Nutrient Management for Turmeric Crop 2025

हळद पिकासाठी सेंद्रिय रासायनिक, जैविक खतांचा वापर करावा सेंद्रिय खते देताना पिकाला लागवडीच्या आधी 25 टन प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत वापरावे. त्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहून जलधरणा शक्ती वाढते. तसेच जमिनीचा योग्य निचरा होतो. हळद पिकासाठी रासायनिक खतांमध्ये 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश प्रति हेक्टरी ही शिफारसी खतमात्रा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे.

त्यापैकी संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावा. नत्र खतांचा अर्धा हप्ता हळद पिकाची पूर्ण उगवण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे 21 दिवसांनी द्यावी तसेच राहिलेले अर्ध नत्र भरणीच्या वेळेस देण्यात यावे त्याचवेळी हेक्टरी दीड ते दोन करंजी किंवा निंबोळी पेंड द्यावी. नत्राची खत मात्रा दोन हप्त्यांमध्ये विभागून दिल्यामुळे नत्राची कार्यक्षमता वाढवून पीक उत्पादन चांगले मिळते.

Nutrient Management for Turmeric Crop 2025 तसेच स्फुरद आणि पालाशय अन्नद्रव्यांच्या मुळे हळदीचे कंद चांगले पोहोचतात सर्वसाधारण महाराष्ट्रातील जमिनी मध्ये लोह आणि जस्त या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. जस्ताची कमतरता भरून काढण्यासाठी लागवडीच्या वेळी झिंक सल्फेट 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी जमिनीतून द्यावी.

हे खत चांगल्या कुजलेल्या शेण खतामध्ये मिसळून देण्यात यावे. तसेच लोह अनद्रव्याचे कमतरता भरून काढण्यासाठी हिराकस 20 किलो हेक्टरी शेणखता मधून विसरून द्यावी, ज्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनीतील हळद पिकासाठी 1 ते 2 टक्के हिराकस फवारणी द्वारे द्यावी. हळद पिकासाठी रासायनिक खते, सेंद्रिय खते, यांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु त्याबरोबरच जैविक खताचा वापर करणे ही आवश्यक आहे.

त्यासाठी स्फुरद विरघळणारे जिवाणू आणि ऍझोस्पिरिलिझम 5 किलो प्रत्येकी शेणखतामध्ये मिसळून लागवडीच्या वेळी द्यावे, येथील स्फुरद लवकरात लवकर उपलब्ध होतो अशा प्रकारे सेंद्रिय रासायनिक जैविक खतांचा वापर केल्यास हळद पिकाचे उत्पादन जास्तीत जास्त घेता येते.

बीजप्रक्रिया: Nutrient Management for Turmeric Crop 2025

क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 ग्रॅम + कार्बन-डिझीम 50 टक्के पाण्यात मिसळणारे 10 ग्रॅम घेऊन 10 लिटर पाण्यात मिसळावे. 10 लिटरचे द्रावण 100 ते 120 किलो बियाण्यास पुरेसे ठरते. बीजप्रक्रिया करताना बियाणे किमान 10 ते 15 मिनिटे द्रावणात बुडून राहतील याची काळजी घ्यावी.

हळद लागवडीनंतर 2.5 ते 3 महिन्याने भरणी करणे आवश्यक्य आहे. भरणी केल्यानंतर हलकेसे पाणी द्यावे. भरणे न केल्यास बाहेर आलेल्या हळकुंडाची वाढ होत नाही हळद लागवडीच्या सुरुवातीच्या काळात पाण्याची अत्यंत गरज असते पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

Nutrient Management for Turmeric Crop 2025 हळदीच्या आधीक उत्पादनासाठी त्या विभागातील हवामान, उत्तम निचरा असलेली जमीन, सुधारित जाती, मे महिन्यात लागवड, बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया, भरणी करणे, योग्य वेळी पाण्याचा समतोल वापर आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. तसेच, रोग व कीड व्यवस्थापन इत्यादी बाबींचा अवलंब केल्यास हळदीचे शाश्वत उत्पादन घेता येईल.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment