Nuksan Bharpai 2025 सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीचे दोन लाख 39 हजार शेतकऱ्यांना 279 कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे. बार्शी तालुक्यात तब्बल 90 हजार शेतकऱ्यांना 114 कोटी रुपये मिळाले आहेत.

मागील खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस सोलापूर जिल्ह्यात पडला होता. खरीप पिकांना बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिकांना बसला होता. अतिवृष्टी व संततधार पावसाने अनेक दिवस पाणी पिकात थांबवणार राहिले. त्याच्या फटाक्याने खरीप पिके उध्वस्त झाली.
शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढण्यासाठी या योजनेतून 25 हजार कोटी रुपयांची तरतूद वाचा सविस्तर;
Nuksan Bharpai 2025 अतिवृष्टी संततधार पावसाने नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत विमा कंपनीला इंटीमेशन देण्यापेक्षा होते. ज्यांनी 72 तासांच्या आत कंपनीला कळविणे त्या शेतकऱ्यांना घसघशीत नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळाली आहे.

तशी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाले असली तरी खरीप पिकांचे अधिक क्षेत्र असलेल्या बार्शी, उत्तर सोलापूर, अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्याला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.
Nuksan Bharpai 2025 प्रशासनाच्या पाठपुराव्याला यश
- सोलापूर जिल्ह्यात मागील खरीप हंगामात सर्वाधिक दोन लाख 39 हजार शेतकऱ्यांना 279 कोटी नुकसान भरपाई प्रथमच मिळाली आहे.
- या अगोदर एवढी रक्कम मिळाली नसल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा अधीकक्ष कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी पीक नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना रक्कम मिळवण्यासाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा केला.
| तालुका | शेतकरी | रक्कम |
| अक्कलकोट | 38,697 | 43.15 |
| बार्शी | 89,900 | 114.12 |
| करमाळा | 12,869 | 8.71 |
| माढा | 22,800 | 14.04 |
| माळशिरस | 152 | 1.41 |
| मंगळवेढा | 27,093 | 14.28 |
| मोहोळ | 8,856 | 22.09 |
| पंढरपूर | 9,51 | 2.29 |
| सांगोला | 3,214 | 5.48 |
| उत्तर सोलापूर | 12,519 | 34.81 |
| दक्षिण सोलापूर | 20,444 | 18.37 |
| एकूण | 2,38,903 | 278.72 |
Nuksan Bharpai 2025 चार प्रकारांची नुकसान भरपाई
- नैसर्गिक आपत्ती विमा क्षेत्राच्या पंचवीस टक्के इंटीमेशन आल्यास ही नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. बार्शी तालुक्यातील आठ मंडळातील 33 हजार 204 शेतकऱ्यांना 20 कोटी 16 लाख रुपये मिळाले आहेत.
- स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील एक लाख 32 हजार शेतकऱ्यांना 176 कोटी 65 लाख रुपये, काढणी पश्चाचाच 51 हजार 226 शेतकऱ्यांची 80 कोटी 21 लाख रुपये, तर उत्पन्नावर आधारित करमाळा तालुक्यातील 1177 शेतकऱ्यांना 21 लाख 42 हजार रुपये, मंगळवेढा तालुक्यातील 11 हजार 969 शेतकऱ्यांना 84 लाख 88 हजार रुपये, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील 8 हजार 546 शेतकऱ्यांना 63 लाख 88 हजार रुपये मिळाले आहेत.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |