Nutrient Management 2025 ऊस हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुळे या पिकाला अन्नद्रव्यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होणे अत्यंत गरजेचे आहे. एक टन ऊस उत्पादनासाठी 1.25 ते 1.50 किलो नत्र 0.60 ते 0.75 किलो स्फुरद व 1.5 ते 2.0 येणाऱ्या खर्चाच्या 25 ते 30 टक्के खर्च हा खतांच्या वापरावर केला जातो.

म्हणूनच रासायनिक खतांचा संतुलित वापर आजच्या आधुनिक शेतीसाठी अपरिहार्य आहे. प्रति हेक्टर उसाचे उत्पादन वाढायचे असेल तर सध्याच्या खते देण्याच्या पद्धती व प्रमाण बदल ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता आणि पीक उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मातीचे प्रशिक्षण परीक्षण करून व उत्पादनाचे व्यवहार्य लक्ष डोळ्यांसमोर ठेवून शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय खतांचा ऊस पिकाच्या गरजेनुसार रासायनिक खतांचा व जिवाणू खतांचा वापर करणे अनिवार्य आहे.
सोयाबीन पिकांवर संकट ‘ही’ फवारणी ठरत आहे रामबाण उपाय, वाचा सविस्तर;
जमिनीची सुपीकता आणि पीक उत्पादन क्षमता ही तिच्या भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. भौतिक गुणधर्मामुळे जमिनीची फुले निचरा क्षमता आकार घनता आणि हवा व पाणी यांचे समतोल प्रमाणे यांची कल्पना येते. तर रासायनिक गुणधर्मामुळे जमिनीचा सामुक्षारता, अन्यद्रव्य उपलब्धतेचे प्रमाण विशिष्ट अन्नद्रव्यातील स्थिरीकरण निरनिराळ्या, अंतर प्रक्रिया यांचे ज्ञान होते.

जैविक गुणधर्मामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवांची संख्या कार्यक्षमता व त्यांच्या कार्यक्षमता देतील तेथील परकामुळे अन्नद्रव्य उपलब्ध येत होणारे फेरबदल हवेतील नत्राचे स्थिरीकरण यांची उपयुक्त माहिती मिळते.
Nutrient Management 2025 या सर्व माहितीमुळे जमिनीच्या सुपीकता पातळीचा दर्जा कळतो. त्यानुसार जमिनीच्या नियोजनाचे स्वरूप ठरवता येते. पीक नियोजनाचा आराखडा तयार करता येतो. त्यामुळे जमिनीचे पीक उत्पादन क्षमता वाढवणे सोपे होते. यासाठी जमिनीची सुपीकता पातळी आणि पीक उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय रासायनिक व जैविक असा एकात्मिक वापर होणे आवश्यक आहे.
Nutrient Management 2025 अ) सेंद्रिय खतांचा वापर!
उसासाठी सेंद्रिय खत वापरणे हे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारण सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीच्या जैविक आणि भौतिक सुपीकतेत वाढ होते. तसेच सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या खेळती हवा आणि पाणी धारण करण्याची क्षमता वाढते.
म्हणून रासायनिक खतांबरोबर खाली नमूद केलेल्या सेंद्रिय खतांपैकी जे उपलब्ध असेल ते आवश्यक ते वापरावे.तसेच सेंद्रिय खत लागणे पूर्वी किंवा लागणीच्या वेळेसच वापरावे. कारण सेंद्रिय खतांद्वारे होणारे अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सावकाश होत असते.
2. शेणखत
Nutrient Management 2025 शेणखतात सर्वसाधारणपणे 0.80 टक्के नत्र, 0.65 टक्के स्फ़ुरद आणि 0.88 टक्के पालाश असते. उसासाठी हेक्टरी 30 टन (60 बैलगाड्या), पूर्व हंगामी उसासाठी हेक्टरी 25 टन (50 बैलगाड्या) आणि सुरू उसासाठी हेक्टरी 20 टन (40 बैलगाड्या) शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे.
यापैकी शेणखताचे अर्धी मात्र ऊस लागणीपूर्वी दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात पसरवून द्यावी व उरलेली अर्धी मात्रा सरीवरंबे तयार केल्यानंतर सरीमध्ये द्यावी. सर्वसाधारणपणे शेतकरी जेवढे शेणखत उपलब्ध होईल तेवढेच वापरतात, परंतु शेणखताला पर्यायी खत व्यवस्था त्यांच्याकडून केली जात नाही. शेणखत उपलब्ध नसल्यास उसासाठी इतर सेंद्रिय स्त्रोतांचाही खालील प्रमाणे वापर करणे फायद्याचे दिसून आले आहे.
3. पाचटाचे कंपोस्ट
ऊस तुटून गेल्यानंतर शिल्लक राहिलेले उसाचे पाचट शेतातच कुजवल्यास त्याचा ऊस पिकास व जमिनीत चांगला फायदा होतो. पाचटामध्ये 0.42 ते 0.50 टक्के नत्र, 0.17 ते 0.20 टक्के स्फुरद आणि 0. 90 ते 1.00 टक्के पालाश असते. आणि 32 ते 40 टक्के असते. एक हेक्टर क्षेत्रामधून 7.5 ते 10 टन पाचक मिळते आणि त्यापासून 31.5 ते 50 किलो नत्र, 12.75 ते 30 किलो स्फुरद, पालाश आणि 3 ते 4 हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत घातले जाते.
Nutrient Management 2025 यासाठी खोडवा ठेवताना ऊस तोडणी नंतर राहिलेले पाचट सर्व ओळींमध्ये पसरून घ्यावे. उसाच्या बुडख्यावरील पाचट बाजूला करावे. शेतात पसरलेल्या पाचटावर प्रतिहेक्टरी 80 क्युरिया व 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट एकत्र मिसळून समप्रमाणात पसरून टाकावे.
त्याचबरोबर 10 किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन स्वतंत्ररित्या समप्रमाणात पाच टावर पसरून टाकावे. जमिनीत ओल असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबावे. पाचटाचा मातीशी संबंध येऊन ती हळूहळू पुजण्याची क्रिया सुरू होते व त्यापासून चांगले खत तयार होते.
4. प्रेसमडकेक
साखर कारखान्यातून उत्पादित होणाऱ्या दुय्यम उपपदार्थांपैकी प्रेसमडकेक किंवा घट्ट काळसर मळीचा सेंद्रिय खत म्हणून वापर करता येतो. प्रेसमडकेक मध्ये 1.5 टक्के नत्र, 2.25 टक्के सफुरद आणि 1.0 टक्के पालाश असते.लागणीच्या उसासाठी प्रती हेक्टरी 6 टन वाळलेली प्रेसमड वापरल्यास स्फुरदयुक्त खताची 33 टक्के मात्रा कमी करावी तर प्रतिहेक्टरी 9 टन वाळलेले प्रेसमड वापरल्यास स्फुरदयुक्त खतांची 66% मात्रा कमी करावी.
सध्या काही साखर कारखाना प्रक्षेत्रावर प्रेसमडकेक आणि स्पेंटवॉश यांचे एकत्रित कंपोस्ट केले जाते. याला प्रेसमड कंपोस्ट असे म्हणतात. प्रेसमडकेक किंवा प्रेसमड कंपोस्ट हे नांगरट झाल्यानंतर सरी सोडण्यापूर्वी जमिनीमध्ये टाकावे म्हणजे ते मातीत चांगले मिसळले जाते.
5. गांडूळ खत
गांडूळ खतात 0.75 ते 2.0 टक्के नत्र, 0.82 टक्के स्फुरद आणि 0.65 ते 1.25 टक्के पालाश असते. ऊस पिकासाठी प्रति हेक्टरी 5 गांडूळ खत वापरावे. हे गांडूळ खत लागणीपूर्वी सरीमध्ये टाकून मातीने झाकावे.
6. हिरवळीची खते
हिरवळीची खते म्हणजे वनस्पतीचे हिरवे अवशेष जमिनीत वाढवून किंवा बाहेरून आणून जमिनीत काढणे किंवा वनस्पतीच्या हिरव्या अवशेषापासून तयार झालेले खत होत. शेण खताची उपलब्धता कमी असल्यास पूरक खत म्हणून कमीत कमी एक वेळा हिरवळीचे पीक घ्यावे. शक्य झाल्यास ऊसापूर्वी व उसात आंतरपीक असे एका हंगामात सलग दोन वेळा हिरवळीचे पीक घेतल्यास शेणखताला पर्यायी खत होऊ शकते.
Nutrient Management 2025 शेतात सलग हिरवळीचे पीक घेणे…..
शेतात सलग हिरवळीचे पिक घेण्याकरिता ती निवडताना जलद वाढणारी भरपूर सेंद्रिय पदार्थ तयार करणारी, मुळांवर नत्र स्थिरीकरणाच्या गाठी असणारी कोणतीही द्विदल वर्गीय पिके हिरवळीची पिके म्हणून घेता येतील.
यामध्ये प्रामुख्याने ताग, धेंचा, शेवरी, चवळी, उडीद, इत्यादी द्वितीय पिकांचा समावेश होतो. मात्र, एकदल पिके हिरवळीची पिके म्हणून कधीही वापरू नये.
ऊस पिकात आंतरपीक म्हणून हिरवळीचे पीक घेणे –
या पद्धतीस ध्येय या पद्धतीमध्ये ऊस लावल्यानंतर वापसा आल्यावर, ताग किंवा त्यांचा या हिरवळीच्या पिकाच्या, चार फुटाच्या सलग पद्धतीत दोन ओळी अडीच पाच फुटाच्या पट्टा पद्धतीत तीन ओळी घ्याव्यात, या हिरवळीच्या आंतर पिकांचा उसाच्या फुटव्यावर विपरीत परिणाम नाही याची काळजी घ्यावी.
40 ते 45 दिवसांनी हिरवळीच्या पिकांची कापणी करून ते सरीच्या बगलेच जरी घेऊन गाडावे. तागापासून हेक्टरी 90 किलो, धेंचा पासून हेक्टरी 84 किलो तर चवळीपासून हेक्टरी 74 किलो नत्र जमिनीला मिळते.
ब) रासायनिक खतांचा वापर!
ऊस हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक असल्यामुळे त्याची अन्नद्रव्यांची गरज ही फार मोठी आहे. त्यामुळे ऊस पिकाला सेंद्रिय खतांबरोबरच रासायनिक खत मोठ्या प्रमाणावर द्यावे लागते. लागणीच्या उसाला रासायनिक खतांची मात्रा 4 हप्त्यांमध्ये द्यावी. पहिला हप्ता ऊस लागणीच्या वेळेस द्यावा, आणि चांगल्या मुळ्या फुटण्यासाठी स्फ़ुरद पालाशची गरज असते. म्हणून यावेळी शिफारसीत 10 टक्के नत्र, 50 टक्के स्फुरद आणि 50 टक्के पालाश द्यावे.
ऊस पिक फुटवा अवस्थेत असताना (लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी) नत्राची गरज जास्त असते. अशावेळी शिफासरीच्या 40% नत्र द्यावे, खतांची तिसरी मात्र कांडी सुटताना (लागणेनंतर 12 ते 16 आठवड्यांनी) द्यावी. यावेळी नत्राची गरज कमी असते म्हणून दहा टक्के नत्र द्यावे उसासाठी खतांची शेवटची मात्रा मोठ्या बंद बांधणीच्या वेळी घ्यावी.
यावेळी उसाची जोरदारपणे वाढ सुरू होते. म्हणून यावेळी 40 टक्के नत्र, 50% स्फुरद आणि 50 टक्के पालाश खते द्यावीत. आणि नंतर बांधणी करावी. अशा रीतीने रासायनिक खतांची सर्व मात्रा मोठ्या बांधणीपर्यंत पूर्ण संपवावी.
Nutrient Management 2025 ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचे व्यवस्थापन!
सुरू उसासाठी विद्राव्य खतांची शिफारस मध्यम खोल काळ्या जमिनीत सुरू उसाचे अधिक उत्पादन पाण्याचा व खताचा कार्यक्षम वापर आणि आर्थिक फायद्यासाठी 80 टक्के विद्राव्य खते पुढील तक्त्यानुसार दर आठवड्यात एक याप्रमाणे 26 हप्त्यात ठिबक सिंचनातून देण्याची शिफारस देण्यात येत आहे.
आठवडे | नत्र (की./ हे) | स्फुरद (की./ हे) | पालाश (की./ हे) |
1 ते 4 | 30 | 9 | 9 |
5 ते 9 | 70 | 32 | 14 |
10 ते 12 | 100 | 51 | 32 |
21 ते 26 | — | — | 37 |
एकूण | 200 | 92 | 92 |
Nutrient Management 2025 नत्र सिंचनातून नत्रयुक्त खते….
ठिबक सिंचनातून देण्यासाठी युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त खत आहे. मागणी पासून मोठ्या बांधणी पर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान वीस हप्त्यात किंवा दर पंधरा दिवसांच्या अंतराने समान 10 हप्त्यात नत्र खताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते.
पारंपारिक स्फ़ुरदयुक्त व पालाशयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यात ऊस लागणीचे वेळी व मोठ्या बांधणीचे वेळी जमिनीतून द्यावी.
Nutrient Management 2025 खोडवा ऊस पिकासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा किलो प्रती हेक्टर
खत देण्याची वेळ | नत्र (युरिया) | स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट) | पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश) |
15 दिवसांच्या आत | 125 (275) | 57 (357) | 57 (95) |
135 दिवसांनी | 125 (275) | 58 (363) | 58 (97) |
एकूण | 250 (550) | 115 (720) | 115 (192) |
Nutrient Management 2025 खोडव्याला पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वापसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा सरीच्या एका बाजूला बुडख्यापासून 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर दहा ते पंधरा सेंटीमीटर खोल छिद्र घेऊन पहारीच्या साह्याने द्यावी, आणि दुसरी खत मात्र विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी.
पहारीच्या साधनाने खते देण्याचे फायदे!
- खतमुळांच्या सानिध्यात दिले जाते त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते.
- दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने हवेद्वारे फारच कमी प्रमाणात ह्रास होतो.
- खत खोलवर व झाकून दिल्यामुळे वाहून जात नाही. तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो व जास्तीत जास्त खत मुख्य पिकाच उपयोगी पडते.
- रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन खतांची कार्यक्षमता वाढते व जोमदार वाढ होऊन उसाचे भरघोस उत्पादन मिळते.
- सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते. त्यामुळे सर्वत्र सारख्या उंचीचे व जाडीचे पीक असल्यामुळे ऊस उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होते.
Nutrient Management 2025 माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन….
माती परीक्षणानुसार खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता पातळी टिकवून पिकास आवश्यक अन्नद्रव्याचा पुरवठा आवश्यकता प्रमाणात केला जातो.
त्याचबरोबर काही प्रमाणात खर्चामध्ये बचत करता येते. माती परीक्षणानुसार ऊस पिकासाठी रासायनिक खतांचा वापर करताना दोन पद्धतीने खत व्यवस्थापन करता येते.
खतमात्रा देण्याची वेळ | नत्र (युरिया) | स्फुरद (सिं.सु. फॉ) | पालाश (म्यु.ऑ. पो) | नत्र (युरिया) | स्फुरद (सिं.सु. फॉ) | पालाश (म्यु.ऑ. पो) | नत्र (युरिया) | स्फुरद (सिं.सु. फॉ) | पालाश (म्यु.ऑ. पो) |
लागणीच्या वेळी | 40 (87) | — | — | 85 (74) | 85 (531) | 85 (141) | 25 (54) | — | — |
लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनी | 160 (347) | 85 (531) | — | 136 (295) | — | — | 100 (217) | 60 (375) | 60 (100) |
लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनी | 40 (87) | — | — | 34 (74) | — | — | 25 (54) | — | — |
मोठ्या बांधणीच्या वेळी | 160 (347) | — | 85 (141) | 136 (295) | 85 (531) | 85 (141) | 100 (217) | 55 (344) | 55 (91) |
एकूण | 400 (868) | 85 (531) | 170 (228) | 340 (738) | 170 (1062) | 170 (282) | 250 (542) | 115 (720) | 115 (191) |
एकूण को. 86032 साठी | 500 (1085) | 500 (1250) | 200 (232) | 400 (868) | 170 (1062) | 170 (282) | 300 (651) | 140 (875) | 140 (232) |
कंसातील आकडे युरिया, सी.सु.फॉ म्युरेट ऑफ पोटॅश या सरळ खतांची मात्रा दर्शवतात.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |