नारळाच्या विविध जाती व नारळ लागवडी बद्दल संपूर्ण माहिती; Naral lagwad 2025

Naral lagwad 2025 नारळ लागवडीसाठी एक वर्ष वयाची रोपे निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्ष वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे, यांसारख्या समस्या दिसतात. पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 3.25 ते 3.5 मीटर असते. म्हणून दोन माडात 7.5 मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत.

 Naral lagwad 2025

माडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळीत आणि दोन रोपात 7.5 मीटर अंतर ठेवावे. पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास 6.75 किंवा 7 मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी 6 मीटर अंतर चालू शकते.

WhatsApp Group Join Now

नारळाच्या विविध जातींची माहिती

Naral lagwad 2025 नारळांच्या जाती खालील प्रमाणे दिल्या आहेत.

उंच जाती
  1. वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) – पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात.
  2. लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) – पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात.
  3. प्रताप – नारळाचा आकार मध्यम, गोल असून, झाड सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात.
  4. फिलिपिन्स ऑर्डिनरी – नारळ आकाराने फारच मोठे असतात. नारळाचे उत्पादन सरासरी 105 नारळ आहे.
ठेंगू जाती

रंगावरून ऑरेंज डार्फ, ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वात उत्तम आहे.

संकरित जाती
  1. टीडी (केरासंकरा) – या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते.
  2. टीडी (चंद्रसंकरा) – फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रतिवर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे.

नारळ लागवडीची पूर्वतयारी Naral lagwad 2025

कोकणाबरोबर महाराष्ट्राच्या इतर भागातही नारळ लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. नारळ हे बागायती पीक असल्याने त्याला पावसाळ्यानंतर मे महिन्यापर्यंत कायमस्वरूपी आयुष्यभर पाण्याची गरज असते. त्यामुळे पाण्याची सोय असल्यास नारळाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते.

Naral lagwad 2025 त्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार मशागत करावी लागते. जसे रेताड जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता शेणखताचा वापर करून वठ्ठवायला हवी. तर काळ्या चिकट जमिनीत पाण्याचा निचरा होण्यासाठी वाळूचा तसेच सेंद्रीय खतांचा वापर करावयास हवा. भाताच्या खाचरात लागवड करावयाची झाल्यास पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. त्यासाठी चर खणून पाणी बाहेर काढणे महत्वाचे असते. त्याचप्रमाणे शेताच्या बांधावर देखील नारळाची लागवड करता येते. त्यासाठी बांधाची रुंदी आवश्यक तेवढ़ी ठेवणे गरजेचे आहे.

कोकणात डोंगर उतारावरील वर्कस जमिनीत या ठिकाणी पाण्याची सोय आहे. तेथे नारळाची यशस्वी लागवड होऊ शकते. सुधारलेल्या खार जमिनीतही नारळाची लागवड करता येते. नदीकाठ्या जमिनीत पावसाळ्यात पाणी काही काळ आत शिरते. अशा जर्मिनीत पावसाचा जोर ओसरल्यानंतर म्हणजेच ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये लागवड करावी. रत्नागिरीत कातळावर घरे बांधल्यामुळे घराच्या आवारात काही नारळ रोपांची लागवड केली जात आहे. कातळात खडुा किती खोल असावा, हे महत्वाचे नसून किती उंचीचा आणि रुंदीचा मातीचा भराव घालणे शक्य आहे. हे महत्वाचे आहे. त्यासाठी कमीतकमी 1 मीटर लंच आणि माडाच्या खोडाभोवती दौड मीटर अंतरावर मातीची भर असणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now

दोन माडातील अंतर

नारळ लागवड करताना सर्वात महत्त्वाचा मुद्या विचारात घेणे गरजेचे आहे. तो म्हणजे दोन माडातील अंतर. दोन माडात योग्य अंतर असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नारळ लागवडीचे महत्वाचे सूत्र म्हणजे दोन झाडातील अंतर होय. अंतराचे बाबतीत तडजोड करू नये. कोकणात एक म्हण आहे ‘लागे तो न लागे न लागे तो लागे’ आणि ही नारळ पिकासाठीच योग्य आहे. योग्य अंतर ठेवले नाही तर नारळाची जात चांगली असूनही उशिरा उत्पादन मिळणे, कमी उत्पादन मिळणे या समस्यांना तोंड द्यावे लागते.Naral lagwad 2025

खडुा खोदणे

पिकांच्या मुळांना वाढीसाठी अनुकूल परिस्थिती मिळावी म्हणून पेरणीपूर्वी आपण जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करतो. तशाच पध्दतीने फळझाडे लागवड करताना खडुा खोदणे जरुरीचे असते. खड्ड्याचा आकार हा फळझाड आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. खड्डा खोदल्याने त्यातील दगड बाहेर काढले जातात. त्याचप्रमाणे स्पर्धा करू शकतील अशा झाडांची मुळे तोडली जातात. खड्ड्यातील मातीत खते चांगल्याप्रकारे मिसळणे शक्य होते.

सुरुवातीच्या काळात मुळांच्या वाढीसाठी अधिक अनुकूल परिस्थिती उपलब्ध होते. त्यामुळे झाडे पुढे प्रतिकूल परिस्थितीस तोंड देऊ शकतात. खड्याचा आकार जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतो. वस्कस किंवा मुरुमयुक्त जमीन तसेच जी जमीन प्रथमच लागवडीखाली आणली जात आहे. अशा जमिनीत 1* 1*1 मीटर आकाराचे खडे खोदावेत, परंतु समुद्र किंवा नदी किना-यावरील पुळणीची जमीन, गाळ मिश्रित, रेताड, मध्यम काळ्या आणि भारी काळ्या जमिनीत थोडा लहान आकाराचा खडुा खोदला तरी चालू शकेल.

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ! मोफत फवारणी पंप योजनेअंतर्गत करा अर्ज…

Naral lagwad 2025 जातीची निवड आणि उपलब्धता

नारळाच्या अनेक जातींची लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये बाणवली, प्रताप, लक्षद्वीप ऑडींनरी तर संकरित टी * डी आणि डी * टी या जाती आहेत. परंतु अशा जातीच्या रोपांचे उत्पादन करणे हे क्लिष्ट व वेळ खाऊ आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बाणवली जातीची रोपे तयार केली जातात. तर काही प्रमाणात प्रताप आणि संकरित जातीची रोपे तयार केली जातात. त्यामुळे या जातीची रोपे उपलब्धतेनुसार लागवड करावीत. कृषि विद्यापीठाने रोपवाटिकेतील रोपांची वाटप व्यवस्था ही संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी, पीन कोड – 415712 यांचे मार्फत केली जाते. त्यामुळे बागायतदार बंधूंना विनंती आहे की, त्यांनी रोपासंबंधी मागणी त्यांचेकडे एप्रिल-मे मध्येच पत्र पाठवून नोंदवावी.

लागवडीचा हंगाम Naral lagwad 2025

महाराष्ट्राचा विचार करता कोकणात ज्या जमिनीत पाणी साचून रहात नाही. अशा जमिनीत पावसाच्या सुरवातीस लागवड करावी तर ज्या पाणथळ जमिनी आहेत, अथवा ज्या ठिकाणी पुराचा त्रास होतो. अशा ठिकाणी पावसाचा जोर ओसरल्यानंतर ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये म्हणूनच रोपे जूनमध्येच खरेदी करावीत व ती रोपे पिशवीत भरून ठेवावीत विचार करता आणि रोपवाटिकेत रोपे पिशवी ऐवजी जमिनीमध्ये केलेली असल्याने संशोधन केंद्रातील नारळ रोपे पावसाळा सुरू झाल्यानंतरच सर्वसाधारणपणे 7 जूनला विक्रीसाठी उपलब्ध होतात.

Naral lagwad 2025 रोपांची निवड

रोपे कृषि विद्यापीठ, शासकीय आणि शासकीय मान्याताप्राप्त रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. रोपांची निवड खालील प्रमाणे करावी.

  • रोपवाटिकेत लवकर रुजलेल्या रोपांची लागवडीसाठी निवड करावी.
  • 9 ते 12 महिने वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत.
  • रोपांच्या उंचीपेक्षा त्यांचा बुधा आखूड व जाड असावा.
  • 9 ते 12 महिने वर्षे वयाच्या रोपांना 4 ते 6 पाने असावीत.
  • रोपे निरोगी व जोमदार असावीत.
  • रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावीत.

रोपांना आधार देणे

नारळ रोपांची लागवड केल्यानंतर लगेचच त्याला आधार देणे आवश्यक असते आणि म्हणूनच त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमाव अगोदर पासूनच करणे आवश्यक आहे. रोपे लावल्यानंतर पश्चिमेकडील वाऱ्याने ते हलू नयेत. म्हणून रोपांच्या उंचीच्या दोन काठ्या 45 सें.मी. अंतरावर रोपांच्या दक्षिणोत्तर बाजूवर रोवून त्याला एक आडवी काठी बांधावी. त्यावर रोप सैलसर बांधून ठेवावे.Naral lagwad 2025

सावली

माडास भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते हे जरी खरे असले, तरी नारळ रोपांना पहिली दोन वर्षे उन्हाळ्यात सावली करणे अत्यावश्यक आहे. विणलेले झाप, गवताच्या तट्या करून कृत्रिम सावली करता येते परंतु ही खर्चीक बाब आहे. त्यासाठी रोपांच्या चारही बाजूला उंच वाढणारी केळी तसेच पपई यांची लागवड करावी जेणेकरून माडांना सावली मिळेल आणि त्यापासून उत्पन्नही मिळेल. केळीची लागवड केल्यास एक एकरचा विचार करता एकरात 70 नारळांची झाडे बसतात. प्रत्येक नारळाभोवती चार दिशांना अडीच फुटावर केळीची लागवड झाल्यास 280 केळीची लागवड करता येईल. त्यापासून दुस-या वर्षी 280 घड प्राप्त झाल्यास कमीतकमी 28,000 ते 35,000 रुपयाचे उत्पन्न मिळेल. त्यातून काही लागवडीचा खर्च सहज भागविता येईल.

नारळाच्या झाडाचे द्यावयाच्या खत मात्रा : Naral lagwad 2025
वर्षशेणखत (किलो)नत्र (ग्रॅम)स्फुरद  (ग्रॅम)पालाश (ग्रॅम)
110200100200
220400200400
330600300600
440800400800
55010005001000

FAQ :

i) एका एकरात नारळाची किती झाडे लावता येतील ?

उत्तर – 1 एकर जागेत 180 ते 200 झाडे लावता येतात.

ii) नारळाच्या दोन झाडांमध्ये किती अंतर असावे ?

उत्तर – नारळासाठी सामान्यत: चौरस प्रणालीमध्ये 7.5 m * 7.5 m ते 8.0 m * 8.0 मीटर अंतर ठेवण्याची शिफारस केली जाते.

Leave a Comment