पाचोडमध्ये आंबा बहार मोसंबीचा बाजार मंदावला; जाणून घ्या सविस्तर, Mosambi Market 2025

Mosambi Market 2025 पाचोडच्या मोसंबी मार्केटमध्ये बुधवारी अंबा बहार मोसंबी ला चांगल्या प्रतीसाठी सर्वाधिक 20 हजारांचा गोड दर मिळाला. मात्र मागणी कमी असल्याने आणि आवक वाढल्याने दरावर ताण आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल तब्बल 30 लाखांनी कमी झाल्याने शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत.

Mosambi Market 2025

Mosambi Market 2025 पाचोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोसंबी मार्केटमध्ये बुधवारी अंबा बहार मोसंबीच्या लिलावाला सुरुवात झाली. चांगल्या प्रतीच्या मोसंबीला सर्वाधिक 20 हजार रुपये प्रति टन भाव मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे बाजारात उठाव नसल्याने काहीसा निराशेचा सूर होतो. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उलाढाल जवळपास 40 टक्क्यांनी घटले आहे.

जमिनीची मशागत /नांगरटीचे महत्त्व!!

Mosambi Market 2025: 100 टणांची आवक 20 हजारापर्यंत भाव!

बुधवारी पाचोड मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी सुमारे 100 टन मोसंबी आणली होती. सकाळी 11 वाजता लिलावाला सुरुवात झाली. यावेळी मोसंबीला सर्वाधिक 20 हजार रुपये प्रति टन तर सर्वात कमी 15 हजार रुपये प्रति टन दर मिळाला. मागील वर्षी याच काळात अंबा बहार मोसंबीला 20 ते 25 हजार रुपये प्रति टन इतका दर मिळाला होता.

WhatsApp Group Join Now

Mosambi Market 2025: उलाढाल घटली

मागील वर्षी जुलै महिन्यात पाचोड मोसंबी मार्केटमध्ये जवळपास 70 लाख रुपयांची उलाढाल झाली होती. मात्र, यंदा आतापर्यंत केवळ 40 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. जुलै महिना संपला अजून 15 दिवस बाकी आहे. त्यामुळे व्यापारी पुढील आठवड्यात मागणी करण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.

Mosambi Market 2025: मागणी कमी का?

व्यापारी शिवाजी भगशिंगे यांनी सांगितले की, पावसाळ्यात लोकांचा कल मोसंबी ऐवजी केळी, सफरचंद, पेरू, अशा फळांकडे अधिक असतो. थंड हवामानामुळे रसाला मागणी कमी भासते. पावसाळ्यात फळ लवकर खराब होतात. त्यामुळे व्यापारीही खरेदीसाठी पुढे येत नाहीत.

WhatsApp Group Join Now

मुंबई, पुणे, नाशिक, हैदराबाद अशा प्रमुख बाजारपेठातही सध्या दर स्थिर असल्याने मागणी मंदावलेली आहे. तसेच निर्यातही काही प्रमाणात कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या मोसंबीला अपेक्षित उदर मिळत नाही.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment