Namo Shetkari Yojana 2025 एकीकडे पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. यावेळी शेतकऱ्यांनी नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याची अपेक्षा बाळगली. मात्र, यावेळी केवळ पीएम किसान चा हप्ता खात्यावर आला. त्यानंतर नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

त्यातच उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. यावेळी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. यात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सहाव्या हप्त्यासोबत या निर्णयाची अंमलबजावणी होईल असे वाटते. याबाबत उद्या विधिमंडळ अधिवेशातून समोर येईलच…
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. दुसरीकडे राज्यातील जवळपास 91 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. कारण यापूर्वी पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता एकत्रच मिळत होता. मात्र यावेळी तसं झाले नाही.
एकीकडे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि उद्या 10 मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी विविध घोषणासह नमो सन्मान शेतकरी योजनेचा हप्त्याची तारीख जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. शिवाय पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आले, मात्र नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे अद्याप आले नसल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.
सौर कृषी पंपसाठी 100 कोटींच्या निधी वितरणास मंजुरी, वाचा सविस्तर;
Namo Shetkari Yojana 2025 दोन हजार रुपयांची प्रतीक्षा
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारकडून कृषी विभागाकडून योजना सुरू आहे.
- तेव्हापासून आत्तापर्यंत या योजनेचे पाच हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
- मागील महिन्यात बिहार राज्यातून पीएम नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे वितरण आले होते.
- त्यावेळीच नमो किसानचा हप्ता 1 किंवा 2 मार्च पर्यंत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 2 हजार रुपयांची अपेक्षा आहे.

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |