फळांची आवक घटली, आंब्याने ही निरोप घेतला, ‘या’ फळांना चांगला दर मिळतोय? Nashik Fruit Market 2025

Nashik Fruit Market 2025 नाशिक: अवकाळी पावसाचा फटका फळ बाजाराला मोठ्या प्रमाणात बसला असून, जूनच्या उत्तरार्धात सर्वाधिक झळ बसत असल्याचे चित्र आहे. परिणाम म्हणून डाळिंबाचे भाव 250 ते 300 रुपये प्रति किलो झाले आहेत, तर आंब्याचे यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारातून निरोप घेतला आहे.

Nashik Fruit Market 2025

सर्वांचा आवडता केसर आंबा यावर्षी दोन आठवडे आधीच बाजारातून दिसेनासा झाला. ऋतुमानाप्रमाणे सर्वात शेवटी येणारा लंगडा आणि दहशहरी आंबा देखील आपले बिर्हाड मागील वर्षाच्या तुलनेने लवकरच गुंडाळणार आहे. एकूणच सरासरी 60 टक्के आवक फळांची घटली आहे. डाळिंबाचा दर 3000 ते 3500 रुपये प्रति क्रेट शेतकऱ्यांना मिळत आहे.

तण नियंत्रणाची योग्य वेळ; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला वाचा सविस्तर,

Nashik Fruit Market 2025 नाशिक बाजार समितीत नाशिक, संगमनेर, सिन्नर, दिंडोरी, निफाड, येवला, मालेगाव, देवळा, कळवण या ठिकाणाहून डाळिंब विक्रीला येतात. परंतु, अवकाळी पावसामुळे पुरवठा कमी झाला आहे. डाळिंबावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. सामान्यांना परवडणारे चिकू पेरू पपई फळ सध्या 20% देखील बाजारात नाही उन्हाळा संपला असल्याने मागणी कमी झाली असली तरी टरबूज आणि खरबुजाचे भाव किलोमागे 20 रुपयांनी वाढले आहेत.

WhatsApp Group Join Now

Nashik Fruit Market 2025 विदेशी आणि कश्मीरी फळांना ‘अच्छे दिन’ कुठल्या

बाजारात चिकू, पेरूचे प्रमाण नगण्य आहे. डाळिंब ही 60 टक्के कमी झाले आहे. त्याच्यामुळे विदेशी आणि कश्मीरी फळांवरच बाजार सध्या अवलंबून आहे. त्यातही कश्मीरचे सफरचंद अजून बाजारात आले नसून न्यूझीलंड, चीनचे सफरचंद भाव खात आहे.

कश्मीरी आलू बुखार, लिचीचा पुरवठा कमी झाला आहे. संत्रा आणि हिरवे सफरचंद न्युझीलँड मधून नाशिकच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकले जात आहे.

तोतापुरी भाव खातो

WhatsApp Group Join Now

Nashik Fruit Market 2025 सिझनमधला शेवटी येणारा लंगडा आंबा130 ते 150 रुपये तर दहेरी आंबाही याच भावात आहे. चालू आठवड्यात या दोघांचे दर 30 ते 40 रुपयांनी वाढले, तर चिरून खाण्यासाठी लागणारा तोतापुरी आंबा ही यंदा महाग म्हणजे 80 ते 100 रुपये आहे. तोतापुरी आंबा आषाढी एकादशीच्या साधारण दोन आठवडे लवकर बाजारात येतो.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment