मुरादपूरला सौर उर्जेवर चालणार आधुनिक सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान! वाचा सविस्तर; Muradpur Upsa Irrigation Scheme 2025

Muradpur Upsa Irrigation Scheme 2025 शेतीला पाणी हवेच, आणि ते जर सौर ऊर्जेच्या साह्याने मोफत मिळाले तर, ते शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदानच ठरते. मुरादपूर येथील उपसा सिंचन योजना याचे उत्तम उदाहरण ठरेल आहे . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अभिनव प्रकल्पाचे उद्घाटन झाले.

Muradpur Upsa Irrigation Scheme 2025

सौरऊर्जेवर चालणाऱ्या या योजनेमुळे 465 एकर क्षेत्र बारमाही सिंचनाखाली येणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुरादपूर येथे सौरऊर्जेवर आधारित आधुनिक उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील दोन दिवसात ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज!

Muradpur Upsa Irrigation Scheme 2025 तरंगता सोलर पॅनल्स द्वारे चालणारी ही योजना 465 एकर क्षेत्राला बारमाही पाणीपुरवठा करणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना स्वस्थ, पर्यावरणपूरक आणि सातत्यपूर्ण सिंचनाची सुविधा मिळणार असून, यामुळे उत्पादन आणि नफा वाढणार आहे.

WhatsApp Group Join Now

उमरेड तालुक्यातील वडगाव जलाशयावर (वेणा नदीवर) उभारलेल्या मुरादपूर उपसा सिंचन योजना आहे. यावेळी आमदार संजय मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, सरपंच दुर्गा आलम, उपसरपंच गजानन गाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या योजनेत रामा डॅम च्या पाण्यात तरंगते सौर बॅलन्स बसवले असून, त्याद्वारे निर्मिती वीज MSCB ला जोडली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन योजनेवरील वीज बिलाचा खर्च लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे. एकाच कंट्रोल रूम मधून संपूर्ण क्षेत्रात ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे.

465 एकर शेत जमिनीला बारमाही पाणी मिळणार असून, यामध्ये पाणी वापर संस्थेचे व्यवस्थापन केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now

गडकरी यांनी शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करून ड्रोन, ट्रॅक्टर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. यामुळे उत्पादन वाढवून खर्चात बचत होईल, असे त्यांनी सांगितले.

गडकरींना यावेळी शंभर कोटींच्या गुंतवणुकीतून उभारण्यात येणाऱ्या स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाची माहिती दिली. या गावात मोफत पाणी, वीज, घरांची सुविधा, मैदान व उद्यान असेल लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले.

Muradpur Upsa Irrigation Scheme 2025 स्मार्ट व्हिलेज लवकरच

100 कोटी रुपयांमध्ये दहा एकर जागेवर स्मार्ट व्हिलेज बांधायला घेतले आहे. लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. 400 लोकांनी घरांसाठी नोंदणीही केली आहे. त्यात एक हजार लोकांना घरे देणार आहोत.

450 चौरस फुटाचे घर, सिमेंटचे रस्ते, आयुष्यभर पाणी आणि वीज मोफत देण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी खेळाचे मैदान आणि उद्यान हे असेल अशी माहिती गडकरी यांनी दिली.

Muradpur Upsa Irrigation Scheme 2025 मुरादपूर उपसा सिंचन योजनेची वैशिष्ट्ये

  • Muradpur Upsa Irrigation Scheme 2025 रामा डॅम च्या जलाशयात तरंगते सोलर पॅनल्स.
  • सोलर पॅनल द्वारे वीज निर्मिती होईल व ते एम एस सी बी ला जोडले जाणार असल्यामुळे योजनेवरील वीज बिलांचा भार कमी राहणार आहे.
  • प्रत्येकाच्या क्षेत्रात ठिबक सिंचनाची सोय.
  • एका कंट्रोल रूम मधून संपूर्ण क्षेत्रात पाणीवाटप.
  • संपूर्ण प्रकल्पावर पाणी वापर संस्थेचे नियंत्रण.
  • 465 एकर शेत जमिनीला बारमाही पाणी उपलब्ध होईल.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment