Navin Pik Vima Yojana 2025 अंतर्गत पुढील कारणामुळे म्हणजे शेतकऱ्यांस टाळता न येण्या जोग्या कारणामुळे झालेल्या नुकसानिस विमा संरक्षण मिळेल. जाणून घ्या सविस्तर…

प्रतिकूल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/उगवण न होणे
Navin Pik Vima Yojana 2025 हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी/लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील.
शेतकऱ्यांसाठी परराज्यात शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान योजना; मोठा दिलासा..
हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान
Navin Pik Vima Yojana 2025 हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या 15 दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील.

पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट
दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपिट आणि चक्रीवादळ यांसारख्या टाळता न जोखीमिनमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल.
Navin Pik Vima Yojana 2025 स्थानिक नैसर्गिक आपत्ती:
या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल.
Navin Pik Vima Yojana 2025 काढणी पश्चात नुकसान
ज्या पिकांची काळजीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते. अशा कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेला अधिसूचित पिकाचे काढणी नंतर दोन आठवड्यांच्या आत (14दिवस ) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.
सर्वसाधारण अपवाद
Navin Pik Vima Yojana 2025 वरील सर्व विमा संरक्षणाच्या भावी युद्ध आणि अनु युद्धाचे दुष्परिणाम हेतूपुरस्सर केलेल्या नुकसानीस व इतर टाळता येण्याजोग्या धोक्यातस लागू असणार नाही त्यामुळे अशा परिस्थितीत विमा संरक्षण मिळणार नाही.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |