10 हजार रुपयांचा एक आंबा विकतोय नांदेडचा हा तरुण, युपीएससी करणाऱ्या या तरुणानं असं काय केलं? Nanded Mango Success 2025

Nanded Mango Success 2025 आता या हंगामात या झाडांना रसाळ फळे आली आहेत. विशेष म्हणजे एका आंब्याची किंमत 10 हजार रुपये असल्यामुळे गावात चांगलंच कुतूहल निर्माण झालंय.

 Nanded Mango Success 2025

युपीएससी करणाऱ्या नांदेडच्या एका तरुणाची सध्या राज्यभरात मोठी चर्चा आहे. जगातील सर्वात महागडा हा तरुण विकतोय. एका आंब्याची किंमत तब्बल 10 हजार रुपये एवढी आहे. दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या मियाझाकी आंब्याच्या लागवडीचा निर्णय आता या तरुणाला रसाळ फळे देत आहे. केवळ 10 रोपांमधून आता या झाडांना 11-12 फळे आली आहेत.

नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहाव्या हफ्त्याचे 1642 कोटी रुपये वितरित होणार;

नंदकिशोर गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे.  युपीएससीच्या अभ्यासासाठी पुण्यात गेलेल्या नंदकिशोरला कोरोना लॉकडाऊनमध्ये घरी परतावं लागलं. सहज ऑनलाईन सर्च करताना या आंब्याची ओळख झाली आणि त्यांनं दोन वर्षांपूर्वी फिलिपिन्समधून 10रोपं आयात केली. आता या हंगामात या झाडांना रसाळ फळे आली आहेत. विशेष म्हणजे एका आंब्याची किंमत 10 हजार रुपये असल्यामुळे गावात चांगलंच कुतूहल निर्माण झालंय.

WhatsApp Group Join Now

Nanded Mango Success 2025 नक्की केलं काय या तरुणानं?

नांदेडच्या भोशी गावातील सुमनबाई गायकवाड यांचं शेत सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. जगातील सर्वात महागड्या आंब्यांची रोपं असणारं शेत म्हणून गावकरी त्यांच्याकडे बघत आहेत. तर या सगळ्याची सुरुवात झाली कृषी प्रदर्शनापासून. 17 मार्च रोजी सुमनताई जिल्ह्यातील कृषी व धान्य महोत्सवात त्यांची खास विणलेली टोपली घेऊन आल्या आणि चमकदार लाल रंगाच्या आंब्यानं साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. खास चव. अनोखा रंग असलेल्या विदेशी मियाझाकी आंब्याची ही टोपली होती. सुमनताईंचा मुलगा नंदकिशोरच्या कल्पनेतून सुमनताईंनी त्यांच्या शेतात जगप्रसिद्ध मियाझाकी आंब्यांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.

Nanded Mango Success 2025 नंदकिशोरच्या करियरला नवं वळण

मराठवाड्यातील लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांप्रमाणे नंदकिशोरही नांदेडहून पुण्यात स्थलांतरीत झालेला. पण लॉकडाऊन लागलं आणि त्याला त्याचं कोचिंग क्लासला जाणं थांबवावं लागलं. त्यामुळे त्यांनं घरी परतण्याचा निर्णय घेतला. ऑनलाईन सर्च करत त्यानं त्याचा अभ्यास सुरु ठेवला. एके दिवशी सहज सर्च करत असताना मियाझाकी आंब्याविषयी त्याला माहिती मिळाली.

जगातल्या सर्वात महागड्या आणि आलिशान मियाझाकी आंब्याच्या लागवडीची सगळी माहिती त्यानं वाचली. आणि उत्सुकता चाळवली. मग सुरु झालं संशोधन. हा आंबा कुठे पिकतो?आपल्याकडे कोणी लागवड करतं का? या आंब्याची व्यवहार्यता कितपत असेल? सगळी माहिती मिळवली आणि आईसोबत म्हणजेच सुमनताईंना हाताशी घेत फिलिपिन्सवरून 6500 रुपये खर्चून 10 रोपे आयात केली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृतानुसार, या झाडांना आता 11-12 आंबे लगडले आहेत. कापणीसाठी, योग्य बाजारभाव कसा मिळेल यासाठी परभणीच्या एका अग्रणी शेतकऱ्याचे त्याने मार्गदर्शन घेतले. त्यामुळे सुमनताईंचे प्रीमियम फळ बाजारात मजबूत कमाई करणारे ठरले आहे. नंदकिशोरच्या प्रयत्नांना यश आल्याने गावात हे फळ लावण्यासाठी अनेक शेतकरी आशेनं पाहू लागलेत.

WhatsApp Group Join Now

मियाझाकी आंब्याचे वैशिष्ट्य काय?

लालसर केशरी रंगाचे दिसणारे मियाझाकी आंबे हे जगातील सर्वात महागडे आंबे म्हणून ओळखले जातात. मियाझाकी आंबा नावाचा हे रत्न जपानमध्ये उगम पावलंय आणि आता जगभरात लोकप्रिय झालंय.पण मियाझाकी आंब्याचं खरं वेगळेपण त्याच्या चव आणि पौष्टिकतेत आहे.यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असतं, जे आपल्या त्वचेसाठी आणि पेशींना नुकसान होऊ न देण्यासाठी चांगलं असतं. व्हिटॅमिन सी आणि ए इतकं जास्त की, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि पचनही बिघडू देत नाही.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment