कोणत्या फळ पिकांना किती रुपयांचे विमा कवच; कधीपर्यंत करता येईल अर्ज? वाचा सविस्तर, Mrug Bahar Falpik Vima 2025

Mrug Bahar Falpik Vima 2025 सोलापूर: मी फळपीक विमा आज भरतो असे कोणी शेतकरी म्हणाला तर ते फार्मर आयडी शिवाय शक्य नाही. हवामान आधारित फळ पिक विमा उतरवण्यासाठी आता 30 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

Mrug Bahar Falpik Vima 2025

सातत्याने बदलत असलेले हवामान लक्षात घेता फळपीक विम्यात शेतकरी सहभागी होणे आवश्यक आहे. मृग बहार पीक विमा भरण्यासाठी कृषी विभागाने पोर्टल सुरू केले आहे.

राज्यात आता सुधारित पिक विमा योजना, पहा काय-काय बदल झालेत? 

शेतकऱ्यांना विमा भरण्याची सुविधा आता सहज उपलब्ध झाली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक्य कागदपत्रे जोडावी लागणार आहेत.

WhatsApp Group Join Now

Mrug Bahar Falpik Vima 2025 कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी नंबर देण्यात येत आहेत. हा विशिष्ट नंबर म्हणजे आधार कार्ड नंबर इतकाच महत्त्वाचा आहे. आता शेती विषयक प्रत्येक बाबींसाठी फार्मर आयडी मागितला जात आहे.

फळपीक विमा भरण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक आहे. म्हणजे सातबारा आधार नंबर तितकाच फार्मर आयडी तितकाच महत्त्वाचा आहे.

डाळिंब, पेरू, लिंबू, चिकू, मोसंबी, सिताफळ या फळबागांना विम्याचे कवच आहे. 7/12 व 8 अ उतारा, जिओ टॅग फोटो, फार्मर आयडी, आधार कार्ड बँक पासबुक ही कागदपत्र सोबत द्यावी लागणार आहेत.

WhatsApp Group Join Now

Mrug Bahar Falpik Vima 2025 कोणत्या पिकांना विमा कवच

डाळिंबासाठी आठ, लिंबू साठी चार, तर इतर फळ पिकांसाठी प्रत्येकी साडेतीन हजार रुपये हेक्‍टरी शेतकरी हिस्सा, त्यामध्ये केंद्र व राज्य शासन हिस्सा विमा कंपनीला जमा करते.

त्यावर नुकसान भरपाई डाळिंब एक लाख 60 हजार, पेरू 70 हजार, लिंबू 80 हजार, चिकू व सीताफळ प्रत्येकी 70 हजार, तर मोसंबी एक लाख रुपये मिळू शकते.

Mrug Bahar Falpik Vima 2025 पाऊस कमी किंवा अधिक पडल्याने फळ पिकांचे नुकसान झाले तर विम्याची नुकसान भरपाई मिळू शकते.

सोलापूर जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे दरवर्षीच नव्याने फळबागांची लागवड होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे फळबागांचे नुकसान होऊ शकते. अशावेळी विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांनी फळ पिकप विमा भरणे आवश्यक्य आहे. -शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment