Nuksan Bharpai 2025 खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेती पिकांचे नुकसान झाले होते.

या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा लाख 43 हजार 542 शेतकऱ्यांना 733 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.यात अकोला,बुलढाणा, वर्धा, नागपूर, जळगाव, नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहे.
याबाबतचा महत्त्वाचा शासन निर्णय सरकारकडून निर्गमित करण्यात आला आहे. जुलै ते ऑक्टोबर 2024 मुख्यतः सप्टेंबर, ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पुर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता 733 कोटी 45 लाख 84 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे.
Nuksan Bharpai 2025 ठाणे आणि पालघरसाठी…
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
या ठाणे जिल्ह्यातील 109 शेतकऱ्यांना 3 लाख 2 हजार रुपये, पालघर जिल्ह्यातील 2730 शेतकऱ्यांना 9 कोटी 67 लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील 113 शेतकऱ्यांसाठी तीन लाख 25 हजार रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 61 बाधित शेतकऱ्यांना 01 लाख 21 हजार रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 196 शेतकऱ्यांना 5 लाख 2 हजार रुपये वितरित करण्यात येईल.
अमरावती विभागासाठी…
त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात 155 बाधित शेतकऱ्यांना 89 लाख 17 हजार रुपये, अकोला जिल्ह्यातील 14706 शेतकऱ्यांना 22 कोटी 73 लाख, यवतमाळ जिल्ह्यातील 925 शेतकऱ्यांना 48 लाख, बुलढाणा जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार 296 शेतकऱ्यांना 300 कोटी 35 लाख वाशिम जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना 47 हजार रुपये करण्यात आला आहे.
मार्चमध्ये ‘या’ 3 भाज्यांची लागवड करा, कमी खर्चात चांगले उत्पादन वाचा सविस्तर…
पुणे आणि नाशिक विभागासाठी…
पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील 932 शेतकऱ्यांसाठी 68 लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील 8199 शेतकऱ्यांना आठ कोटी पाच लाख, पुणे जिल्ह्यातील 791 शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये, तसेच नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यात 16 शेतकऱ्यांना एक लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील 1541 शेतकऱ्यांना 93 लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 316 शेतकऱ्यांना 36 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातील 1540 शेतकऱ्यांना 14 कोटी रुपये, तर अहमदनगर जिल्ह्यातील 1224 शेतकऱ्यांसाठी 70 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे आहेत.
Nuksan Bharpai 2025 नागपूर विभागासाठी…
नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात 12,970 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 76 लाख रुपये, नागपूर जिल्ह्यातील 123 शेतकऱ्यांसाठी 17 लाख रुपये, नागपूर जिल्ह्यातील तीन हजार 933 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 84 लाख रुपये, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील 2685 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 39 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. असे एकूण राज्यातील सहा लाख 43 हजार 542 बाधित शेतकऱ्यांना 733 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजूर देण्यात आले.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |