नमोचा सहावा हफ्ता वितरणासाठी शासनाचा ‘जीआर’ आला, वाचा सविस्तर; Namo Shetkari Hafta 2025

Namo Shetkari Hafta 2025 गेल्या अनेक दिवसांपासून नमो शेतकरी सन्मान योजनेच्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आहे. आज अखेर सहाव्या हफ्त्याच्या लाभासह यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाव्या हफ्त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Namo Shetkari Hafta 2025

पीएम किसानच्या हफ्त्यासोबत नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता मिळत होता. मात्र मागील हफ्त्यावेळी केवळ पीएम किसानचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर आला. त्या दिवसांपासून नमोचा हफ्ता केव्हा येईल, असे प्रश्न शेतकरी करीत होते. अखेर आज याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

मराठवाड्याच्या कडब्याला मोठी मागणी; शेकडा कसा मिळतोय दर? वाचा सविस्तर;

शासन निर्णयानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सहावा हफ्ता (माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025) व या पूर्वीच्या हफ्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

Namo Shetkari Hafta 2025 सहावा हफ्ता लवकरच!

  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हफ्ता, दुसरा हफ्ता, तिसरा हफ्ता, चौथा हफ्ता, तसेच पाचवा हफ्ता वितरित करण्यात आला आहे.
  • Namo Shetkari Hafta 2025 या योजनेअंतर्गत, सहावा हफ्ता (माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025) व यापूर्वीच्या हफ्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी यापूर्वीच्या हफ्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या 653.50 व्यतिरिक्त रक्कम 1642.18 कोटी इतका निधी कोटी वितरित करण्याबाबत निर्णय झाला आहे.

शासन निर्णययेथे क्लिक करा
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment