नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहाव्या हफ्त्याचे 1642 कोटी रुपये वितरित होणार; Namo Shetkari Yojana 2025

Namo Shetkari Yojana 2025 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्याची शेतकरी प्रतिक्षा करत होते. अखेर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्यासाठी 1 हजार 642 कोटी रुपयांच्या वितरणासाठी मान्यता दिली आहे.

Namo Shetkari Yojana 2025

WhatsApp Group Join Now

नमोच्या हफ्त्याची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच निधी वितरित करण्यात येणार आहे. याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी (ता.26) प्रसिद्ध केला आहे.

64 लाख शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा! राज्य हिस्सा वितरित करण्यास मान्यता, वाचा सविस्तर;

Namo Shetkari Yojana 2025 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्यासाठी राज्य सरकारने 1642 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. लवकरच हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. 2023 च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात वार्षिक 6 हजार रुपये मिळतात.

आतापर्यंत पाच हफ्त्यांचे वितरण झाले असून, पाचवा हफ्ता विधानसभा निवडणुकीपूर्वी वितरित करण्यात आला होता. पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो हफ्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती.

WhatsApp Group Join Now

Namo Shetkari Yojana 2025 ज्यामुळे वार्षिक मदत 15000 रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मात्र, 2025-26 च्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद न केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment